Counterpoint - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Feb 2020 15:28:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 प्रीमियम स्मार्टफोन कॅटगरी मध्ये OnePlus ची हवा, iPhone XR बनला बेस्टसेलिंग फोन https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-oneplus-was-the-top-selling-premium-phone-brand-in-india-in-2019/ https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-oneplus-was-the-top-selling-premium-phone-brand-in-india-in-2019/#respond Wed, 05 Feb 2020 15:28:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6520 भारतात ऍप्पलचा मार्केट शेयर 25 टक्के आहे.

The post प्रीमियम स्मार्टफोन कॅटगरी मध्ये OnePlus ची हवा, iPhone XR बनला बेस्टसेलिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काउंटरपॉइंट रिसर्चने आपला एक नवीन रिपोर्ट सादर केला आहे, ज्यानुसार साल 2019 मध्ये भारतीय बाजारात प्रीमियम सेगमेंट मध्ये 29 टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. यात वनप्लसच्या शिपमेंट मध्ये 28 टक्के वार्षिक वाढ दिसली आहे. त्यामुळे असे म्हणता येईल कि भारतीय स्मार्टफेन मार्केटच्या प्रीमियम सेगमेंट मध्ये वनप्लसची हवा आहे.

इतकेच नव्हे तर रिपोर्टनुसार 2019 मध्ये आईफोन XR अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटचा बेस्टसेलिंग स्मार्टफोन आहे. कंपनीने हा डिवाइस साल 2018 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला होता जो भारतात लोकप्रिय ठरला. या रिपोर्टमुळे स्पष्ट झाले आहे कि आज पण भारतीय ग्राहकांना हा फोन आवडत आहे.

सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीच्या प्रीमियम सेगमेंट शिपमेंट मध्ये 2 टक्क्यांची घाट झाली आहे. तरीही बाजाराचा 26 टक्के हिस्सा कंपनीच्या ताब्यात आहे तर तिसऱ्या स्थानावर Apple आहे. भारतात ऍप्पलचा मार्केट शेयर 25 टक्के आहे.

अलीकडेच एक दुसरा रिपोर्ट समोर आला होता, ज्यानुसार भारतात आता 50 कोटी पेक्षा जास्त लोक स्मार्टफोनचा वापर करत आहेत. यावर्षी 2018 च्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे. रिसर्च फर्म techARC ने एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार डिसेंबर 2019 पर्यंत इंडियन मार्केट मध्ये स्मार्टफोन यूजर्सची संख्या 502.2 मिलियन (50.22 कोटी) वर पोहोचली आहे. तसेच साल 2019 मध्ये स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत सॅमसंग टॉप वर राहिली आहे.

सॅमसंगचा मार्केट शेयर सर्वात जास्त 34 टक्के होता. तर दुसऱ्या क्रमांकावर वर शाओमी 20 टक्क्यांसह आणि वीवो तिसऱ्या नंबर वर 9 टक्क्यांसह पोहचली आहे. techARC चे फाउंडर आणि चीफ अनॅलिस्ट फैजल कउसा यांच्या मते ‘गेल्या काही वर्षांपासून फीचर फोन यूजर्स कमी प्रमाणात स्मार्टफोन कडे वळले होते. पण या वेळी स्मार्टफोन कडे जास्त ग्राहक पोहचले आहेत.

या रिपोर्ट नुसार भारतात जास्तीत जास्त यूजर्स आपला पहिला स्मार्टफोन बेसिक सेग्मेंट (5001 ते 10,000 रुपयांपर्यंत) मध्ये विकत घेण्यास पसंती देतात. 2019 मधील कंपन्यांच्या यूजर बेस बद्दल बोलायचे तर रियलमीच्या यूजर बेस मध्ये 49 टक्के, वीवोच्या यूजर बेस मध्ये 44 टक्के आणि वनप्लसच्या यूजर बेस मध्ये 41 टक्के वाढ झाली आहे.

The post प्रीमियम स्मार्टफोन कॅटगरी मध्ये OnePlus ची हवा, iPhone XR बनला बेस्टसेलिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-oneplus-was-the-top-selling-premium-phone-brand-in-india-in-2019/feed/ 0
स्मार्टफोन बाजारावर पुन्हा एकदा शाओमीचे राज्य, बघा इतर कंपन्यांची परिस्थिती https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-xiaomi-no-1-smartphone-brand-in-india-samsung-oppo-micromax-vivo/ https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-xiaomi-no-1-smartphone-brand-in-india-samsung-oppo-micromax-vivo/#respond Fri, 26 Jul 2019 11:46:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4907 दुसऱ्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये 3.7 कोटी स्मार्टफोनची शिपमेंट झाली.

The post स्मार्टफोन बाजारावर पुन्हा एकदा शाओमीचे राज्य, बघा इतर कंपन्यांची परिस्थिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने थोड्याच वेळात जितक्या वेगाने भारतीय मोबाईल बाजारावर आपले वर्चस्व मिळवले आहे तितक्या वेगाने इत्तर कुठलीहि कंपनी करू शकली नाही. कंपनीने अलीकडेच भारतात पाच वर्ष पूर्ण केली आहेत. तसेच पुन्हा चीनच्या या स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने इतर कंपन्यांना मागे टाकत इंडियन मोबाईल मार्केट मध्ये टॉप पोजिशन मिळवली.

शाओमीचे 28 टक्के बाजारावर कब्जा

हे स्थान मिळवण्याची हि काही शाओमीची पहिली वेळ नाही. याआधी पण अनेकदा कंपनीने हे स्थान मिळवले आहे. शाओमीने यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 28 टक्के मार्केट शेअर सह नंबर 1 पोजिशन मिळवली आहे.

शाओमीची वाढ झाली कमी

याची माहिती मार्केट रिसर्च फर्म काउंटरप्वाइंटच्या रिपोर्ट मध्ये समोर आली आहे. दुसऱ्या तिमाहीत मध्ये कंपनीची वाढ जवळपास शून्य झाली आहे. यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर शाओमीची वाढ 6 टक्के आहे. मागील तिमाहीत शाओमीचा बाजारातील शेअर 29 टक्के होता.

दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग

स्मार्टफोन ब्रॅण्ड सॅमसंग बद्दल बोलायचे तर यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची भागेदारी 25 टक्के होती. वार्षिक दृष्ट्या पाहता सॅमसंगची शिपमेंट 7 टक्के कमी झाली आहे, पण तिमाहीच्या आधारावर शिपमेंट 30 टक्क्यांनी वाढली आहे. शिपमेंट वाढण्याचे कारण कंपनीच्या नव्या A आणि M सीरीज असलचे बोलले जात आहे.

अशी आहे इतर कंपन्यांची परिस्थिती

शाओमी आणि सॅमसंग व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या बाबत बोलायचे तर इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये 11 टक्के मार्केट शेयर सह वीवो तिसऱ्या नंबर वर आहे. तसेच रियलमी चौथ्या नंबर वर आहे. चीनमधील अजून कंपनी Oppo इंडियन मार्केट मध्ये 8 टक्क्यांसह पाचव्या नंबर वर आहे.

इंडियन मार्केट मध्ये आले 3.7 कोटी स्मार्टफोन

दुसऱ्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये 3.7 कोटी स्मार्टफोनची शिपमेंट झाली. फीचर फोन मार्केट मध्ये वार्षिक आधारवर 39 टक्कयांची घसरण झाली आहे.

फीचर फोन बाजारात जियोचा दबदबा

स्मार्टफोन मार्केट व्यतिरिक्त फीचर फोन सेगमेंट पाहता यात रिलायंस जियोचा दबदबा आहे. जियोने यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 28 टक्के मार्केट शेयर मिळवला. तर सॅमसंगची बाजारातील भागेदारी 21 टक्के आणि लावा चा मार्केट शेयर 12 टक्के आहे. फीचर फोन सेगमेंट मध्ये इंटेलचा मार्केट शेयर 10 टक्के आहे तर नोकियाची भागेदारी 9 टक्के आहे .

The post स्मार्टफोन बाजारावर पुन्हा एकदा शाओमीचे राज्य, बघा इतर कंपन्यांची परिस्थिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-xiaomi-no-1-smartphone-brand-in-india-samsung-oppo-micromax-vivo/feed/ 0
भारतीय स्मार्टफोन बाजारात झाला ऐतिहासिक व्यापार, शाओमी पुन्हा ठरला आहे देशातील नंबर वन ब्रांड! https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-q3-2018-record-sale-xiaomi-tops-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-q3-2018-record-sale-xiaomi-tops-in-marathi/#respond Tue, 23 Oct 2018 09:31:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2596 पहिल्यांदाच एखाद्या तिमाहीत एवढे फोन विकले गेले आहेत.

The post भारतीय स्मार्टफोन बाजारात झाला ऐतिहासिक व्यापार, शाओमी पुन्हा ठरला आहे देशातील नंबर वन ब्रांड! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारताचे नाव जगातील दुसर्‍या सर्वात मोठा मोबाईल बाजार म्हणून समोर येते. जून मध्ये भारतीय बाजाराने 400 मिलियन स्मार्टफोन यूजर्सचा आकडा पार केला आहे. तर आता दिवाळी आणि ईद येत असल्यामुळे पुन्हा एकदा देशातील मोबाईल बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंटने इंडियन मोबाईल मार्केट संबंधीत ताजा रिपोर्ट शेयर केला आहे ज्यात सांगण्यात आले आहे की गेल्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन बाजाराने आत्तापर्यंतची सर्वात मोठी उलाढाल केली आहे.

काउंटरप्वाइंटच्या वरिष्ठ ​अधिकार्‍यांनी हा ताजा रिपोर्ट शेयर केला आहे जो साल 2018 च्या तिसर्‍या तिमाहीचा आहे. या रिपोर्ट मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंडियन मोबाईल बाजारात झालेल्या स्मार्टफोनच्या उलाढालीचा समवेश आहे. रिपोर्ट नुसार 2018 च्या तिसर्‍या तिमाहीत देशातील स्मार्टफोन बाजारात आतापर्यंतचा सर्वात जास्त व्यापार झाला आहे. पहिल्यांदाच एखाद्या तिमाहीत एवढे फोन विकले गेले आहेत.

स्मार्टफोन ब्रांड्स बद्दल बोलायचे तर तिसर्‍या तिमाहीत शाओमी ने सर्वात जास्त फोन विकून नंबर वनची जागा मिळवली आहे. रिपोर्ट नुसार इंडियन स्मार्टफोन बाजारात झालेल्या एकूण सेल मध्ये एकट्या शाओमीचा वाटा 27 टक्के आहे. गेल्यावर्षी तिसर्‍या तिमाहीत शाओमीने 22 टक्के वाटा मिळवला होता तर यावेळी 5 टक्क्यांची वाढ दिसली आहे. या यादीत दुसरा क्रमांक सॅमसंगचा आहे ज्यांनी 23 टक्के मार्केट शेयर मिळवला आहे.

काउंटरप्वाइंटच्या या रिपोर्ट मध्ये 10 टक्के मार्केट शेयर सह वीवो ने तीसरे स्थान मिळवले आहे. तर 9 प्रतिशत मार्केट शेयर सह माइक्रोमॅक्स चौथ्या आणि 8 टक्के मार्केट शेयर सह ओपो पाचव्या नंबर वर आहे. विशेष म्हणजे या लिस्ट मधील 5 ब्रांड्स पैकी टॉप 4 स्मार्टफोन ब्रांड असे आहेत ज्यांनी पहिल्यांदाच एखाद्या क्वॉटर मध्ये इतक्या मार्केट शेयरची शिपमेंट केली आहे. म्हणजे शाओमी, सॅमसंग, वीवो आणि माइक्रोमॅक्स ने 2018 च्या तिसर्‍या तिमाहीत पहिल्यांदाच एखाद्या तिमाहीत सर्वात जास्त सेल केला आहे.

देशातील स्मार्टफोन बाजारात आलेल्या या बूम तसेच फोनच्या रेकॉर्ड सेलचे प्रमुख कारण वेगवेगळ्या शॉपिंग साइट्स ने आयोजित केलेले सेल्स असल्याचे बोलले जात आहे. फ्लिपकार्ट व अमेजॉनच्या शॉपिंग फेस्टिवल मधे मिळणार्‍या आॅफर्स मुळे स्मार्टफोन्सची मागणी व विक्री वाढली आहे. तर शाओमी नंबर वन होण्याचे कारण त्यांची लेटेस्ट रेडमी 6 सीरीज आहे असे बोलले जात आहे.

The post भारतीय स्मार्टफोन बाजारात झाला ऐतिहासिक व्यापार, शाओमी पुन्हा ठरला आहे देशातील नंबर वन ब्रांड! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/counterpoint-report-q3-2018-record-sale-xiaomi-tops-in-marathi/feed/ 0