Broadband - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 24 Mar 2020 12:35:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/#respond Tue, 24 Mar 2020 12:34:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6873 जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

The post Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने अलीकडेच कोरोना वायरसमुळे वर्क फ्रॉम होम करत असलेल्या यूजर्ससाठी एक नवीन 251 रुपये असलेला प्लान सादर केला होता. मोबाईल यूजर्स नंतर आता कंपनीने ब्रॉडबँड यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

जियो त्या सर्व ठिकाणी हि ब्रॉडबँड सर्विस देईल जिथे भौगोलिकदृष्टया शक्य असेल. तसेच जियोफाइबरच्या जुन्या ग्राहकांना सर्व प्लान्स मध्ये आता डबल डेटा मिळेल. जियोने हे पाऊल वर्क फ्रॉम होम मध्ये अडचण येऊ नये म्हणून उचलले आहे.

राउटरचे पॅसे द्यावे लागतील

जियो यूजर्ससाठी बेसिक फाइबर कनेक्टिविटी फ्री असेल. पण यूजर्सना फक्त राउटरसाठी पॅसे दयावे लागतील. इतकेच नव्हे तर जियोच्या बेसिक प्लान मध्ये कोणतीही फेयर यूजेज पॉलिसी (FUP) नसेल, ज्याचा अर्थ असा आहे कि यूजर्स चांगल्या स्पीड वर इंटरनेट वापरू शकेल . जियोफाइबरच्या मंथली प्लानची सुरवात 699 रुपयांपासून होते.

याव्यतिरिक्त कंपनीने अलीकडेच 251 रुपयांचा ‘Work From Home Pack’ सादर केला होता. जियोच्या ‘Work From Home Pack’ बद्दल बोलायचे तर या प्लानची किंमत 251 रुपये आहे आणि हा पॅक फक्त प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला गेला आहे. या पॅक मध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा रोज मिळेल. तसेच 2 जीबी डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64 kbps होईल. या पॅकची वॅलिडिटी 51 दिवस आहे.

त्याचबरोबर रिलायंस जियो ने घोषणा केली आहे कि ते आपल्या 4G डेटा ऍड-ऑन वाउचर्स वर दुप्पट डेटा देतील. कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांचे डेटा वाउचर अपग्रेड केले होते. या लिस्ट मध्ये येणाऱ्या 251 रुपयांच्या वाउचर मध्ये कोणताही बदल केला गेला नाही. या वाउचर मध्ये जुनेच फायदे मिळतील.

रिलायंस जियोच्या 11 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी 400MB डेटा मिळत होता. पण बदलानंतर या प्लान मध्ये 800MB डेटा सह 75 मिनिट्स जियो ते नॉन जियो कॉलिंग मिनिट्स मिळत आहे. तर 21 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 1 GB डेटा देत होती. पण आता 2 GB डेटा दिला जात आहे. तसेच प्लान मध्ये नॉन जियो नेटवर्क वर 200 कॉलिंग मिनिट्स मिळत आहेत.

51 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 3GB डेटा देत होती. पण आता या वाउचर मध्ये 6 GB डेटा मिळत आहे. तसेच वाउचर मध्ये जियो टू नॉन जियो नेटवर्क वर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स मिळत आहेत. 101 रुपयांच्या डेटा प्लान मध्ये कंपनी आधी 6 GB डेटा ऑफर करत होती, आता कंपनी यात 12 GB डेटा ऑफर करत आहे. त्याचबरोबर नॉन जियो नंबर्स वर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स मिळत आहेत.

The post Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/feed/ 0
जियो फाइबर होणार आहे लॉन्च, 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल अनलिमिटेड वीडियो व वॉयस कॉल आणि 100एमबीपीएस स्पीड ने हाईस्पीड डाटा https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-100-mbps-broadband-unlimited-video-call-unlimited-voice-call-in-rs-1000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-100-mbps-broadband-unlimited-video-call-unlimited-voice-call-in-rs-1000-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 11:04:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=715 आगामी दिवसांमध्ये रिलायंस जियो आपली हाईस्पीड इंटरनेट​ सर्विस जियो फाइबर अधिकृत रीत्या लॉन्च करेल जी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या सर्कल्स मध्ये रोल आउट होत राहील.

The post जियो फाइबर होणार आहे लॉन्च, 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल अनलिमिटेड वीडियो व वॉयस कॉल आणि 100एमबीपीएस स्पीड ने हाईस्पीड डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जियो बद्दल महिन्याच्या सुरवातीला बातमी आली होती की कंपनी ने ब्रॉडबँड सर्विस क्षेत्रात पाऊल टाकून आपल्या हाईस्पीड इंटरनेट सर्विस ‘जियो फाइबर’ ची सुरवात केली आहे. माहिती मिळाली होती की जियो ने हाई स्पीड फाइबर टू द होम (FTTH) ची सुरवात केली आहे आणि जियो ने काही निवडक सर्कल्स मध्ये हे ब्रॉडबँड कनेक्शन वापरण्यासाठी सादर केला आहे. जियो 4,500 रुपये सिक्योरिटी डिपॉजिट वर 100जीबी मोफत डाटा सह एक महीन्यात 1,100 जीबी पर्यंत डाटा देत होती. तसेच आता एक नवीन बातमी येत आहे की जियो लवकरच आपली ब्राॅडबँड सर्विस संपूर्ण देशात लॉन्च करणार आहे.

लाइवमिंट ने ​आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की जियो आपली हाईस्पीड इंटरनेट​ सर्विस ‘जियो फाइबर’ लवकरच संपूर्ण देशात कमर्शियल रुपात लॉन्च करू शकते. रिपोर्ट नुसार जियो फाइबर मध्ये ग्राहकांना 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हाईस्पीड इंटरनेट ​दिले जाईल जी 100 एमबीपीएस च्या स्पीड ने चालेल. जियो च्या या प्लान मध्ये फास्ट इंटरनेट सह अनलिमिटेड वॉयस कॉल आणि अनलिमिटेड वीडियो कॉल पण आहेत. जियो फाइबर चा हा प्लान 1,000 रुपयांपेक्षा कामी किंमतीत यूजर्सना वापरायला मिळेल.

विशेष म्हणजे सध्या जियो फाइबर काही ठिकाणी डेमो स्वरुपात काम करत आहे जी येणार्‍या दिवसांमध्ये कमर्शियली लॉन्च होईल. आता जियो फाइबर चे ब्राॅडबँड कनेक्शन मिळवण्यासाठी यूजर्सना 4,500 रुपये सिक्योरिटी डिपॉजिट द्यावे लागेल. हा हाई स्पीड फाइबर टू द होम (FTTH) वर चालतो. यात जियो यूजर्सना एका महिन्यात 25 वेळा डाटा रिचार्ज करण्याचा आॅप्शन मिळत आहे. ज्यात प्रत्येक वेळी कस्टमर 40जीबी डाटा पर्यंतचा रिचार्ज करू शकतात. तसेच कंपनी कडून 100 जीबी फ्री दिला जात आहे. अशा प्रकारे जियो फाइबर यूजर्सना एकूण एका महिन्यात 1,100 जीबी डाटा चा फायदा मिळत आहे.

पण जियो फाइबर देशात आॅफिशियली रोलआउट झाल्यावर कंपनी च्या आॅफर्स काय असतील आणि कोणत्या किंमतीत जियो यूजर्सना प्लान्स दिले जातील यासाठी जियो च्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल. विशेष म्हणजे जियो आपली अजून एक नवीन सर्विस इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविजन (आईपीटीवी) वर पण काम करत आहे आणि याच्या मदतीने जियो फाइबर टीवी शी जोडता येईल.

आशा आहे की आगामी दिवसांमध्ये रिलायंस जियो आपली हाईस्पीड इंटरनेट​ सर्विस जियो फाइबर अधिकृत रीत्या लॉन्च करेल जी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या सर्कल्स मध्ये रोल आउट होत राहील.

The post जियो फाइबर होणार आहे लॉन्च, 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल अनलिमिटेड वीडियो व वॉयस कॉल आणि 100एमबीपीएस स्पीड ने हाईस्पीड डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-100-mbps-broadband-unlimited-video-call-unlimited-voice-call-in-rs-1000-in-marathi/feed/ 0
डिसेंबर पासून प्रत्येक घरात असेल इंटरनेट, 2,50,000 ग्रामपंचायती सुपरफास्ट ब्रॉडबँड ने जोडण्याच्या योजने विषयी सरकार ने केले मोठे विधान https://www.91mobiles.com/marathi/broadband-connectivity-by-december-2018-to-gram-panchayats-bharatnet-dot-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/broadband-connectivity-by-december-2018-to-gram-panchayats-bharatnet-dot-in-marathi/#respond Mon, 21 May 2018 13:42:38 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=549 भारतनेट नावाने या मोहिमेची सुरुवात साल 2011 मध्ये झाली होती.

The post डिसेंबर पासून प्रत्येक घरात असेल इंटरनेट, 2,50,000 ग्रामपंचायती सुपरफास्ट ब्रॉडबँड ने जोडण्याच्या योजने विषयी सरकार ने केले मोठे विधान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येक घरात इंटरनेट सुविधा पोचवण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाला तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी खुप काळापासून भारत सरकार कार्यरत आहे. भारताच्या विकास आराखड्यातील हे एक स्वप्न लवकरच सत्यात येणार आहे. डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम (DoT) ने भारत सरकार च्या मिशन ‘भारतनेट’ बद्दल मोठी घोषणा केली आहे. टेलीकॉम विभाग ने सांगितले आहे की साल 2018 च्या डिसेंबर महिन्या पर्यंत देशातील 2,50,000 ग्रामपंचायती पूर्णपणे इंटनेट ब्राॅडबँड शी जोडल्या जातील.

भारत सरकार द्वारा सुरू असलेल्या भारतनेट प्रोग्राम ची डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम ने ठरलेली डेडलाईन बदलली आहे. 2,50,000 ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्शन देण्यासाठी भारत सरकार ने आधी मार्च 2019 ही वेळ मर्यादा ठरवली होती पण हा अवधी आता कमी करून डिसेंबर 2018 करण्यात आला आहे. म्हणजे देशातील लाखो गावे वर्षाच्या शेवटापर्यंत इंटरनेट शी जोडली जातील. या प्रोग्राम अंतर्गत सरकार चे लक्ष्य आहे की साल 2022 पर्यंत संपूर्ण देश इंटरनेट ने जोडलेला असेल आणि प्रत्येकाला कमीत कमी 50 एमबीपीएस चा स्पीड मिळेल.

विशेष म्हणजे भारतनेट प्रोग्राम अंतर्गत भारत सरकार गावांमध्ये आॅप्टीकल फाइबर टाकण्यात येत आहे. केंद्र सरकार कडून आता पर्यंत 1 लाखा पेक्षा जास्त गावांमध्ये ब्रॉडबँड लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. रिपोर्ट नुसार उरलेल्या जागा लवकरात लवकर कवर करण्यासाठी सरकार ने 31,000 कोटी रुपयांचा फंड संबंधित विभागांना दिला आहे ज्यामुळे 6—7 महिन्यांत 1.5 लाख गावांमध्ये ब्रॉडबँड लाईन चे काम लवकरच पूर्ण होईल.

देशाला गावे ब्राडबँड शी जोडण्याचा हा प्रोग्राम काही नवीन नाही. भारतनेट नावाने या मोहिमेची सुरुवात साल 2011 मध्ये झाली होती. त्यावेळी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची अंतिम तारीख डिसेंबर, 2013 ठरवण्यात आली होती पण काम पूर्ण होऊ शकले नाही आणि त्यामुळे ही डेडलाईन वाढवून सप्टेंबर 2015 करण्यात आली. यादरम्यान देशातील सरकार बदलले आणि प्रोजेक्ट पण नव्याने सुरू करण्यात आला.

आधी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची तारीख डिसेंबर 2016 ठेवण्यात आली होती पण काम पूर्ण न झाल्यामुळे ती मार्च 2019 करण्यात आली. असे पहिल्यांदाच झाले आहे की या प्रोजेक्ट डेडलाईन बदलण्यात आली आहे पण पुढे ढकलण्या ऐवजी ती कमी करण्यात आली आहे. कामची वेग आणि प्रगती पाहून डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम ने भारतनेट ची डेडलाईन मार्च 2019 वरून डिसेंबर 2018 केली आहे.

भारतनेट प्रोजेक्ट बद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचे असेल तर इथे क्लिक करा

The post डिसेंबर पासून प्रत्येक घरात असेल इंटरनेट, 2,50,000 ग्रामपंचायती सुपरफास्ट ब्रॉडबँड ने जोडण्याच्या योजने विषयी सरकार ने केले मोठे विधान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/broadband-connectivity-by-december-2018-to-gram-panchayats-bharatnet-dot-in-marathi/feed/ 0