Battery Backup - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 08 Sep 2020 13:16:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्लो चार्ज होत आहे का तुमचा स्मार्टफोन? जाणून घ्या कारणे आणि स्वतःच करा उपाय https://www.91mobiles.com/marathi/how-to-fast-charge-your-smartphone-tips-and-tricks/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-fast-charge-your-smartphone-tips-and-tricks/#respond Tue, 08 Sep 2020 13:16:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8042 पुढे आम्ही काही अश्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मोबाईल फोन फास्ट चार्ज करू शकाल.

The post स्लो चार्ज होत आहे का तुमचा स्मार्टफोन? जाणून घ्या कारणे आणि स्वतःच करा उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन स्मार्टफोन घेताना आपण फोनचा लुक, कॅमेरा आणि प्रोसेसर सारख्या प्वाइंट्स सोबतच त्याच्या बॅटरीला पण तेवढेच महत्व देतो. असे करणे आवश्यक आहे, कारण जेव्हा फोन मध्ये चांगली बॅटरी नसते तेव्हा त्यात असलेल्या इतर गोष्टी पण निरुपयोगी होतात. महागडा फोन पण कामाचा राहत नाही जेव्हा त्यात बॅटरी नसते. सध्या स्मार्टफोन कंपन्या व ब्रँड्स मोठ्या बॅटरी सोबतच फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण घेऊन येत आहेत. पण एका वेळेनंतर फोन बॅटरीचा बॅकअप कमी होऊ लागतो हे तुम्ही पहिले असेल आणि चार्जिंग पण स्लो होते. फोनचा चार्जिंग स्पीड कमी होतो याकडे आपले कधी लक्ष जास्त जात नाही. अशी अनेक कारणे आहेत ज्यांच्यामुळे स्मार्टफोनचा चार्जिंग स्पीड स्लो होतो. जर तुमचा स्मार्टफोन पण चार्ज होण्यास जास्त वेळ घेत असेल तर पुढे आम्ही काही अश्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मोबाईल फोन फास्ट चार्ज करू शकाल.

1. ओरिजनल चार्जरचा करा वापर

अनेकदा फोन बॉक्स मध्ये आलेला चार्जर हरवतो किंवा बिघडतो. त्यानंतर स्वस्त मिळतोय म्हणून लोक कोणत्याही लोकल चार्जरने फोन चार्ज करतात. असे केल्याने फक्त फोन स्लो चार्ज होतो असे नाही तर असा डुप्लिकेट किंवा नकली चार्जरच फोनची बॅटरी मध्ये ब्लास्ट होण्यामागे कारण बनतो, जे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

2. डुप्लिकेट डेटा केबल पासून लांब रहा

अनेकदा चार्जर सोबत येणारी यूएसबी केबल तुटते किंवा खराब होते. त्यानंतर लोक फक्त मोबाईलच नाही तर आता कोणत्याही डिवाईसच्या डेटा केबलने आपला फोन चार्ज करू लागतात. चार्जर प्रमाणेच नकली यूएसबी केबलचा वापर फक्त फोन स्लो चार्ज करत नाही तर सोबतच बॅटरीचे स्वास्थ्य पण बिघडवतो. असे सतत केल्याने कालांतराने फोनची बॅटरी पूर्णपणे खराब होते आणि मग फोन कामातून जातो.

3. फोन कवर काढून चार्ज करा

लुक आणि डिजाईनमुळे आता असे फोन्स बनणे बंद झाले आहेत ज्यांचा बॅक कवर काढून बॅटरी काढता येते. आता फोन्सची बॅटरी रिमूवेबल नसते. तसेच स्टाईल व सुरक्षेसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फोन कवरचा पण वापर करतात. विशेष म्हणजे जेव्हा फोन चार्ज केला जातो तेव्हा बॅटरी हीट रिलीज करते. त्यामुळे कवर असल्यास उष्णता अडकून राहते आणि बाहेर जात नाही. फोन गरम झाल्यामुळे बॅटरीची इफिशन्सी म्हणजे क्षमता पण कमी होते. कवर नसेल तर हीट बाहेर निघेल तसेच फोन फास्ट चार्ज होईल.

4. हे मोड्स करा ऑन

फोनची बॅटरी जेव्हा खूप कमी होते तेव्हा चार्जिंग आणि प्रोसेसिंगचा जास्त लोड पडतो. लो बॅटरी असताना लोकेशन, जीपीएस, डेटा व सिंक इत्यादि बंद केल्यास बॅटरीची खपत कमी होईल आणि तिला चार्ज होण्यास सपोर्ट मिळेल. अश्यावेळी फोन मधील Power saving mode व असे इतर ऑप्शन ऑन करा जे बॅकग्राउंड ऍप्स चालू देत नाहीत म्हणजे स्मार्टफोन वेगाने चार्ज होईल.

5. स्विच ऑफ करून करा चार्ज

चार्जिंग चालू असताना फोनचा वापर केला नाही तर चांगलेच किंवा फोन थोडा वेळ स्विच ऑफच करावा. असे केल्याने फोनची सेल्युलर कनेक्टिविटी खंडित होईल आणि फोन वेगाने चार्ज होण्यास सुरवात होईल. तर दुसरीकडे फोन थोडा वेळ स्विच ऑफ केल्याने फोनच्या बॅटरी व प्रोसेसिंगला पण आराम मिळतो आणि त्यांची क्षमता वाढते.

वरील सर्व टिप्स तुम्ही पण वापरा आणि इतरांना पण सांगा. कारण हे उपाय फोन वेगाने चार्ज करण्यास मदत करतील तसेच तुमच्या स्मार्टफोनची हेल्थ मेन्टेन करण्यास आणि त्याचे आयुष्य वाढवण्यास मदत करतील.

The post स्लो चार्ज होत आहे का तुमचा स्मार्टफोन? जाणून घ्या कारणे आणि स्वतःच करा उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-fast-charge-your-smartphone-tips-and-tricks/feed/ 0
जर तुम्हाला पण सतावत असेल ‘लो बॅटरी’ ची भीती, तर या 10 ट्रिक्स वापरून मिळवू शकता चांगला बॅकअप https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-your-android-smartphone-iphone-battery-backup-last-longer-know-10-tips-and-tricks/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-your-android-smartphone-iphone-battery-backup-last-longer-know-10-tips-and-tricks/#respond Wed, 08 Jan 2020 13:57:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6229 या ट्रिक्स फक्त फोन बॅटरी वाचवणार नाहीत तर फोनची परफॉर्मेंस आणि बॅटरीची हेल्थ पण चांगली ठेवतील.

The post जर तुम्हाला पण सतावत असेल ‘लो बॅटरी’ ची भीती, तर या 10 ट्रिक्स वापरून मिळवू शकता चांगला बॅकअप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बऱ्याचदा गंमतीने म्हटले जाते आहे कि ‘तुम्ही जेवणाविना राहू शकता पण मोबाईल फोनविना नाही’, परंतु यात थोडे सत्य दडले आहे. स्मार्टफोन सध्या लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच दिवसभर मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. टेक्नॉलॉजी एडवांस झाल्यामुळे मोबाईल फोन आधीपेक्षा जास्त पावरफुल होत आहेत ज्यात लोक सोशल मीडिया, गेम्स, चॅटिंग व फोटोग्राफी आवडीने करतात. हे स्मार्टफोन काम तर चोख बजावतात पण वारंवार यांची बॅटरी डिस्चार्ज होऊ लागते. बाहेर जाताना यूजर्सना भीती चिंता लागून राहते कि घरी येण्याआधी फोनची बॅटरी संपणार तर नाही ना. अनेकजण सोबत फोन चार्जर आणि पावरबॅंक पण घेऊन जातात. पण आज आम्ही तुम्हाला काही अश्या सोप्प्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी वाचवू शकता आणि चांगला बॅकअप मिळवू शकता. या ट्रिक्स फक्त फोन बॅटरी वाचवणार नाहीत तर फोनची परफॉर्मेंस आणि बॅटरीची हेल्थ पण चांगली ठेवतील.

1) ऑटो सिंक करा बंद

जेव्हा नवीन स्मार्टफोन घेता तेव्हा गूगल अकाउंटने लॉग-इन केली जाते. फोन मध्ये मेल आईडी च्या माध्यमातून सेटअप केला जातो आणि ऍप स्टोर ऍक्टिव्ह होतो. अनेकदा लोक गूगल अकाउंट सेटअप केल्यावर मेलचा ऑटो सिंक ऑन करतात. ऑटो सिंकमुळे एखादा नवीन मेल आल्यास नोटिफिकेशन्स येते. जरी तुम्ही मेलचा जास्त वापर करत नसाल तरीही बॅकग्राउंड मध्ये मेल इंटरनेटशी कनेक्टेड असतो आणि सतत सिंक होत असतो. ऑटो सिंकसाठी फोनची बॅटरी पण वापरली जाते. ऑटो सिंक टर्न ऑफ केल्यास फोन बॅटरीचा वापर कमी होईल.

2) लो ब्राइटनेस

आजकाल फोनची डिस्प्ले क्वॉलिटी शार्प असते ज्यात रंग पण सुस्पष्ट दिसतात. पण तुम्हाला सांगू इच्छितो कि डिस्प्ले ब्राइटनेस पण बॅटरी संपण्याचे एक मोठे कारण आहे. जितकी जास्त फोनची ब्राइटनेस असेल, बॅटरी पण तितकीच वापरली जाईल. त्यामुळे गरज नसल्यास फोनची ब्राइटनेस कमी करा. ब्राइटनेसमुळे बॅटरीचा वापर कमी करण्यासाठी ‘डार्क थीम’ नवीन ट्रेंड म्हणून समोर येत आहे. जमल्यास फोन मध्ये ऑटो ब्राइटनेस नेहमी चालू ठेवा.

3) ऍप करा क्लोज

फोन मध्ये गेम खेळत असताना एखादे काम आल्यास होम बटण दाबून किंवा फोन लॉक करून तुम्ही तुमचे काम करता. इंटरनेट सर्फिंग, सोशल मीडिया ऍप किंवा कॅमेरा वापरल्यानंतर पण अनेकजण होम बटण दाबून ते बंद करतात. पण तुम्हाला सांगू इच्छितो कि फक्त होम बटण दाबल्यामुळे ते फंक्शन पूर्णपणे बंद होत नाही उलट बॅकग्रांउड मध्ये ऍक्टिव्ह राहते आणि बॅटरी त्यासाठी वापरली जाते. त्यामुळे एखादा ऍप किंवा फीचर वापरल्यानंतर ते क्लोज म्हणजे बंद जरूर करा.

4) लोकेशन सर्विस करा बंद

जेव्हा एखादा नवीन ऍप फोन मध्ये इंस्टाल केला जातो तेव्हा त्याला लोकेशनचा ऍक्सेस पण दिला जातो. फोन मध्ये अनेक अशे ऍप्स असतात जे लोकेशन सतत ऍक्सेस करत असतात. हे ऍप्स सतत लोकेशन सर्विसशी कनेक्टेड असतात आणि यामुळे बॅटरी पण वापरली जाते. ज्या ऍप्सची गरज नाही त्यांची लोकेशन सर्विस स्टॉप करा आणि आवश्यक नसेल तर लोकेशन सर्विसच बंद करा.

5) बॅकग्रांउड रनिंग ऍप करा डि-एक्टिवेट

लोकेशन सर्विस प्रमाणेच अनेक डाउनलोडेड आणि प्री लोडेड ऍप्स आहेत जे चौवीस तास इंटरनेटशी कनेक्टेड राहतात. इंटरनेटशी कनेक्टेड राहिल्यामुळे एकीकडे इंटरनेट डेटा तर संपतोच पण सोबत बॅटरी पण खर्च होत असते. इथेही ज्या ऍपची गरज नसेल त्याचे बॅकग्रांउड रनिंग डिएक्टिवेट करा.

6) गरज असल्यास वाइब्रेशन आणि हॅप्टिक्स करा सेट

फोन कॉल असो वा मेसेज, नोटिफिकेशन्ससाठी रिंग सोबतच फोन वाइब्रेट पण होतो. जर तुम्ही व्हाट्सऍप वर चॅटिंग करत असाल तर फोन वारंवार वाइब्रेट होतो. त्याचबरोबर टाईप करताना ‘की’ प्रेस केल्यावर आवाज येतो. हा आवाज आणि वाइब्रेशन पण फोनची बॅटरी खातो. त्यामुळे गरज नसल्यास फोन वाइब्रेशन आणि हॅप्टिक्स बंद ठेवा.

7) ऑटो लॉक ड्यूरेशन टाईम ठेवा कमी

फोन वापरल्यानंतर जेव्हा पॉकेट किंवा टेबल वर ठेवता तेव्हा काही काळ स्क्रीन लाइट चालू असते. काहीजण फोन मध्ये आपल्या आवडीचा स्क्रीन सेवर आणि वॉलपेपर ठेवतात, जो फोन वापरात नसल्यास डिस्प्ले वर येतो. पण या फीचर्स मुळे फोनची बॅटरी खर्ची पडते. त्यामुळे बॅटरी जास्त वेळ वापरण्यासाठी स्क्रीन ऑफ करा किंवा ऑटो लॉक ड्यूरेशन टाईम कमी करा.

8) विनाकारण वाई-फाई / ब्लूटूथ ऑन ठेऊ नका

आजकाल वायरलेस ब्लूटूथ हेडफोनचा ट्रेंड सुरु आहे. स्मार्टफोन यूजर मोठ्या प्रमाणात अश्या ऍक्सेसरीज वापरत आहेत. सहाजिक आहे कि वाई-फाई आणि ब्लूटूथ पण फोन बॅटरी वापरतात. त्यामुळे गरज नसल्यास फोन मध्ये वाई-फाई आणि ब्लूटूथ सारखे फीचर्स बंद करा.

9) फ्लाइट मोडची मदत घ्या

फोनची बॅटरी खूप कमी झाली असेल आणि चार्ज करण्याचा ऑप्शन नसेल तर फोन फ्लाइट मोड वर टाकणे केव्हाही चांगले. आणि जेव्हा जास्त गरज असेल तेव्हा फ्लाइट मोड बंद करून कॉल करा. लक्षात घ्या फोन ऑफ करून ऑन करण्यात जास्त बॅटरी खर्च होते आणि फ्लाइट मोड वर फोन ऑन ठेवल्याने बॅटरी कमी खर्च होते.

10) बॅटरी ड्रेन होण्याआधीच करा चार्ज

जर तुम्हाला तुमच्या फोनची बॅटरी कोणत्याही बिघडाविना दीर्घकाळ वापरायची असेल तर बॅटरीची काळजी घेतली पाहिजे. बॅटरीची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी बॅटरी दरवेळी कमीत कमी 20 टक्क्यांवर चार्ज करावी, बॅटरी यापेक्षा जास्त ड्रेन होऊ देऊ नये.

The post जर तुम्हाला पण सतावत असेल ‘लो बॅटरी’ ची भीती, तर या 10 ट्रिक्स वापरून मिळवू शकता चांगला बॅकअप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-your-android-smartphone-iphone-battery-backup-last-longer-know-10-tips-and-tricks/feed/ 0