सर्वात स्वस्त इंटरनेट डाटा मध्ये जियो आणि एयरटेल ला पण मागे टाकले या कंपनीने, फक्त 2.51 रुपयांमध्ये मिळत आहे 1जीबी डाटा

महिन्याच्या सुरवातीला बातमी आली होती की देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने देशात 4जी सिम अपग्रेडेशन प्रोग्राम सुरू केला आहे, ज्यात 20 रुपये देऊन 3जी सिम 4जी मध्ये बदलता येईल. बीएसएनएल च्या या प्रोग्राम वरून हे स्पष्ट झाले की कंपनी लवकरच संपूर्ण देशात आपली 4जी सर्विस सुरू करणार आहे. जियो व एयरटेल सारख्या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ने आता अजून एक नवीन पॅक सादर केला आहे जो फक्त 98 रुपयांमध्ये 39 जीबी डाटा देत आहे.

बीएसएनएल ने 98 रुपयांचा हा नवीन पॅक प्रीपेड यूजर्स साठी सादर केला आहे. कंपनी ने या नवीन प्लानला ‘डाटा सुनामी’ नाव दिले आहे. हा प्लान 26 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. कंपनी कडून 26 दिवस रोज 1.5जीबी डाटा देण्यात येत आहे. म्हणजे यूजर्सना 26 दिवसांसाठी एकूण 39जीबी डाटा मिळेल. कंपनी ने हा प्लान संपूर्ण देशात लागू केला आहे. तसेच यूजर्स 98 रुपयांमध्ये प्रतिदिन 1.5जीबी डाटा चा वापर 3जी नेटवर्क वर पण करू शकतात.

बीएसएनएल चा हा प्लान खास आहे कारण प्रति जीबी डाटा पाहता या प्लान मध्ये यूजर्सना 1जीबी डाटा साठी फक्त 2.51 रुपये द्यावे लागत आहेत. सध्या कोणतीही टेलीकॉम कंपनी या किंमतीत इंटरनेट डाटा देत नाही. बीएसएनएल ची तुलना इतर कंपन्यांशी केल्यास ​रिलायंस जियो नेटवर्क वर 1जीबी डाटा ची किंमत 3.5 रुपये आहे तर एयरटेल ग्राहक 1जीबी डाटा साठी 5.3 रुपये देताता. पण जियो व एयरटेल हा डाटा 4जी नेटवर्क वर देत आहेत.

विशेष म्हणजे महिन्याच्या सुरवातीला पण बीएसएनएल ने 118 रुपयांचा एक प्लान सादर केला होता ज्यात 28 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल, नेशनल व रोमिंग कॉल मिळत आहेत जे आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क दोन्ही वर चालतात. या प्लान मध्ये कंपनी 28 दिवसांसाठी 1जीबी डाटा मिळत आहे जो 4जी व 3जी दोन्ही नेटवर्क वर वापरता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here