स्लो चार्ज होत आहे का तुमचा स्मार्टफोन? जाणून घ्या कारणे आणि स्वतःच करा उपाय

नवीन स्मार्टफोन घेताना आपण फोनचा लुक, कॅमेरा आणि प्रोसेसर सारख्या प्वाइंट्स सोबतच त्याच्या बॅटरीला पण तेवढेच महत्व देतो. असे करणे आवश्यक आहे, कारण जेव्हा फोन मध्ये चांगली बॅटरी नसते तेव्हा त्यात असलेल्या इतर गोष्टी पण निरुपयोगी होतात. महागडा फोन पण कामाचा राहत नाही जेव्हा त्यात बॅटरी नसते. सध्या स्मार्टफोन कंपन्या व ब्रँड्स मोठ्या बॅटरी सोबतच फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण घेऊन येत आहेत. पण एका वेळेनंतर फोन बॅटरीचा बॅकअप कमी होऊ लागतो हे तुम्ही पहिले असेल आणि चार्जिंग पण स्लो होते. फोनचा चार्जिंग स्पीड कमी होतो याकडे आपले कधी लक्ष जास्त जात नाही. अशी अनेक कारणे आहेत ज्यांच्यामुळे स्मार्टफोनचा चार्जिंग स्पीड स्लो होतो. जर तुमचा स्मार्टफोन पण चार्ज होण्यास जास्त वेळ घेत असेल तर पुढे आम्ही काही अश्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मोबाईल फोन फास्ट चार्ज करू शकाल.

1. ओरिजनल चार्जरचा करा वापर

अनेकदा फोन बॉक्स मध्ये आलेला चार्जर हरवतो किंवा बिघडतो. त्यानंतर स्वस्त मिळतोय म्हणून लोक कोणत्याही लोकल चार्जरने फोन चार्ज करतात. असे केल्याने फक्त फोन स्लो चार्ज होतो असे नाही तर असा डुप्लिकेट किंवा नकली चार्जरच फोनची बॅटरी मध्ये ब्लास्ट होण्यामागे कारण बनतो, जे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

2. डुप्लिकेट डेटा केबल पासून लांब रहा

अनेकदा चार्जर सोबत येणारी यूएसबी केबल तुटते किंवा खराब होते. त्यानंतर लोक फक्त मोबाईलच नाही तर आता कोणत्याही डिवाईसच्या डेटा केबलने आपला फोन चार्ज करू लागतात. चार्जर प्रमाणेच नकली यूएसबी केबलचा वापर फक्त फोन स्लो चार्ज करत नाही तर सोबतच बॅटरीचे स्वास्थ्य पण बिघडवतो. असे सतत केल्याने कालांतराने फोनची बॅटरी पूर्णपणे खराब होते आणि मग फोन कामातून जातो.

3. फोन कवर काढून चार्ज करा

लुक आणि डिजाईनमुळे आता असे फोन्स बनणे बंद झाले आहेत ज्यांचा बॅक कवर काढून बॅटरी काढता येते. आता फोन्सची बॅटरी रिमूवेबल नसते. तसेच स्टाईल व सुरक्षेसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फोन कवरचा पण वापर करतात. विशेष म्हणजे जेव्हा फोन चार्ज केला जातो तेव्हा बॅटरी हीट रिलीज करते. त्यामुळे कवर असल्यास उष्णता अडकून राहते आणि बाहेर जात नाही. फोन गरम झाल्यामुळे बॅटरीची इफिशन्सी म्हणजे क्षमता पण कमी होते. कवर नसेल तर हीट बाहेर निघेल तसेच फोन फास्ट चार्ज होईल.

4. हे मोड्स करा ऑन

फोनची बॅटरी जेव्हा खूप कमी होते तेव्हा चार्जिंग आणि प्रोसेसिंगचा जास्त लोड पडतो. लो बॅटरी असताना लोकेशन, जीपीएस, डेटा व सिंक इत्यादि बंद केल्यास बॅटरीची खपत कमी होईल आणि तिला चार्ज होण्यास सपोर्ट मिळेल. अश्यावेळी फोन मधील Power saving mode व असे इतर ऑप्शन ऑन करा जे बॅकग्राउंड ऍप्स चालू देत नाहीत म्हणजे स्मार्टफोन वेगाने चार्ज होईल.

5. स्विच ऑफ करून करा चार्ज

चार्जिंग चालू असताना फोनचा वापर केला नाही तर चांगलेच किंवा फोन थोडा वेळ स्विच ऑफच करावा. असे केल्याने फोनची सेल्युलर कनेक्टिविटी खंडित होईल आणि फोन वेगाने चार्ज होण्यास सुरवात होईल. तर दुसरीकडे फोन थोडा वेळ स्विच ऑफ केल्याने फोनच्या बॅटरी व प्रोसेसिंगला पण आराम मिळतो आणि त्यांची क्षमता वाढते.

वरील सर्व टिप्स तुम्ही पण वापरा आणि इतरांना पण सांगा. कारण हे उपाय फोन वेगाने चार्ज करण्यास मदत करतील तसेच तुमच्या स्मार्टफोनची हेल्थ मेन्टेन करण्यास आणि त्याचे आयुष्य वाढवण्यास मदत करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here