Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा

Reliance Jio ने अलीकडेच कोरोना वायरसमुळे वर्क फ्रॉम होम करत असलेल्या यूजर्ससाठी एक नवीन 251 रुपये असलेला प्लान सादर केला होता. मोबाईल यूजर्स नंतर आता कंपनीने ब्रॉडबँड यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

जियो त्या सर्व ठिकाणी हि ब्रॉडबँड सर्विस देईल जिथे भौगोलिकदृष्टया शक्य असेल. तसेच जियोफाइबरच्या जुन्या ग्राहकांना सर्व प्लान्स मध्ये आता डबल डेटा मिळेल. जियोने हे पाऊल वर्क फ्रॉम होम मध्ये अडचण येऊ नये म्हणून उचलले आहे.

राउटरचे पॅसे द्यावे लागतील

जियो यूजर्ससाठी बेसिक फाइबर कनेक्टिविटी फ्री असेल. पण यूजर्सना फक्त राउटरसाठी पॅसे दयावे लागतील. इतकेच नव्हे तर जियोच्या बेसिक प्लान मध्ये कोणतीही फेयर यूजेज पॉलिसी (FUP) नसेल, ज्याचा अर्थ असा आहे कि यूजर्स चांगल्या स्पीड वर इंटरनेट वापरू शकेल . जियोफाइबरच्या मंथली प्लानची सुरवात 699 रुपयांपासून होते.

याव्यतिरिक्त कंपनीने अलीकडेच 251 रुपयांचा ‘Work From Home Pack’ सादर केला होता. जियोच्या ‘Work From Home Pack’ बद्दल बोलायचे तर या प्लानची किंमत 251 रुपये आहे आणि हा पॅक फक्त प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला गेला आहे. या पॅक मध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा रोज मिळेल. तसेच 2 जीबी डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64 kbps होईल. या पॅकची वॅलिडिटी 51 दिवस आहे.

त्याचबरोबर रिलायंस जियो ने घोषणा केली आहे कि ते आपल्या 4G डेटा ऍड-ऑन वाउचर्स वर दुप्पट डेटा देतील. कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांचे डेटा वाउचर अपग्रेड केले होते. या लिस्ट मध्ये येणाऱ्या 251 रुपयांच्या वाउचर मध्ये कोणताही बदल केला गेला नाही. या वाउचर मध्ये जुनेच फायदे मिळतील.

रिलायंस जियोच्या 11 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी 400MB डेटा मिळत होता. पण बदलानंतर या प्लान मध्ये 800MB डेटा सह 75 मिनिट्स जियो ते नॉन जियो कॉलिंग मिनिट्स मिळत आहे. तर 21 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 1 GB डेटा देत होती. पण आता 2 GB डेटा दिला जात आहे. तसेच प्लान मध्ये नॉन जियो नेटवर्क वर 200 कॉलिंग मिनिट्स मिळत आहेत.

51 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 3GB डेटा देत होती. पण आता या वाउचर मध्ये 6 GB डेटा मिळत आहे. तसेच वाउचर मध्ये जियो टू नॉन जियो नेटवर्क वर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स मिळत आहेत. 101 रुपयांच्या डेटा प्लान मध्ये कंपनी आधी 6 GB डेटा ऑफर करत होती, आता कंपनी यात 12 GB डेटा ऑफर करत आहे. त्याचबरोबर नॉन जियो नंबर्स वर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here