Domicile Certificate - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Apr 2023 12:36:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-domicile-certificate-maharashtra-online/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-domicile-certificate-maharashtra-online/#respond Thu, 06 Apr 2023 12:36:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20091 डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजेच वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र. हा एखाद्या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाच्या अधिवासाचा पुरावा असतो. महाराष्ट्राच्या डोमेसाइल सर्टिफिकेट द्वारे तुम्ही महाराष्ट्राचे कायस्वरूपी रहिवाशी आहात हे सिद्ध होते. डोमेसाइल सर्टिफिकेट स्कॉलरशिप आणि सरकारी योजनांच्या कामी येतं. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही गेली 15 वर्ष महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे किंवा तुमचे पालक गेली 6 […]

The post डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • महाराष्ट्राचे डोमेसाइल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.
  • 50 रुपये शुल्क आकारून सर्टिफिकेट घरी पोहोचवले जाते.
  • ऑफलाइन देखील डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येतो.

डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजेच वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र. हा एखाद्या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाच्या अधिवासाचा पुरावा असतो. महाराष्ट्राच्या डोमेसाइल सर्टिफिकेट द्वारे तुम्ही महाराष्ट्राचे कायस्वरूपी रहिवाशी आहात हे सिद्ध होते. डोमेसाइल सर्टिफिकेट स्कॉलरशिप आणि सरकारी योजनांच्या कामी येतं. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही गेली 15 वर्ष महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे किंवा तुमचे पालक गेली 6 वर्ष राज्यात राहत असले पाहिजेत. तसेच महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुषांशी लग्न करणाऱ्या महिला देखील डोमेसाइल सर्टिफिकेट मिळवू शकतात. यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करता येतो. पुढे आम्ही ऑनलाइन पद्धत सांगितली आहे.

महाराष्ट्राचं डोमेसाइल सर्टिफिकेट ऑनलाइन मिळवण्याची पद्धत

पायरी 1: सर्वप्रथम आपले सरकार वेबसाइटला भेट द्या. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

पायरी 2: होम पेजवरच ‘न्यू युजर? रजिस्टर हेअर’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

पायरी 3: पुढे आलेल्या दोन पर्यायांमधून ‘व्हेरिफाय मोबाइल युजींग ओटीपी’ किंवा ‘उपलोड कम्प्लिट प्रोफाइल युजींग ओटीपी’ यातील एकाची निवड करा.

पायरी 4: आवश्यक ती माहिती भरून ‘रजिस्टर’ बटनवर क्लिक करा.

पायरी 5: तुम्ही निवडलेला युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन आपले सरकार वेबसाइटवर लॉग इन करा.

पायरी 6: आता डावीकडे असलेल्या मेन्यूमधून ‘रेव्हेन्यू डिपार्टमेंट’ वर क्लिक करा.

पायरी 7: नंतर ड्रॉप डाउन यादीतून ‘रेव्हेन्यू सर्व्हिस’ उपविभागाची निवड करा.

पायरी 8: त्यानंतर ‘एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल’ ची निवड करा.

पायरी 9: आवश्यक ती माहिती भरा, कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट करा.

तुम्हाला एक अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबर मिळेल, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या डोमेसाइल सर्टिफिकेटची स्थिती जाणून घेण्यासाठी करू शकता. लक्षात असू द्या या वेबसाइटवरून तुम्ही फक्त अर्ज करू शकता, तुमचं सर्टिफिकेट मात्र तुमच्या 15 दिवसाच्या पत्यावर पाठवलं जाईल. तसेच डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी 50 रुपये शुल्क आकरेल जाईल. एकदा काढलेलं प्रमाणपत्र आयुष्यभर वापरता येतं. हे देखील वाचा: पुणे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाइन कसा भरावा, जाणून घ्या

डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी आवश्यक कागदपत्र

पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, लाइट बिल, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, ड्रायविंग लायसन्स, मालमत्ता नोंदणी उतारा, 7/12 आणि 8 अ चा उतारा

ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, ‘आरएसबीवाय’ कार्ड, ड्रायविंग लायसन्स

वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)

रहिवासाचा पुरावा : रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला

The post डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-domicile-certificate-maharashtra-online/feed/ 0