BSNL Offers - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Jul 2018 12:55:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/#respond Wed, 18 Jul 2018 12:55:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1307 बीएसएनएल ला अपेक्षा आहे की कंपनी पुढच्या वर्षी 2019 मध्ये आपली 5जी सर्विस लॉन्च करेल.

The post बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात इंटरनेट चा वापर सध्या जोरदार सुरू आहे. टेलीकॉम कंपन्यांनी स्वस्तात 4जी डेटा दिल्यामुळे देशातील स्मार्टफोन यूजर्स इंटरनेट चा भरपूर फायदा घेत आहेत. यात देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) 4जी क्षेत्रात खासगी कंपन्यापेक्षा मागे राहिली आहे. आणि हे बीएसएनएल च्या पण लक्षात आहे म्हणून कंपनी आता पूर्ण तयारी सह देशात 5जी सर्विस आणण्याचे प्रयत्न करत आहे. बीएसएनएल ने आपल्या यूजर्स साठी 5जी सर्विस घेऊन येण्या बाबत एक मोठी घोषणा केली आहे.

बीएसएनएल ने सांगितले आहे की कंपनी 5जी सर्विस वर काम करत आहे आणि लवकरच आपल्या यूजर्सना 5जी ची सेवा देऊ इच्छित आहे. बीएसएनएल ने 5जी सर्विस साठी काही अंर्तराष्ट्रीय टेलीकॉम कंपन्यां सोबत करार केले आहेत. या कंपन्यांमध्ये एनटीटी एडवांस टेक्नोलॉजी सोबतच प्रसिद्ध मोबाईल ब्रांड नोकिया पण आहे. बीएसएनएल ने सांगितले आहे की भारत संचार निगम लिमिटेड 5जी सेवेत मागे राहणार नाही आणि जगातील इतर देशां सोबतच ही सर्विस भारतात घेऊन येईल.

बीएसएनएल चे चीफ जनरल मॅनेजर अनिल जैन ने यांनी सांगितले की अंदाजे 2020 मध्ये 5जी सर्विस सुरू होईल, पण बीएसएनएल ला अपेक्षा आहे की कंपनी पुढच्या वर्षी 2019 मध्ये आपली 5जी सर्विस लॉन्च करेल. चीफ ने हे मान्य केले आहे की कंपनी ने 4जी मिस केली पण 5जी सर्विस च्या क्षेत्रात कंपनी मागे राहणार नाही. बीएसएनएल ची 5जी सर्विस मर्यादित काळातच संपूर्ण देशात सुरू करेल.

अनिल जैन ने सांगितले आहे की बीएसएनएल ने ​ग्राउंड लेवल वर 5जी ची टेस्टिंग सुरू केली आहे आणि यासाठी अनेक अंर्तराष्ट्रीय टेक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. जैन यांचे म्हणणे आहे की 5जी सर्विस बद्दल अनेक इंटरनेशनल कंपन्यांनी सुचना पाठवल्या आहेत तर काहींनी आपल्या नेटवर्क वर काम पण केले आहे. अनिल यांच्या नुसार जगभरात 5जी सर्विस साठी टेस्टिंग सुरू आहे. जर्मनी व चीन सह भारतात पण 5जी सर्विस वर अनेक टेस्ट केले जात आहेत.

विशेष म्हणजे बीएसएनएल 1 ऑगस्ट पासून भारतात ‘बीएसएनएल विंग्स’ ची सुरवात करणार आहे. बीएसएनएल विंग्स देशातील पहिली इंटरनेट टेलीफोनी सेवा आहे. हा एक असा अॅप आहे जो वापरून वीना कोणताही सिम कार्ड वाई-फाई वरून देशातील कोणत्याही मोबाइल नंबर वर कॉल करता येईल. या अॅप मधून मोबाइल नंबर सोबत लँडलाईन नंबर वर पण फ्री कॉल करता येईल.

सध्या व्हाट्सॅप सारख्या अॅप मधून आॅडियो किंवा वीडियो कॉल करण्यासाठी दुसर्‍या व्यक्ति च्या फोन मध्ये पण तोच अॅप्लीकेशन असणे गरजेचे आहे. पण बीएसएनएल विंग्स वापरण्यासाठी याची गरज नसेल. या अॅप मधून कोणत्याही नंबर वर डायरेक्ट कॉल करता येईल. विशेष म्हणजे या कॉलिंग साठी कोणत्याही सिम ची गरज नसेल, म्हणजे नो सिम नो डेटा पॅक.

बीएसएनएल विंग्स बद्दल अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

The post बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/feed/ 0
ईद च्या निमित्ताने बीएसएनएल ची भेट, 786 रुपयांमध्ये 150 दिवसांपर्यंत रोज 2जीबी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत https://www.91mobiles.com/marathi/bsnl-eid-mubarak-pack-786-rs-plan-for-150-days-2gb-data-daily-unlimited-voice-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-eid-mubarak-pack-786-rs-plan-for-150-days-2gb-data-daily-unlimited-voice-call-in-marathi/#respond Thu, 14 Jun 2018 13:30:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=910 कंपनी ने हा प्लान संपूर्ण देशात रोलआउट केला आहे.

The post ईद च्या निमित्ताने बीएसएनएल ची भेट, 786 रुपयांमध्ये 150 दिवसांपर्यंत रोज 2जीबी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम कंपन्या बाजारात चालू असलेल्या प्राइस वॉर मुळे जास्तीत जास्त यूजर्सना आकर्षित करू इच्छित आहे. कमी किंमतीत जास्त बेनिफिट देऊन प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन नवीन प्लान काढले जातात. रमजान च्या निमित्ताने आपल्या यूजर्सना नवीन भेट देत सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार ​निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 786 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. बीएसएनएल चा हा प्लान मोठया वॅलिडिटी वाल्या प्लान्स मध्ये चांगले फायदे देते.

बीएसएनएल ने 786 रुपयांचा ईद मुबारक पॅक प्रीपेड यूजर्स साठी सादर केला आहे. हा प्लान 150 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. बीएसएनएल आपल्या कस्टमर्सना या प्लान मध्ये रोज 2जीबी इंटरनेट डाटा देत आहे. रोज 2जीबी इंटरनेट डाटा च्या हिशोबाने ग्राहकांना 150 दिवसांमध्ये एकूण 300जीबी डाटा मिळेल. जास्त वॅलिडिटी मुळे बीएसएनएल चा हा प्लान ग्राहकांना भरपूर बेनिफिट देतो.

इंटरनेट डाटा सह या प्लान मध्ये रोज 100एसएमएस मिळतील. 150 दिवसांच्या हिशोबाने यूजर्सना एकूण 15,000 एसएमएस मिळतील ज्यांचा वापर लोकल व एसटीडी नंबर्स वर केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क वर बीएसएनएल अनलिमिटेड वॉयस कॉलिंग ची सुविधा देत आहे. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण पूर्णपणे फ्री असतील.

बीएसएनएल ने हा 786 रुपयांचा प्लान रमजान च्या निमित्ताने ईदी म्हणून सादर करण्यात आला आहे. हा प्लान मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. बीएसएनएल ग्राहक 26 जून पर्यंत या आॅफर चा लाभ घेऊ शकतील आणि या तारखेच्या आधी 786 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. कंपनी ने हा प्लान संपूर्ण देशात रोलआउट केला आहे.

The post ईद च्या निमित्ताने बीएसएनएल ची भेट, 786 रुपयांमध्ये 150 दिवसांपर्यंत रोज 2जीबी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-eid-mubarak-pack-786-rs-plan-for-150-days-2gb-data-daily-unlimited-voice-call-in-marathi/feed/ 0
सर्वात स्वस्त इंटरनेट डाटा मध्ये जियो आणि एयरटेल ला पण मागे टाकले या कंपनीने, फक्त 2.51 रुपयांमध्ये मिळत आहे 1जीबी डाटा https://www.91mobiles.com/marathi/bsnl-rs-98-data-tsunami-pack-against-reliance-jio-airtel-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-rs-98-data-tsunami-pack-against-reliance-jio-airtel-in-marathi/#respond Fri, 18 May 2018 13:42:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=540 रिलायंस जियो नेटवर्क वर 1जीबी डाटा ची किंमत 3.5 रुपये आहे तर एयरटेल ग्राहक 1जीबी डाटा साठी 5.3 रुपये देताता.

The post सर्वात स्वस्त इंटरनेट डाटा मध्ये जियो आणि एयरटेल ला पण मागे टाकले या कंपनीने, फक्त 2.51 रुपयांमध्ये मिळत आहे 1जीबी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
महिन्याच्या सुरवातीला बातमी आली होती की देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने देशात 4जी सिम अपग्रेडेशन प्रोग्राम सुरू केला आहे, ज्यात 20 रुपये देऊन 3जी सिम 4जी मध्ये बदलता येईल. बीएसएनएल च्या या प्रोग्राम वरून हे स्पष्ट झाले की कंपनी लवकरच संपूर्ण देशात आपली 4जी सर्विस सुरू करणार आहे. जियो व एयरटेल सारख्या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ने आता अजून एक नवीन पॅक सादर केला आहे जो फक्त 98 रुपयांमध्ये 39 जीबी डाटा देत आहे.

बीएसएनएल ने 98 रुपयांचा हा नवीन पॅक प्रीपेड यूजर्स साठी सादर केला आहे. कंपनी ने या नवीन प्लानला ‘डाटा सुनामी’ नाव दिले आहे. हा प्लान 26 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. कंपनी कडून 26 दिवस रोज 1.5जीबी डाटा देण्यात येत आहे. म्हणजे यूजर्सना 26 दिवसांसाठी एकूण 39जीबी डाटा मिळेल. कंपनी ने हा प्लान संपूर्ण देशात लागू केला आहे. तसेच यूजर्स 98 रुपयांमध्ये प्रतिदिन 1.5जीबी डाटा चा वापर 3जी नेटवर्क वर पण करू शकतात.

बीएसएनएल चा हा प्लान खास आहे कारण प्रति जीबी डाटा पाहता या प्लान मध्ये यूजर्सना 1जीबी डाटा साठी फक्त 2.51 रुपये द्यावे लागत आहेत. सध्या कोणतीही टेलीकॉम कंपनी या किंमतीत इंटरनेट डाटा देत नाही. बीएसएनएल ची तुलना इतर कंपन्यांशी केल्यास ​रिलायंस जियो नेटवर्क वर 1जीबी डाटा ची किंमत 3.5 रुपये आहे तर एयरटेल ग्राहक 1जीबी डाटा साठी 5.3 रुपये देताता. पण जियो व एयरटेल हा डाटा 4जी नेटवर्क वर देत आहेत.

विशेष म्हणजे महिन्याच्या सुरवातीला पण बीएसएनएल ने 118 रुपयांचा एक प्लान सादर केला होता ज्यात 28 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल, नेशनल व रोमिंग कॉल मिळत आहेत जे आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क दोन्ही वर चालतात. या प्लान मध्ये कंपनी 28 दिवसांसाठी 1जीबी डाटा मिळत आहे जो 4जी व 3जी दोन्ही नेटवर्क वर वापरता येतो.

The post सर्वात स्वस्त इंटरनेट डाटा मध्ये जियो आणि एयरटेल ला पण मागे टाकले या कंपनीने, फक्त 2.51 रुपयांमध्ये मिळत आहे 1जीबी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-rs-98-data-tsunami-pack-against-reliance-jio-airtel-in-marathi/feed/ 0
फक्त 39 रुपयांमध्ये बोला कितीही, ही टेलीकॉम कंपनी घेऊन आली आहे शानदार प्लान https://www.91mobiles.com/marathi/bsnl-rs-39-plan-with-10-days-validity-free-unlimited-voice-call-prbt-service-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-rs-39-plan-with-10-days-validity-free-unlimited-voice-call-prbt-service-in-marathi/#respond Wed, 09 May 2018 12:35:27 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=360 या प्लान मध्ये इंटरनेट डाटा मिळत नाही पण कंपनी यूजर्सना फ्री कॉलर ट्यून सर्विस (पीआरबीटी) ची फ्री सर्विस पण देत आहे.

The post फक्त 39 रुपयांमध्ये बोला कितीही, ही टेलीकॉम कंपनी घेऊन आली आहे शानदार प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशाची सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड ने कही दिवसांपूर्वी 99 रुपये आणि 319 रुपयांचे दोन वॉयस प्लान सादर केले होते. 99 रुपयांचा प्लान 26 दिवसांच्या वैधते सह येतो तर कंपनीचा 319 रुपयांचा प्लान 90 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर करण्यात आला आहे. पण आता बीएसएनएल ने 39 रुपयांचा नवीन वॉयस पॅक सादर केला आहे जो छोट्या वॅलिडिटी सह अनलिमिटेड बेनिफिट देतो.

बीएसएनएल ने 39 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो प्रीपेड कस्टमर्स साठी आहे. कंपनी ने हा पॅक 10 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे हा एक वॉयस पॅक आहे जो यूजर्सना फक्त वॉयस कॉल ची सुविधा देतो. 39 रुपयांचा रिचार्ज केल्यावर बीएसएनएल आपल्या ग्राहकांना 10 दिवसांसाठी आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल देत आहे.

प्लान मधील वॉयस कॉल चा वापर रोमिंग मध्ये पण फ्री असेल. या प्लान मध्ये इंटरनेट डाटा मिळत नाही पण कंपनी यूजर्सना फ्री कॉलर ट्यून सर्विस (पीआरबीटी) ची फ्री सर्विस पण देत आहे. ग्राहक 10 दिवसांसाठी आपल्या आवडीची कोणतीही कॉलर ट्यून मोफत लाऊ शकतात. कंपनी कडून हे दोन्ही प्लान्स दिल्ली आणि मुंबई सोडून संपूर्ण भारतात लागू करण्यात आले आहेत. हा प्लान त्या लोकांसाठी सादर करण्यात आला आहे जे इंटरनेट कमी पण कॉलिंग जास्त वापरतात. इंटरनेट डाटा साठी कंपनी च्या इतर पॅक ने रिचार्ज करावा लागेल.

काही दिवसांपूर्वी बीएसएनएल ने 349 रुपयांचा प्रीपेड प्लान पण सादर केला आहे जो 54 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान अंतर्गत बीएसएनएल ग्राहकांना 1जीबी डाटा प्रतिदिन देत आहे. रोज 1जीबी च्या हिशोबाने प्लान मध्ये संपूर्ण वेलिडिटी साठी एकूण 54जीबी इंटरनेट डाटा मिळतो. यासोबत 54 दिवसांसाठी कंपनी लोकल व एसटीडी वॉयस कॉल पूर्णपणे फ्री देत आहे, जे रोमिंग मध्ये पण वापरतात येतात. तसेच प्लान मध्ये ग्राहकांना रोज 100एसएमएस पण मिळतील.

The post फक्त 39 रुपयांमध्ये बोला कितीही, ही टेलीकॉम कंपनी घेऊन आली आहे शानदार प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-rs-39-plan-with-10-days-validity-free-unlimited-voice-call-prbt-service-in-marathi/feed/ 0
बीएसएनएल ने सादर केले 99 रुपये आणि 319 रुपयांचे दोन नवीन प्लान्स, जाणून घ्या सर्व बेनिफिट https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-rs99-and-rs319-plan-prepaid-voice-pack-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-rs99-and-rs319-plan-prepaid-voice-pack-in-marathi/#respond Thu, 03 May 2018 08:38:58 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=244 बीएसएनएल ने सादर केलेले हे दोन्ही प्लान प्रीपेड कस्टमर्स साठी आहेत.

The post बीएसएनएल ने सादर केले 99 रुपये आणि 319 रुपयांचे दोन नवीन प्लान्स, जाणून घ्या सर्व बेनिफिट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने काही दिवसांपूर्वी 129 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो 28 दिवसांसाठी इंटरनेट डाटा व वॉयस कॉल सह हॅलो ट्यून फ्री देतो. बाजारातील या प्राइस वॉर मध्ये आता सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड ने पण दोन नवीन प्लान सादर केले आहेत. कंपनी ने 99 रुपये आणि 319 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत जे प्री-पेड ग्राहकांना अनलिमिडेट बेनिफिट देतात.

बीएसएनएल ने सादर केलेले हे दोन्ही प्लान प्रीपेड कस्टमर्स साठी आहेत. कपंनी ने आपले दोन्ही नवीन प्लान वॉयस पॅक च्या रुपात सादर केले आहेत जे अनलिमिटेड वॉयस कॉल ची सुविधा देतात. बीएसएनएल 99 रुपयांचा प्लान 26 दिवसांच्या वैधता सह येतो तर कंपनी चा 319 रुपयांचा प्लान 90 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर करण्यात आला आहे.

बीएसएनएल च्या दोन्ही प्लान्स मध्ये लोकल व एसटीडी आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क वॉयस कॉल पूर्णपणे मोफत देण्यात येत आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतील. त्याचबरोबर वॉयस कॉल व्यतिरिक्त कंपनी या दोन्ही प्लान्स मध्ये फ्री कॉलर ट्यून सर्विस (पीआरबीटी) पण दिली आहे. ग्राहक आपल्या आवडी नुसार कोणतीही कॉलर ट्यून मोफत लाऊ शकतात.

कंपनी ने हे दोन्ही प्लान्स दिल्ली आणि मुंबई सोडून संपूर्ण भारतात लागू केले आहेत. लक्षात असू दे की हे दोन्ही प्लान वॉयस पॅक च्या रुपात लॉन्च करण्यात आले आहेत, यात ग्राहकांना कोणतेही इंटरनेट बेनिफिट किंवा एसएमएस सर्विस मिळणार नाही. हे प्लान त्या लोकांसाठी आहेत जे इंटरनेट कमी पण कॉलिंग जास्त वापरतात. इंटरनेट डाटा साठी कंपनी च्या इतर पॅक ने रिचार्ज करावा लागेल.

The post बीएसएनएल ने सादर केले 99 रुपये आणि 319 रुपयांचे दोन नवीन प्लान्स, जाणून घ्या सर्व बेनिफिट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-launch-rs99-and-rs319-plan-prepaid-voice-pack-in-marathi/feed/ 0