Digital Payment - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 03 Dec 2019 10:59:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 केरळ मधील व्यक्तीने Flipkart वरून मागवला होता 27,500 रुपयांचा कॅमेरा, बॉक्स मधून निघाली विट https://www.91mobiles.com/marathi/kerala-kannur-man-orders-camera-worth-27500-rupees-flipkart-delivered-tiles-brick/ https://www.91mobiles.com/marathi/kerala-kannur-man-orders-camera-worth-27500-rupees-flipkart-delivered-tiles-brick/#respond Tue, 03 Dec 2019 10:59:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5945 समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Flipkart ने विष्णु सुरेशला एका आठवड्यात नवीन कॅमेरा देण्याचा शब्द दिला आहे.

The post केरळ मधील व्यक्तीने Flipkart वरून मागवला होता 27,500 रुपयांचा कॅमेरा, बॉक्स मधून निघाली विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग गेल्या काही वर्षांत भारतात वेगाने लोकप्रिय झाली आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सोबत इतर अनेक अश्या ईकॉमर्स साइट सध्या भारतात सक्रिय आहेत ज्या प्रोडक्ट्सची मोठी रेंज ऑनलाइन विकतात. ऑनलाइन शॉपिंग जितकी सोप्पी आणि फास्ट आहे, खरेदीच्या वेळी आपल्याला तेवढीच काळजी घ्यावी लागते. पण ग्राहकाने काळजी घेऊन पण अनेकदा असे प्रसंग घडतात, जे फक्त ऑनलाइन शॉपिंगच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात, तसेच डिजीटल शॉपिंग वर पण डाग लावतात. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात 27,500 रुपयांचा कॅमेरा मागवल्यावर बॉक्स मध्ये विटा मिळाल्या आहेत.

हि घटना केरळ मधील कन्नूर शहरातील आहे, जिथे शॉपिंग साइट वरून कॅमेरा मागवल्यावर ग्राहकाला बॉक्स मध्ये विटा डिलीवर करण्यात आल्या आहेत. या घटनेची बातमी मलयालम मनोरमा वेबसाइट वर प्रसिद्ध झाली आहे. या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार हि घटना कन्नूर मधील विष्णु सुरेश नावाच्या व्यक्तीसोबत घडली आहे. रिपोर्ट नुसार विष्णु सुरेश याला स्वतःसाठी एक कॅमेरा हवा होता आणि या तरुणाने हा कॅमेरा ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart वरून विकत घेण्याचे ठरवले.

विष्णुने 20 नोव्हेंबरला शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक कॅमेरा निवडला आणि तो ऑर्डर केला. या कॅमेऱ्याची किंमत 27,500 रुपये सांगण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला ऑर्डर केल्यानंतर 4 दिवसांनी 24 नोव्हेंबरला विष्णु सुरेशच्या पत्त्यावर कॅमेरा डिलीवर केला गेला. रिपोर्टनुसार हि डिलीवरी Flipkart च्या पार्टनर कंपनी Ekart Logistics ने केली होती. कॅमेरा डिलीवर झाल्यानंतर जेव्हा उत्सहाने विष्णु सुरेशने बॉक्स उघडला तर त्याला धक्का बसला.

विष्णु सुरेशने जेव्हा कॅमेऱ्याचा बॉक्स उघडला तेव्हा त्यात कॅमेरा नाही तर कॅमेऱ्याच्या ऐवजी विटा व टाईल्स ठेवल्या होत्या. या बॉक्स मध्ये विटांसह कॅमेऱ्याचा मॅनुअल बुक आणि वारंटी कार्ड पण होते. 27,500 रुपये दिल्यानंतर कॅमेऱ्याच्या जागी बॉक्स मध्ये विटा बघून विष्णु हैराण झाला आणि घाईत त्याने Flipkart ला कळवले. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Flipkart ने विष्णु सुरेशला एका आठवड्यात नवीन कॅमेरा देण्याचा शब्द दिला आहे.

कॅमेऱ्याच्या बॉक्स मध्ये विटांसह मॅनुअल बुक आणि वारंटी कार्ड बघून अंदाज लावला जात आहे कि कदाचित हा गुन्हा डिलीवरी बॉयने केला असेल आणि कॅमेरा ग्राहकांपर्यंत पोचवण्याआधी बॉक्स उघडून त्यातील कॅमेरा काढला असेल. गुन्हा कोणी केला आहे हे अजून समोर आले नाही, पण Flipkart वर झालेल्या या शॉपिंगमुळे ईकॉमर्स साइट सह ऑनलाइन शॉपिंग वर पण प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

The post केरळ मधील व्यक्तीने Flipkart वरून मागवला होता 27,500 रुपयांचा कॅमेरा, बॉक्स मधून निघाली विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kerala-kannur-man-orders-camera-worth-27500-rupees-flipkart-delivered-tiles-brick/feed/ 0
शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pay-launched-in-india-google-whatsapp-pay-and-paytm/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pay-launched-in-india-google-whatsapp-pay-and-paytm/#respond Tue, 19 Mar 2019 11:29:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3892 शाओमी मी पे यूपीआई आधारित डिजीटल पेमेंट इंटरफेस आहे ज्याच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण खूप सोप्पी बनवण्यात आली आहे.

The post शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतातील सर्वत मोठी मोबाईल कंपनी बनली आहे. चांगल्या बजेट मध्ये शानदार स्मार्टफोन्स आणणाऱ्या या कंपनीने थोड्याच वेळात मोठा युजरबेस बनवला आहे. स्मार्टफोनच्या क्षेत्रात अव्वल असणाण्या सोबतच शाओमी ने टेलीविजन बाजारात पण सॅमसंग व सोनी सारख्या कंपन्यांना चांगली स्पर्धा दिली आहे. स्मार्टफोन आणि स्मार्ट टीवी सोबत शाओमीने भारतात स्मार्ट गॅजेट पण आणले आहेत जे खूप लोकांना आवडले आहेत. तर आज भारतात एका नवीन इनिंगची सुरुवात करत शाओमी ने देशात आपली पेमेंट सर्विस सुरु केली आणि याला ‘मी पे’ असे नाव दिले आहे.

शाओमीने मी पे लॉन्च करणे फक्त शाओमी स्मार्टफोन यूजर्स आणि मी फॅन्ससाठी मोठी भेट नाही तर सोबतच डिजीटल भारताच्या मोहिमेत पण हे शाओमीचे मोठे योगदान आहे. शाओमी मी पे देशात ऑनलाइन ट्रांजेक्शन्सना प्रोत्साहन देईल त्याचबरोबर पेटीएम आणि मोबिक्विक सारख्या डिजीटल वॉलेटला मी पे कडून चांगली मिळणार आहे. शाओमी मी पे यूपीआई आधारित डिजीटल पेमेंट इंटरफेस आहे ज्याच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण खूप सोप्पी बनवण्यात आली आहे.

शाओमी मी पे
1. शाओमी म्हणते कि मी पे वापरताना मनी ट्रांसफर साठी जास्त स्टेप्स फोल्लो कराव्या लागणार नाहीत. या ऍप के मधून ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारचे पेमेंट सहज होईल.

मी पे द्वारे यूपीआई सोबतच बँक अकाउंट नंबर आणि आईएफएससी कोड सारख्या डिटेल्स द्वारे पण पैसे पाठवले जाऊ शकतात. शाओमी ने मी पे मध्ये सेंड, रिसीव आणि स्कॅन तिन्ही फीचर्स दिले आहेत. मी पे द्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देता येतील.

2. मी पे शाओमीने कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई मध्ये पण इंटिग्रेट केला आहे ज्यामुळे कोणत्याही शाओमी फोन वर या ऍपचा वापर खूप सोप्पा होईल. फोन मध्ये आलेल्या मेसेज द्वारे थेट दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवता येतील. मेसेज व्यतिरिक्त फोन कॉन्टेक्ट बुक आणि कॅमेऱ्याद्वारे पण शाओमी स्मार्टफोन वरून थेट पैशांची देवाणघेवाण करता येइल.

मी पे एखाद्या पेमेंट सर्विस सोबतच डिजीटल वॉलेटचे पण काम करेल. मी ऍप वर पैसे सेंड आणि रिसीव कारण्यासोबतच मोबाईल रिचार्ज आणि पेमेंट करता येईल. मी पे मधून गॅस, पाणी आणि वीज इत्यादी बिल्स पण भरता येतील. मी पे द्वारे शाओमीच्या वेबसाइट मी डॉटा कॉम वर पण शॉपिंग करता येईल.

3. शाओमी म्हणते कि मी पे एनपीसीआई द्वारा सर्टिफाइड करण्यात आला आहे ज्यामुळे हा सुरक्षित पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. मी पे मधून केले जाणारे सर्व ट्रांजेक्शन पूर्णपणे सुरक्षित असतील. मी पे प्लॅटफॉर्म वर कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सोबतच नेट बँकिंग द्वारे पण पैशांची देवाणघेवाण करता येईल. तसेच मी पे मधील स्मार्ट रिमाइंडरचा ऑप्शन पण याला खास बनवतो.

The post शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pay-launched-in-india-google-whatsapp-pay-and-paytm/feed/ 0
पीएम मोदींनी सादर केला वन नेशन वन कार्ड, सामान्य जनतेला मिळतील हे फायदे https://www.91mobiles.com/marathi/one-nation-one-card-pm-modi-launch-mobility-card-for-payment-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/one-nation-one-card-pm-modi-launch-mobility-card-for-payment-in-marathi/#respond Wed, 06 Mar 2019 12:58:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3795 भारताच्या आधी सिंगापुर, लंडन, पॅरिस, सिडनी, पर्थ आणि मेलबर्न सारख्या शहरांमध्ये अशाप्रकारच्या कार्डचा वापर केला जात आहे.

The post पीएम मोदींनी सादर केला वन नेशन वन कार्ड, सामान्य जनतेला मिळतील हे फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अहमदाबाद मध्ये एक कार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड पीएम मोदी यांनी वन नेशन वन कार्ड नावाने लॉन्च केले आहे. हे कार्ड सर्व प्रकारचे पेमेंट करण्यास मदत करेल. इतकेच नव्हे तर याची अजूनही वैशिट्ये आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही खाली सविस्तर माहिती दिली आहे.

याला नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) असे नाव देण्यात आले आहे. पीएम मोदी यांनी मंगळवारी हे कार्ड लॉन्च करताना आनंद व्यक्त केला आणि याचे फायदे पण लोकांना सांगितले.

पीएम मोदी यांनी सांगतिले कि, “एनसीएमसी कार्ड रूपे पेमेंट सिस्टम वर चालेल. अनेकदा आपल्याकडे मेट्रो, बस किंवा ट्रेन तसेच टोल आणि पार्किंगचे पैसे देण्यासाठी नगद नसते. हि समस्या सोडवण्यासाठी एक स्वयंचलित भाडे संग्रह प्रणाली एनसीएमसी तयार करण्यात आली आहे.”

चला बघूया याची खासियत
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनुसार सर्व बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड मध्ये एक खास फीचर जोडले जाईल. या फीचरच्या माध्यमातून टिकट काउंटरच्या पीओएस मशीन वर कार्डचा वापर करण्यासोबतच तुम्ही मेट्रो रेल्वे स्मार्ट कार्ड म्हणून पण यांचा वापर करू शकाल.

आता बँका जे नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड जारी करतील त्यात नॅशनल कॉमन मोबेलिटी कार्ड फीचर असेल. हा एखाद्या वॉलेट प्रमाणे असेल. सध्या हा अहमदाबद मध्ये चालेल आणि हळूहळू दुसऱ्या राज्यांसाठी पण जारी केला जाईल.

कॅशलेस इकनॉमी बनवण्यासाठी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार डिजिटल ट्रांजेक्शन वर जोर देत आहे. काही वर्षांपूर्वी कंपनी ने भीम ऍप सादर केला होता. वेळोवेळी सरकार याचे फायदे सांगत असते.

विशेष म्हणजे वन नेशन-वन कार्ड भारताच्या आधी सिंगापुर, लंडन, पॅरिस, सिडनी, पर्थ आणि मेलबर्न सारख्या शहरांमध्ये अशाप्रकारच्या कार्डचा वापर केला जात आहे. या कार्डच्या मदतीने लोकांना लांब रांगांपासून सुटकारा मिळेल. टिकट काउंटर वर ना जाता या कार्डने पेमेंट करता येईल.

The post पीएम मोदींनी सादर केला वन नेशन वन कार्ड, सामान्य जनतेला मिळतील हे फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/one-nation-one-card-pm-modi-launch-mobility-card-for-payment-in-marathi/feed/ 0