Asus Zenfone Max M2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 05 Feb 2019 09:07:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 09:07:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3544 या स्पेशल सेल मध्ये असूस आपल्या फोन्स वर 8,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

The post 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शानदार स्पेसिफिकेशन्स आणि दमदार बिल्ड क्वॉलिटी म्हणजे असूसचे स्मार्टफोन्स. लो बजट ते हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन रेंज मध्ये असूसचे फोन लोकप्रिय आहेत. आपल्या फॅन्सना कमी किंमतीती स्मार्टफोन देत असूस ने ‘ओएमजी डेज’ ची सुरवात केली आहे. याकाळात असूसच्या 10 पेक्षा जास्त स्मार्टफोन वेरिएंट्स मोठ्या डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील. या स्पेशल सेल मध्ये असूस आपल्या फोन्स वर 8,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

असूसचा ओएमजी डेज सेल शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 4 दिवस चालेल. हा सेल उद्या म्हणजे 6 फेब्रुवारीला सुरु होऊन 9 फेब्रुवारी पर्यंत चालेल. याचा काळात असूस स्मार्टफोन्स वर फक्त प्राइज डिस्काउंट दिला जात नसून फोन नो कॉस्ट ईएमआई वर पण सेल साठी उपलब्ध होतील.

असूसच्या दमदार स्मार्टफोन झेनफोन 5झेड बद्दल बोलायचे तर या फोनची किंमत कंपनी ने थेट 8,000 रुपयांनी कमी केली आहे. 29,999 रुपयांचा झेनफोन 5झेड चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट आता 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनच्या 6जीबी/128जीबी वेरिएंटची किंमत 32,999 रुपयांवरून 24,999 रुपये आणि 8जीबी/256जीबी वेरिएंटची किंमत 36,999 रुपयांवरून 28,999 रुपये झाली आहे.

झेनफोन मॅक्स प्रो एम1 वर कंपनी 1,500 रुपयांची सूट देत आहे. ओएमजी डेज मध्ये फोनचा 9,999 रुपयांचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 11,999 रुपयांचा 4जीबी/64जीबी वेरिएंट 10,499 रुपये तसेच 13,999 रुपयांचा 6जीबी/64जीबी वेरिएंट 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2, झेनफोन मॅक्स एम2 तसेच झेनफोन लाईट एल1 च्या सर्व वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकले जात आहेत. याच सेल मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये मिळेल.

तसेच झेनफोन मॅक्स एम2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. झेनफोन लाइट एल1 सेल मध्ये 4,999 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध होईल.

The post 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/feed/ 0
9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच स्क्रीन आणि दमदार बॅटरी असलेला असूस झेनफोन मॅक्स एम2, रेडमी 6 प्रो पेक्षा चांगला आहे का हा फोन https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m2-launched-in-india-price-specification-and-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m2-launched-in-india-price-specification-and-feature-in-marathi/#respond Tue, 11 Dec 2018 14:20:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3119 या बजेट मध्ये शाओमीचा रेडमी 6 प्रो मॉडेल उपलब्ध आहे आणि स्पेसिफिकेशन आणि डिजाइनच्या दृष्टीने असूस झेनफोन मॅक्स एम2 खूपच चांगला आहे.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच स्क्रीन आणि दमदार बॅटरी असलेला असूस झेनफोन मॅक्स एम2, रेडमी 6 प्रो पेक्षा चांगला आहे का हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधीच बातमी आली होती की कंपनी आज असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. परंतु लॉन्चच्या वेळी कंपनी ने आपल्या यूजर्सना सरप्राइसज देत अजून एक फोन मॉडेल सादर केला. असूस ने झेनफोन मॅक्स एम2 सादर केला आहे. हा फोन प्रो वेरियंटचा छोटा वर्जन आहे. स्क्रीन साइज तीच आहे पण प्रोसेसर आणि रॅम वेगळा आहे. भारतीय बाजरात झेनफोन मॅक्स एम2 च्या बेस मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे आणि हा फोन 20 डिसेंबर पासून आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

असूस झेनफोन मॅक्स एम2 चे स्पेसिफिकेशन
असूस झेेनफोन मॅक्स एम2 पण कंपनी ने नॉच स्क्रीन सह सादर केला आहे. फोन मध्ये 9:9 आसपेक्ट रे​शियो वाला 6.3 इंच एचडी+ (1520×720) डिस्प्ले दिला आहे. फोनची बॉडी पॉलिकार्बोनेटची आहे पण मेटल सारखी वाटते. बॅक पॅनल मध्ये ही फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे आणि सोबत डुअल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट पॅनल वर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा मिळेल.

हा फोन नॉच डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर आधारित आहे आणि यात आॅक्टाकोर (4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 गोल्ड आणि 4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 सिल्वर) प्रोसेसर मिळेल. स्टोरेज साठी 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल मेमरी व 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी साठी असूस झेनफोन मॅक्स एम2 मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने यात 8—मेगापिक्सल + 2—मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेंसर आहे. मेन सेंसर एफ/1.8 अपर्चरचा आहे. तर सेकेंडरी सेंसर एफ/2.4 अपर्चर सह येतो जो डेफ्थ सेंसिंग साठी उपयोगी पडतो. फोन मध्ये ईआईएस अर्थात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट मिळेल.

सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने या फोन मध्ये मोठी बॅटरी दिली आहे. फोन मध्ये आपको 4,000 एमएएच ची बॅटरी मिळेल. या बजेट मध्ये शाओमीचा रेडमी 6 प्रो मॉडेल उपलब्ध आहे आणि स्पेसिफिकेशन आणि डिजाइनच्या दृष्टीने असूस झेनफोन मॅक्स एम2 खूपच चांगला आहे.

असूस झेनफोन मॅक्स एम2 ची प्राइस
भारतीय बाजरात असूस झेनफोन मॅक्स एम2 च्या 3जीबी वेरियंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4जीबी वाला मॉडेल 11,999 रुपयांमध्ये घेता येईल.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नॉच स्क्रीन आणि दमदार बॅटरी असलेला असूस झेनफोन मॅक्स एम2, रेडमी 6 प्रो पेक्षा चांगला आहे का हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-m2-launched-in-india-price-specification-and-feature-in-marathi/feed/ 0
असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि मॅक्स एम2 लॉन्च, शाओमी आणि रियलमीला मिळेल चांगलीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-and-zenfone-max-m2-launched-price-specificationa-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-and-zenfone-max-m2-launched-price-specificationa-in-marathi/#respond Thu, 06 Dec 2018 12:35:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3076 काही दिवसांपूर्वी हे आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर दिसले होते. आशा आहे की याच ईकॉमर्स साइट वर हे सेल साठी उपलब्ध होतील.

The post असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि मॅक्स एम2 लॉन्च, शाओमी आणि रियलमीला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यापासून असूसच्या नवीन फोन्स बद्दल खूप चर्चा होत होती. बातमी अशी होती कंपनी लवकरच असूस जेनफोन मॅक्स प्रो एम 1 चा अपग्रेडड वर्जन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. स्वतः असूस ने याची माहिती दिली होती की हा फोन 11 डिसेंबरला लॉन्च होईल पण त्याआधी आज हा फोन असूसच्या रशियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे. सर्वात खास बाब अशी की यावेळी कंपनी एक नव्हे तर दोन फोन सादर करणार आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 सोबतच झेनफोन मॅक्स एम 2 पण लिस्ट करण्यात आला आहे आणि दोन्ही फोनचे सर्व स्पेसिफिकेशन उपलब्ध झाले आहेत.

राहिली गोष्ट भारताची तर कंपनी ने मीडिया इनवाइट ​शेयर केला आहे आणि 11 डिसेंबरला हे फोन भारतात लॉन्च होणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर दिसले होते. आशा आहे की याच ईकॉमर्स साइट वर हे सेल साठी उपलब्ध होतील.

असूस झेनफोन मॅक्स एम2

Asus Zenfone Max M2

असूस झेनफोन मॅक्स एम2 मध्ये 6.3 इंचाची एचडी+,1520×720 पिक्सेलची स्क्रीन देण्यात आली आहे आणि कंपनी ने हा 19:9 आसपेक्ट रे​शियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर आधारित आहे आणि यात आॅक्टाकोर (4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 गोल्ड आणि 4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 सिल्वर) प्रोसेसर मिळेल. यासोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी असूस झेनफोन मॅक्स एम2 मध्ये 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. कंपनी ने या फोन मध्ये मोठी बॅटरी दिली आहे. फोन मध्ये तुम्हाला 4,000 एमएएच ची बॅटरी मिळेल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

Asus Zenfone Max M2 Pro

हा मॉडेल थोडा अडवांस आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये तुम्हाला 6.3—इंचाची एलसीडी स्क्रीन मिळेल. हा फोन फुल एचडी+ ;2280×1080 रेजल्यूशन सह उपलब्ध आहे. प्रोसेसर च्या बाबतीती हा खूप अडवांस आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. सोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोन मध्ये पण तुम्हाला कार्ड सपोर्ट मिळेल.

मॅक्स प्रो एम2 मध्ये 12 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेंसर आहे. सोबत ही 13 एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळेल. ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. तसेच पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि मॅक्स एम2 लॉन्च, शाओमी आणि रियलमीला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-and-zenfone-max-m2-launched-price-specificationa-in-marathi/feed/ 0
येत आहे असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2, शाओमी नोटला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-max-m2-russian-certification-site-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-max-m2-russian-certification-site-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 12:40:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2397 असूस आपले आगामी स्मार्टफोन्स झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि झेनफोन मॅक्स एम2 नावाने लॉन्च करेल.

The post येत आहे असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2, शाओमी नोटला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूस ने यावर्षी इंडियन टेक बाजारात आपल्या झेनफोन सीरीज मध्ये खुप दमदार आणि कमी किंमत वाले स्मार्टफोन सादर केले होते. असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम1 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो 6जीबी रॅम व क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सारखे पावरफुल स्पेसिफिकेशन्स फक्त 14,999 रुपयांमध्ये देत आहे. असूसच्या या फोन ने अनेक ब्रँडसना थेट टक्कर दिली होती आणि हा कंपनीच्या हिट स्मार्टफोन्स पैकी एक आहे. आता असूस आपल्या या स्मार्टफोन चे नवीन मॉडेल आणण्याची तयारी करत आहे जे सरकारी वेबसाइट वर लिस्ट पण करण्यात आले आहेत.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 चे नवीन मॉडल्स रशियाच्या यूरोशियन इकोनॉमिक कमीशन वेबसाइट वर सर्टिफाइड करण्यात आले आहेत. या वेबसाइटच्या सर्टिफिकेशन वरून हे स्पष्ट झाले आहे की असूस लवकरच आपले नवीन स्मार्टफोन मॉडेल अंर्तराष्ट्रीय बाजारात आणणार आहे. बोलले जात आहे की असूस आपले आगामी स्मार्टफोन्स झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि झेनफोन मॅक्स एम2 नावाने लॉन्च करेल.

मीडिया रिपोर्ट नुसार सर्टिफिकेशन साइट वर झेनफोन मॅक्स प्रो एम2 झेडबी631केएल मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तर झेनफोन मॅक्स एम2 झेडबी633केएल मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये दोन्ही मॉडेल्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही पण सर्टिफिकेशन साइट वर असूस च्या आगामी स्मार्टफोन्स मध्ये एंडरॉयड ओरियो असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतात झेनफोन मॅक्स प्रो एम1 तीन वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येतो. तर फोनचा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपये तसेच 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

The post येत आहे असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2, शाओमी नोटला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m2-max-m2-russian-certification-site-in-marathi/feed/ 0