DTH Plan - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 Jan 2020 10:53:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/ https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/#respond Fri, 03 Jan 2020 10:53:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6181 ट्राईच्या या नवीन नियमांचा फायदा त्या सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांना टीव्ही बघायला आवडते.

The post 1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राई देशातील टीव्ही ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ट्राईच्या नवीन नियमांनुसार आता येत्या 1 मार्च 2020 पासून टीव्ही ग्राहकांना 130 रुपयांमध्ये (टॅक्स वगळता) कमीत कमी 200 फ्री टू एयर चॅनेल बघायला मिळतील. याआधी ग्राहकांना 130 रुपयांमध्ये फक्त 100 चॅनेल मिळत होते.

पुन्हा बदलेल चॅनेल्सची किंमत

ट्राईने स्पष्ट केले आहे कि कंपन्यांना नवीन टॅरिफची माहिती 15 जानेवारी पर्यंत आपल्या वेबसाइट वर अपडेट करावी लागेल. 30 जानेवारी पर्यंत पुन्हा सर्व चॅनेल्सची रेट लिस्ट अपडेट केली जाईल, ज्यानंतर ग्राहक चॅनेल नवीन किंमतींसह निवडू शकतील. ट्राईच्या या नवीन नियमांचा फायदा त्या सर्व ग्राहकांना मिळेल ज्यांना टीव्ही बघायला आवडते.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2019/09/oneplus-tv-main-image.jpg

ट्राईच्या नवीन नियमानंतर केबल ऑपरेटर आपल्या ग्राहकांकडून फ्री चॅनल्ससाठी प्रतिमाह 160 रुपयांपेक्षा जास्त पैसे घेऊ शकणार नाही. इतकेच नव्हे तर 12 रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारे सर्व टीव्ही चॅनेल कोणत्याही बुकेचा भाग असणार नाहीत. जर ग्राहकनाची इच्छा असेल तर ते हे चॅनल्स घेऊ शकतील. याआधी ग्राहकांना जबरदस्तीने 12 रुपयांपेक्षा जास्त किंमत किंमत असणारे टीव्ही चॅनेल बुके मध्ये घ्यावे लागत होते.

साल 2019 मध्ये भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण म्हणजे ट्राईने केबल आणि डीटीएच सब्सक्राइबर्सना आपल्या आवडीचे चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. या नवीन नियमानंतर ग्राहक आपल्या वापरानुसार, चॅनेलची लोकप्रियता तसेच भाषेच्या आधारावर निवड करू शकत होते. यामुळे त्यांना फक्त त्याच चॅनेल्ससाठी पैसे द्यावे लागतात जे त्यांना बघायचे आहेत. यात किड्स चॅनेल्स, मूवीज, न्यूज, इंफोटेंमेंट व स्पोर्ट्स चॅनेल्स सह प्रादेशिक भाषांचा पण समावेश आहे.

त्याआधी केबल ऑपरेटर व डीटीएच सर्विसेजकडून ग्राहकांना मंथली पॅकेज मिळायचे. या पॅकेज मध्ये कोणत्या चॅनेलची किंमत किती आहे तसेच कोणता चॅनेल फ्री आहे हि माहिती कधीही यूजर्सना मिळत नसे. पण आता असे होत नाही.

The post 1 मार्च पासून टीव्ही बघणे होणार स्वस्त, सरकारने दिली नव्या वर्षाची भेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tv-customers-will-get-200-channels-in-130-rupees-trai-gives-big-gift-this-new-year-2020/feed/ 0
डीटीएच चॅनलच्या किंमती माहित नाहीत का? या ऍप मध्ये बघा कोणत्या चॅनलची किती आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/trai-channel-selector-application-introduced-to-help-users-choose-channels-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/trai-channel-selector-application-introduced-to-help-users-choose-channels-in-marathi/#respond Fri, 25 Jan 2019 10:34:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3458 130 रुपयांच्या शुल्कात यूजर्सना 100 चॅनल्स दिले जातील

The post डीटीएच चॅनलच्या किंमती माहित नाहीत का? या ऍप मध्ये बघा कोणत्या चॅनलची किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने देशातील केबल व डीटीएच सेवेत मोठा बदल केल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. पण 91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी सांगतिले होते कि कोणत्या चॅनलची किंमत किती आहे आणि तुम्हाला केबल ऑपरेटरला किती पॅसे दयावे लागतील. आता ट्राई ने पण या समस्येचे गांभीर्य बघून आपले वेब ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. ट्राईचा उद्देश या ऍप्लिकेशनने चॅनल सिलेक्शन प्रोसेस सोप्पी करण्याचा आहे.

ट्राईचे केबल आणि डीटीएच संबंधित नवीन नियम 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू होतील. याबद्दल टीवी, रेडियो आणि वर्तमानपत्रात जाहिराती येत आहेत. पण डीटीएच चॅनलच्या किंमतींबद्दलचे कंफ्यूजन ग्राहकांच्या मनात तसेच आहे. याचेच उत्तर म्हणून चॅनल सिलेक्शन प्रोसेस सोप्पी करण्याच्या उद्देशाने नवीन वेब ऍप्लीकेशन लॉन्च केले आहे. ट्राईच्या चॅनल सिलेक्टर ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या चॅनलची लिस्ट बघू शकाल. तसेच या ऍप मध्ये तुमच्या द्वारा निवडल्या गेलेल्या चॅनलची किंमत पण समोर येते. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, ज्यानंतर तुमच्या आवडीनुसार चॅनलची लिस्ट तुमच्यासमोर येईल.

या ऍप्लिकेशनचा वापर करण्यासाठी इथे क्लिक करा. लिंक क्लिक केल्यांनतर काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज आपल्या आवडीचे चॅनल्स सिलेक्ट करू शकाल. डीटीएच सर्विस बदल बोलायचे तर त्यांनी वेगवेगळ्या चॅनल्सच्या स्वरूपात लिस्ट बनवली आहे. हे पॅकेज चॅनल ग्रुप्सनुसार व चॅनल्सच्या कॅटेगरीनुसार पण आहेत. उदाहरणार्थ झी नेटवर्कच्या चॅनलचा वेगळे पॅकेज, स्टार चॅनल्सचा वेगळा पॅकेज. तसेच मुलांसाठी कार्टून चॅनल्सचा वेगळा पॅकेज आणि मूवीज, न्यूज, इंफोटेंमेंट व स्पोर्ट्स चॅनल्सचा वेगळा पॅकेज. हे पॅकेज वेगवेगळ्या क्षेत्रिय भाषांनुसार पण आहेत.

विशेष म्हणजे ट्राईच्या नवीन नियमांनुसार केबल व डीटीएच वर आता दार माह न्यूनतम 130 रुपये (टॅक्स नंतर 153.40 रुपये) चे फिक्स शुल्क दयावे लागेल. या 130 रुपयांच्या शुल्कात यूजर्सना 100 चॅनल्स दिले जातील. इन 100 चॅनल्स मध्ये 26 चॅनल दूरदर्शनचे असतील तर 74 चॅनल खाजगी कंपन्यांचे असतील. या पॅक मध्ये मिळणारे 74 निजी चॅनल पण यूजर आपल्या मर्जीने निवडू शकतील. जे चॅनल त्यांना बघायचे आहेत ते 74 चॅनल त्यांच्या टीवी वर दिसतील. हे 74 चॅनल फ्री-टू-एयर असतील.

The post डीटीएच चॅनलच्या किंमती माहित नाहीत का? या ऍप मध्ये बघा कोणत्या चॅनलची किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-channel-selector-application-introduced-to-help-users-choose-channels-in-marathi/feed/ 0