Best Xiaomi Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 May 2021 14:09:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5 Redmi Smartphone जे आहेत खूप दमदार https://www.91mobiles.com/marathi/best-redmi-phone-under-rs-15000-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/best-redmi-phone-under-rs-15000-in-india/#respond Thu, 13 May 2021 14:09:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10927 हे फोन 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध झाले आहेत. जर तुम्ही पण शाओमी फोन घेऊ इच्छित असाल आणि बजेट 15,000 रुपये असेल तर पुढे आम्ही 5 चांगल्या फोनची माहिती दिली आहे ज्यात तुम्ही तुमच्यासाठी निवड करू शकता.

The post 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5 Redmi Smartphone जे आहेत खूप दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जरी हायरेंजमध्ये Apple आणि Samsung चा दबदबा असला तरी 10,000 रुपयांपासून 15,000 रुपयांचा सेगमेंट पाहता इथे Redmi किंग आहे. कंपनीकडे एकापेक्षा एक शानदार फोन आहेत जे युजर्सना खूप आवडले आहेत. सर्वात खास बाब अशी कि जवळपास दर तीन महिन्यांनी कंपनी बजेट सेगमेंट पोर्टफोलियो बदलते. त्यामुळे युजर्सना काहीतरी नवीन मिळते. या बजेटमध्ये शाओमी रेडमी नोट सीरीज उपलब्ध आहे आणि जर 2021 बघितले तर कंपनीने खूप शानदार फोन सादर केले आहेत. खासकरून रेडमी नोट 10 सीरीज तर लोकांना खूप आवडत आहे. सर्वात खास बाब अशी म्हणता येईल कि हे फोन 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध झाले आहेत. जर तुम्ही पण शाओमी फोन घेऊ इच्छित असाल आणि बजेट 15,000 रुपये असेल तर पुढे आम्ही 5 चांगल्या फोनची माहिती दिली आहे ज्यात तुम्ही तुमच्यासाठी निवड करू शकता. (Best Redmi Phone under Rs 15000 in India

Redmi Note 10S

Redmi Note 10S सध्या कंपनीचा सर्वात नवीन फोन आहे आणि स्पेसिफिकेशन खूप चांगले आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 6.43 इंचाची फुलएचडी+ पंच होल एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन MediaTek Helio G95 चिपसेटवर चालतो आणि यात 6जीबी रॅम आहे. तसेच 64जीबी आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. अँड्रॉइड 11 आधारित या फोनमध्ये मीयुआय 12.5 मिळेल.

कॅमेरा पाहता शाओमी रेडमी नोट 10एस मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा मेन सेंसर 64 MP चा आहे. तसेच 8 MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 MP चा मॅक्रो आणि 2 MP चा डेप्थ सेंसर उपलब्ध आहे. फ्रंट पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.

Redmi Note 10

Redmi Note 10

शआोमीच्या नोट 10 सीरीजचा सर्वात स्वस्त फोन Redmi Note 10 आहे. या फोनमध्ये पण तुम्हाला 6.43 इंचाची FHD+ AMOLED स्क्रीन Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शनसह मिळते. तसेच प्रोसेसिंगसाठी हा Qualcomm च्या सर्वात नवीन Snapdragon 678 SoC वर चालतो. यात 4 GB RAM सह 64GB मेमरी आणि 6GB RAM सह 128GB ची स्टोरेज मिळते आणि दोन्ही मॉडेल 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. फोटोग्राफीसाठी यात 48 MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8 MP अल्ट्रा-वाइड, 2 MP चा मॅक्रो आणि 2 MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला 13MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जरसह मिळते.

Redmi Note 9 Pro Max

Redmi note 9 pro max

Xiaomi Redmi Note 9 Pro Max मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे आणि मेन कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. दुसरा सेंसर 8 मेगापिक्सलचा आहे जो अल्ट्रा वाइड अँगल लेंसला सपोर्ट करतो. तिसरा सेंसर 5 MP ची मॅक्रो लेंस आहे आणि चौथा 2 MP चा डेफ्थ सेंसर उपलब्ध आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 32 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Xiaomi Redmi Note 9 Pro Max अँड्रॉइड 10 वर चालतो तर प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5020 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 9 Pro

Redmi Note 9 Pro

Redmi Note 9 Pro पण एक चांगला विकल्प आहे. हा फोन लॉन्च होऊन अजून एकवर्ष पण झाले नाही परंतु अजूनही हा मागे नाही. या फोनमध्ये 6.67-इंचाचा पंच-होल फुल HD+ देण्यात आली आहेत जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720G चिपसेटवर चालतो आणि यात ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने हा 4GB आणि 6GB रॅममध्ये सादर केला आहे त्याचबरोबर 64GB आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट उपलब्ध आहे. रियर पॅनलवर 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप आहे. दुसरा सेंसर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड, तिसरा 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि चौथा 2MP डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात पण 5,020 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जो 18 वॉट चार्जिंगसह येतो.

Redmi 9 Power

Xiaomi Redmi Note 9 Power

यानंतर पण जर तुम्हाला शाओमीचा मोठा बॅटरी असलेला एखादा फोन घ्यायचा असेल तर Redmi 9 Power बघू शकता. फोनमध्ये 6.53 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर चालतो आणि यात मीयुआय 12 मिळेल. प्रोसेसिंगसाठी क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर आहे आणि याला 4 GB आणि 6 GB RAM ची ताकद देण्यात आली आहे. यात पण रियर पॅनलवर क्वाड कॅमेरा आहे. मेन कॅमेरा 48 MP चा आहे तर दुसरा 8 MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आहे. तसेच 2 MP चा मॅक्रो आणि 2 MP चा डेफ्थ कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वाॅट फास्ट चार्जिंगसह 6,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5 Redmi Smartphone जे आहेत खूप दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-redmi-phone-under-rs-15000-in-india/feed/ 0
10,000 च्या बजेट मध्ये टॉप 5 शाओमी फोन्स https://www.91mobiles.com/marathi/best-xiaomi-phones-under-rs-10000/ https://www.91mobiles.com/marathi/best-xiaomi-phones-under-rs-10000/#respond Wed, 08 May 2019 13:34:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4275 पुढे आम्ही अशाच 5 दमदार फोन्सची माहिती दिली नाही.

The post 10,000 च्या बजेट मध्ये टॉप 5 शाओमी फोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतातील नंबर 1 स्मार्टफोन निर्माता कंपनी बनली आहे. कंपनीचे फोन भारतीय यूजर हातोहात घेतात. सर्वात खास बाब शी कि प्राइस नुसार शाओमीच्या स्पेसिफिकेशनची बरोबरी कोणीच करू शकत नाही. कंपनीने सुरवातीपासून कमी बजेट ध्यानात ठेवला आहे आणि आज पण असेच आहे. 10 हजारच्या बजेट मध्ये पण कंपनीकडे दमदार फोन आहेत. पुढे आम्ही अशाच 5 दमदार फोन्सची माहिती दिली नाही.

शाओमी Redmi 7

अलीकडे शाओमी ने कमी किंमतीत Redmi 7 मॉडेल भारतात लॉन्च केला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.26 इंचाची सक्रीन आहे जिचे ​स्क्रीन रेजल्यूशन 1520 × 720 पिक्सल आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला 5 कोटेड आहे. कंपनी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 1.8 गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी, 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहे. फोन मध्ये फोटोग्राफी साठी एफ/2.2 अपर्चर सह 12-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी Redmi Y3

10 हजार रुपयांपेक्षा कमी मध्ये शाओमीचा Redmi Y3 पण दमदार फोन आहे. हा फोन कंपनी ने खासकरून सेल्फी साठी सादर केला आहे. या फोन मध्ये 6.26-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले आहे जो गोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. फोन वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला गेला आहे. शाओमी Redmi Y3 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा प्रोसेसर आहे. फोटोग्राफी साठी Redmi Y3 के रियर मध्ये AI डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 32 एमपी चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी Redmi Note 7

शाओमी Redmi Note 7 पण चांगला फोन आहे. एंडरॉयड 9 पाई सह सादर करण्यात आलेल्या या फोन मध्ये 6.3—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर सादर केला गेला आहे जो या रेंज मधील बेस्ट प्रोसेसर आहे. सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तथा 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi Note 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच की दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

शाओमी Redmi Go

कमी किंमतीत शाओमीचा Redmi Go फोन पण काफी खूप चांगला म्हणता येईल. या फोन मध्ये 5-इंचाची एचडी स्क्रीन आहे. कंपनीने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर सादर केला आहे आणि यात 1.4गीगाहट्र्ज चा क्वॉडकोर प्रोसेसर मिळेल. सोबत 1जीबी रॅम मेमरी आणि 8जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 गो एडिशन वर चालतो. फोटोग्राफी पाहता यात 8-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच की बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी पण थोडी कमी आहे.

शाओमी Redmi 6A

शाओमी Redmi 6A थोडा जुना झाला आहे पण आता पण चांगला ऑप्शन आहे. या फोन मध्ये 5.45—इंचाची एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन दिली आहे. हा फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाले फुल व्यू डिसप्ले सह येतो. फोन मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे. कंपनी ने हा मीडियाटेक हेलिया ए22 चिपसेट सह सादर केला आहे. फोन मध्ये 2.0गीगाहट्र्ज चा प्रोसेसर आहे. यात 2जीबी रॅम मेमरी सह 16जीबी व 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी Redmi 6A मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर आणि 5—मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे.

The post 10,000 च्या बजेट मध्ये टॉप 5 शाओमी फोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-xiaomi-phones-under-rs-10000/feed/ 0
हे शाओमी स्मार्टफोन होतील नवीन आणि एडवांस मीयूआई 11 ने अपडेट, बघा तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/miui-11-update-xiaomi-mi-redmi-mix-smartphone-list-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/miui-11-update-xiaomi-mi-redmi-mix-smartphone-list-in-marathi/#respond Fri, 15 Feb 2019 14:01:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3641 मीयूआई जून पासून वरील स्मार्टफोन्स वर अपडेट व्हायला सुरुवात होईल.

The post हे शाओमी स्मार्टफोन होतील नवीन आणि एडवांस मीयूआई 11 ने अपडेट, बघा तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने कालच घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 28 फेब्रुवारीला भारतात आपल्या रेडमी ब्रॅण्डचा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 7 लॉन्च करणार आहे. शाओमीच्या अन्य स्मार्टफोन्स प्रमाणे रेडमी नोट 7 ची वाट पण टेक यूजर्स उत्सुकतेने बघत आहेत. शाओमीचे स्मार्टफोन लोकांना आवडतात कारण हि कंपनी कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स देते तसेच वेळोवेळी आपल्या फोनचे सॉफ्टवेयर व आपरेटिंग सिस्टम पण अपडेट करत असते. गेल्याच महिन्यात कंपनीने आपल्या नवा यूजर इंटरफेस मीयूआई 11 सादर केला होता, तसेच आता त्या स्मार्टफोन्सची लिस्ट पण समोर आली आहे जे लवकरच मीयूआई 11 ने अपडेट होतील.

शाओमी ने मीयूआई 11 अजून अधिकृतपणे रोल आउट केला नाही. शाओमीचा हा यूजर इंटरफेस खूपच एडवांस फीचर्स सह येईल. शाओमीचे सीईओ लेई जून यांच्यानुसार मीयूआई चा हा नवा अपडेट यूजर इंटरफेसचा अनुभव वरच्या थराला नेईल. मीयूआई 11 मध्ये स्मार्टफोनच्या ऑपरेशन पासून फोन मधील ऍपचा वापर, कॅमेरा फीचर्स तसेच इतर सेटिंग्स पण पहिल्यापेक्षा अटरेक्टिव आणि एडवांस होतील.

मी सीरीजचे हे फोन होतील मीयूआई 11 ने अपडेट

शाओमी मी 9,
मी 8,
मी 6एक्स,
मी 6,
मी 5एक्स,
मी 5सी,
मी 5एस,
मी 5एस प्लस,
मी प्ले

मिक्स सीरीजचे हे फोन होतील मीयूआई 11 ने अपडेट

मी मिक्स 3,
मी मिक्स 2एस,
मी मिक्स 2,
मी मिक्स 1
मी नोट 2,
मी नोट 3,
मी मॅक्स 2,
मी मॅक्स,
मी मॅक्स 3

रेडमी सीरीजचे हे फोन होतील मीयूआई 11 ने अपडेट

रेडमी नोट 7,
रेडमी 6 प्रो,
रेडमी नोट 7 प्रो,
रेडमी नोट 5,
रेडमी नोट 5 प्रो,
रेडमी नोट 5ए,
रेडमी नोट 4,
रेडमी नोट 4एक्स,
रेडमी नोट 6,
रेडमी नोट 6 प्रो,
रेडमी 6,
रेडमी 6ए,
रेडमी 5,
रेडमी 5ए,
रेडमी 5 प्लस,
रेडमी 4,
रेडमी 4ए,
रेडमी 4एक्स,
रेडमी 3एस/3एक्स,
रेडमी एस2

हि लिस्ट शाओमी कडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही पण परदेशी मीडिया ने हि लिस्ट शेयर केली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि मीयूआई जून पासून वरील स्मार्टफोन्स वर अपडेट व्हायला सुरुवात होईल.

The post हे शाओमी स्मार्टफोन होतील नवीन आणि एडवांस मीयूआई 11 ने अपडेट, बघा तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/miui-11-update-xiaomi-mi-redmi-mix-smartphone-list-in-marathi/feed/ 0
शाओमी चा अजून एक डाव, लॉन्च केला शानदार स्मार्टफोन रेडमी एस2, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-launched-feature-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-launched-feature-price-specifications-in-marathi/#respond Thu, 10 May 2018 12:14:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=395 शाओमी रेडमी एस2 ला कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे.

The post शाओमी चा अजून एक डाव, लॉन्च केला शानदार स्मार्टफोन रेडमी एस2, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी च्या रेडमी सीरीज च्या स्मार्टफोन एस2 बद्दल खुप काळापासून लीक येत होते. काही दिवसांपूर्वी कंपनी ने स्वतः या फोन ची माहिती देत 10 मे ला रेडमी एस2 लॉन्च केला जाईल अशी घोषणा केली होती आणि आज शाओमी फॅन्सना नवीन स्मार्टफोन ची भेट देत कंपनी ने रेडमी एस2 को लॉन्च ​केला आहे. शाओमी कडून रेडमी एस2 सध्यातरी फक्त चीनी बाजारात सादर करण्यात आला आहे जो आगामी काही दिवसांमध्ये भारता सह अंर्तराष्ट्रीय बाजारात येईल.

शाओमी रेडमी एस2 ला कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी आणि 32जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट ची इंटरनल स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. शाओमी ने 3जीबी रॅम वेरिंएट 999 चीनी युआन aani 4जीबी रॅम वेरिएंट 1,299 युआन मध्ये लॉन्च केला आहे. भारतीय करंसी अनुसार ही किंमत क्रमश: 10,500 रुपये आणि 13,700 रुपयांच्या आसपास आहे.

शाओमी रेडमी एस2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी एस2 च्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये शाओमी रेडमी एस2 ग्रे, पिंक आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post शाओमी चा अजून एक डाव, लॉन्च केला शानदार स्मार्टफोन रेडमी एस2, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-launched-feature-price-specifications-in-marathi/feed/ 0