असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 आणि मॅक्स एम2 लॉन्च, शाओमी आणि रियलमीला मिळेल चांगलीच टक्कर

गेल्या महिन्यापासून असूसच्या नवीन फोन्स बद्दल खूप चर्चा होत होती. बातमी अशी होती कंपनी लवकरच असूस जेनफोन मॅक्स प्रो एम 1 चा अपग्रेडड वर्जन मॅक्स प्रो एम2 लॉन्च करणार आहे. स्वतः असूस ने याची माहिती दिली होती की हा फोन 11 डिसेंबरला लॉन्च होईल पण त्याआधी आज हा फोन असूसच्या रशियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे. सर्वात खास बाब अशी की यावेळी कंपनी एक नव्हे तर दोन फोन सादर करणार आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 सोबतच झेनफोन मॅक्स एम 2 पण लिस्ट करण्यात आला आहे आणि दोन्ही फोनचे सर्व स्पेसिफिकेशन उपलब्ध झाले आहेत.

राहिली गोष्ट भारताची तर कंपनी ने मीडिया इनवाइट ​शेयर केला आहे आणि 11 डिसेंबरला हे फोन भारतात लॉन्च होणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर दिसले होते. आशा आहे की याच ईकॉमर्स साइट वर हे सेल साठी उपलब्ध होतील.

असूस झेनफोन मॅक्स एम2

Asus Zenfone Max M2

असूस झेनफोन मॅक्स एम2 मध्ये 6.3 इंचाची एचडी+,1520×720 पिक्सेलची स्क्रीन देण्यात आली आहे आणि कंपनी ने हा 19:9 आसपेक्ट रे​शियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर आधारित आहे आणि यात आॅक्टाकोर (4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 गोल्ड आणि 4×1.8 गीगाहट्र्ज क्रयो 250 सिल्वर) प्रोसेसर मिळेल. यासोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी असूस झेनफोन मॅक्स एम2 मध्ये 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. कंपनी ने या फोन मध्ये मोठी बॅटरी दिली आहे. फोन मध्ये तुम्हाला 4,000 एमएएच ची बॅटरी मिळेल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

Asus Zenfone Max M2 Pro

हा मॉडेल थोडा अडवांस आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये तुम्हाला 6.3—इंचाची एलसीडी स्क्रीन मिळेल. हा फोन फुल एचडी+ ;2280×1080 रेजल्यूशन सह उपलब्ध आहे. प्रोसेसर च्या बाबतीती हा खूप अडवांस आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. सोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोन मध्ये पण तुम्हाला कार्ड सपोर्ट मिळेल.

मॅक्स प्रो एम2 मध्ये 12 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेंसर आहे. सोबत ही 13 एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळेल. ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. तसेच पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here