केरळ मधील व्यक्तीने Flipkart वरून मागवला होता 27,500 रुपयांचा कॅमेरा, बॉक्स मधून निघाली विट

ऑनलाइन शॉपिंग गेल्या काही वर्षांत भारतात वेगाने लोकप्रिय झाली आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सोबत इतर अनेक अश्या ईकॉमर्स साइट सध्या भारतात सक्रिय आहेत ज्या प्रोडक्ट्सची मोठी रेंज ऑनलाइन विकतात. ऑनलाइन शॉपिंग जितकी सोप्पी आणि फास्ट आहे, खरेदीच्या वेळी आपल्याला तेवढीच काळजी घ्यावी लागते. पण ग्राहकाने काळजी घेऊन पण अनेकदा असे प्रसंग घडतात, जे फक्त ऑनलाइन शॉपिंगच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात, तसेच डिजीटल शॉपिंग वर पण डाग लावतात. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात 27,500 रुपयांचा कॅमेरा मागवल्यावर बॉक्स मध्ये विटा मिळाल्या आहेत.

हि घटना केरळ मधील कन्नूर शहरातील आहे, जिथे शॉपिंग साइट वरून कॅमेरा मागवल्यावर ग्राहकाला बॉक्स मध्ये विटा डिलीवर करण्यात आल्या आहेत. या घटनेची बातमी मलयालम मनोरमा वेबसाइट वर प्रसिद्ध झाली आहे. या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार हि घटना कन्नूर मधील विष्णु सुरेश नावाच्या व्यक्तीसोबत घडली आहे. रिपोर्ट नुसार विष्णु सुरेश याला स्वतःसाठी एक कॅमेरा हवा होता आणि या तरुणाने हा कॅमेरा ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart वरून विकत घेण्याचे ठरवले.

विष्णुने 20 नोव्हेंबरला शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक कॅमेरा निवडला आणि तो ऑर्डर केला. या कॅमेऱ्याची किंमत 27,500 रुपये सांगण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला ऑर्डर केल्यानंतर 4 दिवसांनी 24 नोव्हेंबरला विष्णु सुरेशच्या पत्त्यावर कॅमेरा डिलीवर केला गेला. रिपोर्टनुसार हि डिलीवरी Flipkart च्या पार्टनर कंपनी Ekart Logistics ने केली होती. कॅमेरा डिलीवर झाल्यानंतर जेव्हा उत्सहाने विष्णु सुरेशने बॉक्स उघडला तर त्याला धक्का बसला.

विष्णु सुरेशने जेव्हा कॅमेऱ्याचा बॉक्स उघडला तेव्हा त्यात कॅमेरा नाही तर कॅमेऱ्याच्या ऐवजी विटा व टाईल्स ठेवल्या होत्या. या बॉक्स मध्ये विटांसह कॅमेऱ्याचा मॅनुअल बुक आणि वारंटी कार्ड पण होते. 27,500 रुपये दिल्यानंतर कॅमेऱ्याच्या जागी बॉक्स मध्ये विटा बघून विष्णु हैराण झाला आणि घाईत त्याने Flipkart ला कळवले. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Flipkart ने विष्णु सुरेशला एका आठवड्यात नवीन कॅमेरा देण्याचा शब्द दिला आहे.

कॅमेऱ्याच्या बॉक्स मध्ये विटांसह मॅनुअल बुक आणि वारंटी कार्ड बघून अंदाज लावला जात आहे कि कदाचित हा गुन्हा डिलीवरी बॉयने केला असेल आणि कॅमेरा ग्राहकांपर्यंत पोचवण्याआधी बॉक्स उघडून त्यातील कॅमेरा काढला असेल. गुन्हा कोणी केला आहे हे अजून समोर आले नाही, पण Flipkart वर झालेल्या या शॉपिंगमुळे ईकॉमर्स साइट सह ऑनलाइन शॉपिंग वर पण प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here