डीटीएच चॅनलच्या किंमती माहित नाहीत का? या ऍप मध्ये बघा कोणत्या चॅनलची किती आहे किंमत

टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने देशातील केबल व डीटीएच सेवेत मोठा बदल केल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. पण 91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी सांगतिले होते कि कोणत्या चॅनलची किंमत किती आहे आणि तुम्हाला केबल ऑपरेटरला किती पॅसे दयावे लागतील. आता ट्राई ने पण या समस्येचे गांभीर्य बघून आपले वेब ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. ट्राईचा उद्देश या ऍप्लिकेशनने चॅनल सिलेक्शन प्रोसेस सोप्पी करण्याचा आहे.

ट्राईचे केबल आणि डीटीएच संबंधित नवीन नियम 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू होतील. याबद्दल टीवी, रेडियो आणि वर्तमानपत्रात जाहिराती येत आहेत. पण डीटीएच चॅनलच्या किंमतींबद्दलचे कंफ्यूजन ग्राहकांच्या मनात तसेच आहे. याचेच उत्तर म्हणून चॅनल सिलेक्शन प्रोसेस सोप्पी करण्याच्या उद्देशाने नवीन वेब ऍप्लीकेशन लॉन्च केले आहे. ट्राईच्या चॅनल सिलेक्टर ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या चॅनलची लिस्ट बघू शकाल. तसेच या ऍप मध्ये तुमच्या द्वारा निवडल्या गेलेल्या चॅनलची किंमत पण समोर येते. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, ज्यानंतर तुमच्या आवडीनुसार चॅनलची लिस्ट तुमच्यासमोर येईल.

या ऍप्लिकेशनचा वापर करण्यासाठी इथे क्लिक करा. लिंक क्लिक केल्यांनतर काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज आपल्या आवडीचे चॅनल्स सिलेक्ट करू शकाल. डीटीएच सर्विस बदल बोलायचे तर त्यांनी वेगवेगळ्या चॅनल्सच्या स्वरूपात लिस्ट बनवली आहे. हे पॅकेज चॅनल ग्रुप्सनुसार व चॅनल्सच्या कॅटेगरीनुसार पण आहेत. उदाहरणार्थ झी नेटवर्कच्या चॅनलचा वेगळे पॅकेज, स्टार चॅनल्सचा वेगळा पॅकेज. तसेच मुलांसाठी कार्टून चॅनल्सचा वेगळा पॅकेज आणि मूवीज, न्यूज, इंफोटेंमेंट व स्पोर्ट्स चॅनल्सचा वेगळा पॅकेज. हे पॅकेज वेगवेगळ्या क्षेत्रिय भाषांनुसार पण आहेत.

विशेष म्हणजे ट्राईच्या नवीन नियमांनुसार केबल व डीटीएच वर आता दार माह न्यूनतम 130 रुपये (टॅक्स नंतर 153.40 रुपये) चे फिक्स शुल्क दयावे लागेल. या 130 रुपयांच्या शुल्कात यूजर्सना 100 चॅनल्स दिले जातील. इन 100 चॅनल्स मध्ये 26 चॅनल दूरदर्शनचे असतील तर 74 चॅनल खाजगी कंपन्यांचे असतील. या पॅक मध्ये मिळणारे 74 निजी चॅनल पण यूजर आपल्या मर्जीने निवडू शकतील. जे चॅनल त्यांना बघायचे आहेत ते 74 चॅनल त्यांच्या टीवी वर दिसतील. हे 74 चॅनल फ्री-टू-एयर असतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here