विराट कोहलीच्या हातात दिसला आगामी Vivo V25 Pro; शक्तिशाली Dimensity 1300 प्रोसेसरसह होणार एंट्री

Vivo V25 सीरीज भारतात लाँच होणार आहे. विवोनं आपला आगामी फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे. हा स्मार्टफोन भारतात पुढील महिन्यात लाँच केला जाईल. काही दिवसांपूर्वी भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं आपल्या सोशल मीडियावर या हँडसेटचा फोटो शेयर केला आहे. विवोचा हा फोन याआधी BIS च्या लिस्टिंगमध्ये स्पॉट करण्यात आला आहे. MySmartPrice नं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमधून Vivo V25 Pro स्मार्टफोनची माहिती दिली आहे.

आगामी Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये यूनीक कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी देण्यात येईल. मायस्मार्टप्राईसला इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की या फोनमध्ये Fluorite AG Glass देण्यात आली आहे. V25 Pro स्मार्टफोन कंपनीच्या गेल्यावर्षी आलेल्या Vivo V23 Pro स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल, ज्यात कलर चेंजिंग बॅक पॅनल देण्यात आलं होतं. Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये देखील यूनीक कलर चेंजिंग फिचर देण्यात येईल जो याचा यूनीक सेलिंग पॉइंट आहे.

Vivo V25 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये 3D कर्व AMOLED डिस्प्ले दिला जाईल. या फोनच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full-HD+ आणि 120Hz रिफ्रेश रेट असेल. विवोचा हा फोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह येईल. हा प्रोसेसर आधी देखील काही स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. हा चिपसेट दमदार गेमिंग पावर आणि बॅटरी कपॅसिटी देतो. विवोचा हा फोन 5Gला सपोर्टसह सादर केला जाईल.

विराट कोहिलीने टीज केलेल्या फोटोजनुसार फोन ब्लू कलर व्हेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह हा फोन 30,000 ते 40,000 रुपयांची आसपास सादर केला जाईल. Vivo V25 सीरीज स्मार्टफोनची बाजारात थेट टक्कर OnePlus Nord 2T आणि Oppo Reno8 शी होईल. तसेच Vivo V25 Pro स्मार्टफोन 40000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत Nothing Phone (1) ला देखील आव्हान देऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी आलेल्या Vivo T1x चे स्पेसिफिकेशन्स

Vivo T1x स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा Full HD+ 2.5D LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU देण्यात आला आहे. सोबतीला 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज आहे. विवोचा हा फोन Android 12 आधारित Funtouch OS कस्टम स्किन वर चालतो. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here