भारतीय स्मार्टफोन बाजारात झाला ऐतिहासिक व्यापार, शाओमी पुन्हा ठरला आहे देशातील नंबर वन ब्रांड!

भारताचे नाव जगातील दुसर्‍या सर्वात मोठा मोबाईल बाजार म्हणून समोर येते. जून मध्ये भारतीय बाजाराने 400 मिलियन स्मार्टफोन यूजर्सचा आकडा पार केला आहे. तर आता दिवाळी आणि ईद येत असल्यामुळे पुन्हा एकदा देशातील मोबाईल बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंटने इंडियन मोबाईल मार्केट संबंधीत ताजा रिपोर्ट शेयर केला आहे ज्यात सांगण्यात आले आहे की गेल्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन बाजाराने आत्तापर्यंतची सर्वात मोठी उलाढाल केली आहे.

काउंटरप्वाइंटच्या वरिष्ठ ​अधिकार्‍यांनी हा ताजा रिपोर्ट शेयर केला आहे जो साल 2018 च्या तिसर्‍या तिमाहीचा आहे. या रिपोर्ट मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंडियन मोबाईल बाजारात झालेल्या स्मार्टफोनच्या उलाढालीचा समवेश आहे. रिपोर्ट नुसार 2018 च्या तिसर्‍या तिमाहीत देशातील स्मार्टफोन बाजारात आतापर्यंतचा सर्वात जास्त व्यापार झाला आहे. पहिल्यांदाच एखाद्या तिमाहीत एवढे फोन विकले गेले आहेत.

स्मार्टफोन ब्रांड्स बद्दल बोलायचे तर तिसर्‍या तिमाहीत शाओमी ने सर्वात जास्त फोन विकून नंबर वनची जागा मिळवली आहे. रिपोर्ट नुसार इंडियन स्मार्टफोन बाजारात झालेल्या एकूण सेल मध्ये एकट्या शाओमीचा वाटा 27 टक्के आहे. गेल्यावर्षी तिसर्‍या तिमाहीत शाओमीने 22 टक्के वाटा मिळवला होता तर यावेळी 5 टक्क्यांची वाढ दिसली आहे. या यादीत दुसरा क्रमांक सॅमसंगचा आहे ज्यांनी 23 टक्के मार्केट शेयर मिळवला आहे.

काउंटरप्वाइंटच्या या रिपोर्ट मध्ये 10 टक्के मार्केट शेयर सह वीवो ने तीसरे स्थान मिळवले आहे. तर 9 प्रतिशत मार्केट शेयर सह माइक्रोमॅक्स चौथ्या आणि 8 टक्के मार्केट शेयर सह ओपो पाचव्या नंबर वर आहे. विशेष म्हणजे या लिस्ट मधील 5 ब्रांड्स पैकी टॉप 4 स्मार्टफोन ब्रांड असे आहेत ज्यांनी पहिल्यांदाच एखाद्या क्वॉटर मध्ये इतक्या मार्केट शेयरची शिपमेंट केली आहे. म्हणजे शाओमी, सॅमसंग, वीवो आणि माइक्रोमॅक्स ने 2018 च्या तिसर्‍या तिमाहीत पहिल्यांदाच एखाद्या तिमाहीत सर्वात जास्त सेल केला आहे.

देशातील स्मार्टफोन बाजारात आलेल्या या बूम तसेच फोनच्या रेकॉर्ड सेलचे प्रमुख कारण वेगवेगळ्या शॉपिंग साइट्स ने आयोजित केलेले सेल्स असल्याचे बोलले जात आहे. फ्लिपकार्ट व अमेजॉनच्या शॉपिंग फेस्टिवल मधे मिळणार्‍या आॅफर्स मुळे स्मार्टफोन्सची मागणी व विक्री वाढली आहे. तर शाओमी नंबर वन होण्याचे कारण त्यांची लेटेस्ट रेडमी 6 सीरीज आहे असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here