15,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5 Redmi Smartphone जे आहेत खूप दमदार

Best Xiaomi Phone under rs 15000

जरी हायरेंजमध्ये Apple आणि Samsung चा दबदबा असला तरी 10,000 रुपयांपासून 15,000 रुपयांचा सेगमेंट पाहता इथे Redmi किंग आहे. कंपनीकडे एकापेक्षा एक शानदार फोन आहेत जे युजर्सना खूप आवडले आहेत. सर्वात खास बाब अशी कि जवळपास दर तीन महिन्यांनी कंपनी बजेट सेगमेंट पोर्टफोलियो बदलते. त्यामुळे युजर्सना काहीतरी नवीन मिळते. या बजेटमध्ये शाओमी रेडमी नोट सीरीज उपलब्ध आहे आणि जर 2021 बघितले तर कंपनीने खूप शानदार फोन सादर केले आहेत. खासकरून रेडमी नोट 10 सीरीज तर लोकांना खूप आवडत आहे. सर्वात खास बाब अशी म्हणता येईल कि हे फोन 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध झाले आहेत. जर तुम्ही पण शाओमी फोन घेऊ इच्छित असाल आणि बजेट 15,000 रुपये असेल तर पुढे आम्ही 5 चांगल्या फोनची माहिती दिली आहे ज्यात तुम्ही तुमच्यासाठी निवड करू शकता. (Best Redmi Phone under Rs 15000 in India

Redmi Note 10S

Redmi Note 10S सध्या कंपनीचा सर्वात नवीन फोन आहे आणि स्पेसिफिकेशन खूप चांगले आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 6.43 इंचाची फुलएचडी+ पंच होल एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन MediaTek Helio G95 चिपसेटवर चालतो आणि यात 6जीबी रॅम आहे. तसेच 64जीबी आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. अँड्रॉइड 11 आधारित या फोनमध्ये मीयुआय 12.5 मिळेल.

कॅमेरा पाहता शाओमी रेडमी नोट 10एस मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा मेन सेंसर 64 MP चा आहे. तसेच 8 MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 MP चा मॅक्रो आणि 2 MP चा डेप्थ सेंसर उपलब्ध आहे. फ्रंट पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.

Redmi Note 10

Redmi Note 10

शआोमीच्या नोट 10 सीरीजचा सर्वात स्वस्त फोन Redmi Note 10 आहे. या फोनमध्ये पण तुम्हाला 6.43 इंचाची FHD+ AMOLED स्क्रीन Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शनसह मिळते. तसेच प्रोसेसिंगसाठी हा Qualcomm च्या सर्वात नवीन Snapdragon 678 SoC वर चालतो. यात 4 GB RAM सह 64GB मेमरी आणि 6GB RAM सह 128GB ची स्टोरेज मिळते आणि दोन्ही मॉडेल 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. फोटोग्राफीसाठी यात 48 MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8 MP अल्ट्रा-वाइड, 2 MP चा मॅक्रो आणि 2 MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला 13MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जरसह मिळते.

Redmi Note 9 Pro Max

Redmi note 9 pro max

Xiaomi Redmi Note 9 Pro Max मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे आणि मेन कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. दुसरा सेंसर 8 मेगापिक्सलचा आहे जो अल्ट्रा वाइड अँगल लेंसला सपोर्ट करतो. तिसरा सेंसर 5 MP ची मॅक्रो लेंस आहे आणि चौथा 2 MP चा डेफ्थ सेंसर उपलब्ध आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 32 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Xiaomi Redmi Note 9 Pro Max अँड्रॉइड 10 वर चालतो तर प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5020 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 9 Pro

Redmi Note 9 Pro

Redmi Note 9 Pro पण एक चांगला विकल्प आहे. हा फोन लॉन्च होऊन अजून एकवर्ष पण झाले नाही परंतु अजूनही हा मागे नाही. या फोनमध्ये 6.67-इंचाचा पंच-होल फुल HD+ देण्यात आली आहेत जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 720G चिपसेटवर चालतो आणि यात ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने हा 4GB आणि 6GB रॅममध्ये सादर केला आहे त्याचबरोबर 64GB आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट उपलब्ध आहे. रियर पॅनलवर 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप आहे. दुसरा सेंसर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड, तिसरा 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि चौथा 2MP डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात पण 5,020 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जो 18 वॉट चार्जिंगसह येतो.

Redmi 9 Power

Xiaomi Redmi Note 9 Power

यानंतर पण जर तुम्हाला शाओमीचा मोठा बॅटरी असलेला एखादा फोन घ्यायचा असेल तर Redmi 9 Power बघू शकता. फोनमध्ये 6.53 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर चालतो आणि यात मीयुआय 12 मिळेल. प्रोसेसिंगसाठी क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर आहे आणि याला 4 GB आणि 6 GB RAM ची ताकद देण्यात आली आहे. यात पण रियर पॅनलवर क्वाड कॅमेरा आहे. मेन कॅमेरा 48 MP चा आहे तर दुसरा 8 MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आहे. तसेच 2 MP चा मॅक्रो आणि 2 MP चा डेफ्थ कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वाॅट फास्ट चार्जिंगसह 6,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here