Asus Zenfone 9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 29 Jul 2022 07:29:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 छोटा पॅकेट बडा धमाका! 16GB रॅमसह दणकट ASUS Zenfone 9 लाँच; वनप्लस-शाओमीच्या अडचणी वाढल्या https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-50mp-camera-30w-fast-charge-phone-asus-zenfone-9-launched/ https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-50mp-camera-30w-fast-charge-phone-asus-zenfone-9-launched/#respond Fri, 29 Jul 2022 07:29:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11827 Asus Zenfone 9 कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन आहे जो क्वॉलकॉमच्या सर्वात दमदार Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.

The post छोटा पॅकेट बडा धमाका! 16GB रॅमसह दणकट ASUS Zenfone 9 लाँच; वनप्लस-शाओमीच्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS नं आपला नवीन कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Zenfone 9 लाँच केला आहे. यात क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळतो. हा फोन ASUS Zenfone 8 चा उत्तराधिकारी आहे, जो कंपनीनं 6-इंचापेक्षा छोट्या डिस्प्लेसह सादर केला होता. ASUS Zenfone 8 च्या तुलनेत Zenfone 9 मध्ये मोठी बॅटरी, फ्लॅट साईड, स्लीमर बेजल आणि सुधारित कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डिजाईन देखील बदलण्यात आली आहे. हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. भारतात हा फोन ASUS 9Z नावानं सादर केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया आकाराने छोट्या असलेल्या ASUS Zenfone 9 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

ASUS Zenfone 9 चे स्पेसिफिकेशन्स

ASUS Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये 5.9-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ 2400 x 1080 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. कंपनीनं फ्रंटला Gorilla Glass Victus ची सुरक्षा दिली आहे. आसुसचा हा फोन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: विराट कोहलीच्या हातात दिसला आगामी Vivo V25 Pro; शक्तिशाली Dimensity 1300 प्रोसेसरसह होणार एंट्री

Asus Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये मोठा ड्युअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात 6-अ‍ॅक्सिस गिम्बल स्टॅबिलायजेशन सपोर्ट मिळतो, ज्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ घेताना हात हलल्यास दृश्य हलत नाही. फोनचा प्रायमरी कॅमेरा Sony IMX766 आहे जो OIS सपोर्टसह येणारा 50MP सेन्सर आहे. तसेच फोनमध्ये 12MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 10 हजारांच्या आत स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह दमदार मोबाईलची एंट्री

आसुसच्या लेटेस्ट Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या अँड्रॉइड 12 फोनमध्ये 3.5mm जॅक देखील आहे. फोनचे अन्य फिचर्स पाहता हा IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टंट, साईड माउंटेड टच सेन्सेटिव्ह फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल स्पिकर, व्हेपर चेंबर, 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग, WiFi 6/6E, Bluetooth 5.2, आणि NFC सपोर्ट देण्यात आला आहे.

ASUS Zenfone 9 ची किंमत

ASUS Zenfone 9 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट युरोपियन बाजारात आले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB + 128GB सह 799 यूरो (सुमारे 64,700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच हा फोन 256GB स्टोरेजसह 8GB रॅम आणि 16GB रॅम ऑप्शनमध्ये देखील लाँच करण्यात आला आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 849 यूरो (सुमारे 68,700 रुपये) आणि 899 यूरो (सुमारे 72,700 रुपये) आहे. हा फोन मिडनाइट ब्लॅक, स्टारी ब्लू, सनसेट रेड आणि मूनलाईट व्हाईट कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

The post छोटा पॅकेट बडा धमाका! 16GB रॅमसह दणकट ASUS Zenfone 9 लाँच; वनप्लस-शाओमीच्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-50mp-camera-30w-fast-charge-phone-asus-zenfone-9-launched/feed/ 0