DTH - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 25 Jan 2019 10:36:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डीटीएच चॅनलच्या किंमती माहित नाहीत का? या ऍप मध्ये बघा कोणत्या चॅनलची किती आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/trai-channel-selector-application-introduced-to-help-users-choose-channels-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/trai-channel-selector-application-introduced-to-help-users-choose-channels-in-marathi/#respond Fri, 25 Jan 2019 10:34:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3458 130 रुपयांच्या शुल्कात यूजर्सना 100 चॅनल्स दिले जातील

The post डीटीएच चॅनलच्या किंमती माहित नाहीत का? या ऍप मध्ये बघा कोणत्या चॅनलची किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने देशातील केबल व डीटीएच सेवेत मोठा बदल केल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. पण 91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी सांगतिले होते कि कोणत्या चॅनलची किंमत किती आहे आणि तुम्हाला केबल ऑपरेटरला किती पॅसे दयावे लागतील. आता ट्राई ने पण या समस्येचे गांभीर्य बघून आपले वेब ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. ट्राईचा उद्देश या ऍप्लिकेशनने चॅनल सिलेक्शन प्रोसेस सोप्पी करण्याचा आहे.

ट्राईचे केबल आणि डीटीएच संबंधित नवीन नियम 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू होतील. याबद्दल टीवी, रेडियो आणि वर्तमानपत्रात जाहिराती येत आहेत. पण डीटीएच चॅनलच्या किंमतींबद्दलचे कंफ्यूजन ग्राहकांच्या मनात तसेच आहे. याचेच उत्तर म्हणून चॅनल सिलेक्शन प्रोसेस सोप्पी करण्याच्या उद्देशाने नवीन वेब ऍप्लीकेशन लॉन्च केले आहे. ट्राईच्या चॅनल सिलेक्टर ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या चॅनलची लिस्ट बघू शकाल. तसेच या ऍप मध्ये तुमच्या द्वारा निवडल्या गेलेल्या चॅनलची किंमत पण समोर येते. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, ज्यानंतर तुमच्या आवडीनुसार चॅनलची लिस्ट तुमच्यासमोर येईल.

या ऍप्लिकेशनचा वापर करण्यासाठी इथे क्लिक करा. लिंक क्लिक केल्यांनतर काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज आपल्या आवडीचे चॅनल्स सिलेक्ट करू शकाल. डीटीएच सर्विस बदल बोलायचे तर त्यांनी वेगवेगळ्या चॅनल्सच्या स्वरूपात लिस्ट बनवली आहे. हे पॅकेज चॅनल ग्रुप्सनुसार व चॅनल्सच्या कॅटेगरीनुसार पण आहेत. उदाहरणार्थ झी नेटवर्कच्या चॅनलचा वेगळे पॅकेज, स्टार चॅनल्सचा वेगळा पॅकेज. तसेच मुलांसाठी कार्टून चॅनल्सचा वेगळा पॅकेज आणि मूवीज, न्यूज, इंफोटेंमेंट व स्पोर्ट्स चॅनल्सचा वेगळा पॅकेज. हे पॅकेज वेगवेगळ्या क्षेत्रिय भाषांनुसार पण आहेत.

विशेष म्हणजे ट्राईच्या नवीन नियमांनुसार केबल व डीटीएच वर आता दार माह न्यूनतम 130 रुपये (टॅक्स नंतर 153.40 रुपये) चे फिक्स शुल्क दयावे लागेल. या 130 रुपयांच्या शुल्कात यूजर्सना 100 चॅनल्स दिले जातील. इन 100 चॅनल्स मध्ये 26 चॅनल दूरदर्शनचे असतील तर 74 चॅनल खाजगी कंपन्यांचे असतील. या पॅक मध्ये मिळणारे 74 निजी चॅनल पण यूजर आपल्या मर्जीने निवडू शकतील. जे चॅनल त्यांना बघायचे आहेत ते 74 चॅनल त्यांच्या टीवी वर दिसतील. हे 74 चॅनल फ्री-टू-एयर असतील.

The post डीटीएच चॅनलच्या किंमती माहित नाहीत का? या ऍप मध्ये बघा कोणत्या चॅनलची किती आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-channel-selector-application-introduced-to-help-users-choose-channels-in-marathi/feed/ 0
इंटरनेट वर सोनी, स्टार आणि झी ला मागे टाकणार दूरदर्शन, देख भाई देख आणि इतर अनेक सीरीयल्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर येणार https://www.91mobiles.com/marathi/doordarshan-to-bring-its-iconic-shows-on-a-streaming-platform-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/doordarshan-to-bring-its-iconic-shows-on-a-streaming-platform-in-marathi/#respond Tue, 22 Jan 2019 10:56:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3425 आज देशात दूरदर्शनचे 23 चॅनल्स आहेत

The post इंटरनेट वर सोनी, स्टार आणि झी ला मागे टाकणार दूरदर्शन, देख भाई देख आणि इतर अनेक सीरीयल्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंटरनेट आणि केबल (डीटीएच) येण्याआधी टीवी वर फक्त दूरदर्शनचे राज्य होते. 90 च्या दशक पाहिलेल्यांना माहिती असेलच दूरदर्शन महत्व किती होते ते. पण आजकालच्या पिढीला दूरदर्शनचा खरा अर्थ माहित नसेल.

साल 1959 मध्ये दूरदर्शनची स्थापना झाली होती. आता 59 वर्षानंतर असे वाटत आहे कि दूरदर्शन वरील अविस्मरणीय कार्यक्रम पुन्हा आपल्या भेटीला येऊ शकतात. दूरदर्शन ने ‘हम लोग’ नंतर एकपेक्षा एक मालिका प्रेक्षकांना दिल्या. यात बुनियाद, कथा सागर, एक कहानी, ये जो है जिंदगी, वागले की दुनिया, मालगुडी डेज, करमचंद, खानदान, भारत एक खोज, कहां गए वो लोग, चुनौती, श्रीकांत, कर्मभूमि, अड़ोस-पड़ोस, कक्काजी कहीन, मिर्जा ग़ालिब, नुक्कड़, तमस, उड़ान, जीवन रेखा, रजनी, आणि चंद्रकांता अशा मालिकांचा समावेश आहे.

आता ओवर-द एयर (ओटीटी) प्लॅटफॉर्म च्या मदतीने या मालिका बघता येतील. दूरदर्शन आपला डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याची योजना बनवत आहे. जेणेकरून दूरदर्शनचा कंटेंट संपूर्ण जगासाठी उपलब्ध होईल. प्रसार भारती आणि दूरदर्शन च्या सीईओ सुप्रिया साहु ने आईएएनएस ला याबद्दल माहिती दिली आहे कि ते आपल्या प्रेक्षकांसाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सादर करू शकतात .

त्या म्हणाल्या “आमच्याकडे भरपूर कंटेंट आहे आणि भारत अनके लोक आमचे कार्यक्रम भागात मोठे झाले आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा प्लॅटफॉर्म वापरून प्रेक्षकांना आनंद देता येई का याचा विचार आम्ही करत आहोत. अनेक बाबतीत आज टीवी चा छोटा पडदा भारतीय सिनेमाच्या मोठ्या पडद्या पेक्षा पण पुढे गेला आहे. आज देशात दूरदर्शनचे 23 चॅनल्स आहेत.”

The post इंटरनेट वर सोनी, स्टार आणि झी ला मागे टाकणार दूरदर्शन, देख भाई देख आणि इतर अनेक सीरीयल्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर येणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/doordarshan-to-bring-its-iconic-shows-on-a-streaming-platform-in-marathi/feed/ 0
29 डिसेंबर पासून बंद होणार का तुमचे केबल कनेक्शन, वाचा सविस्तर https://www.91mobiles.com/marathi/trai-cable-tv-rules-paid-channel-price-tariff-guidelines-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/trai-cable-tv-rules-paid-channel-price-tariff-guidelines-in-marathi/#respond Thu, 27 Dec 2018 16:21:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3232 नवीन गाइउलाईन नंतर प्रत्येक चॅनेलची फिक्स किंमत ठरवण्यात आली आहे.

The post 29 डिसेंबर पासून बंद होणार का तुमचे केबल कनेक्शन, वाचा सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून टेलीविजन, वर्तमानपत्र आणि व्हाट्सऍप वर मेसेज येत आहेत कि 29 डिसेंबर पासून केबल चॅनेल्स बंद होतील आणि तुमच्या टीवी वर पुन्हा केबल कनेक्शन चालू करण्यासाठी भरपूर पैसे द्यावे लागतील. सामान्य लोक अशा बातम्यांमुळे त्रासलेले आहेत. लोक वरवर ऐकलेल्या गोष्टी एकमेकांना सांगत आहेत ज्यामुळे गोंधळ आणखीनच वाढत आहे. सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि घाबरण्याचे काही कारण नाही. ट्राई ने डीटीएच आणि केबल नेटवर्कच्या नियमांत रक मोठा बदल केला आहे जो 29 डिसेंबर पासून लागू होईल पण चांगली बाब अशी तुमचे केबल कनेक्शन बंद होणार नाही.

ट्राई म्हणजे टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने देशात केबल व डीटीएच सेवांमध्ये मोठा बदल केला आहे. आतापर्यंत लोकल केबल ऑपरेटर तसेच डीटीएच कंपन्या पॅक देत असत व मासिक शुल्क फिक्स होते, तर आता सामान्य माणसे आपल्या आवडीने चॅनेल निवडू शकतात. आता लोकांना फक्त त्याच चॅनेल्सचे पैसे द्यावे लागतील जे त्यांनी त्यांच्या आवडीने निवडले आहेत. असे चॅनेल जे त्यांचा केबलवाला देत होता पण यूजर ते बघत नव्हते ते आता यूजर आपल्या टीवी वरून काढून टाकू शकतात.

उदाहरणार्थ तुमचा केबलवाला तुमच्यकडून 300 रुपये महीना घेतो आणि तुम्हाला 400 च्या आसपास चॅनेल दिले जातात. तुम्ही आणि तुमचे कुटुंब आपल्या आवडीने, आपल्या मनोरंजन आणि आल्या गरजेनुसार दिवसातून जवळपास 25-35 चॅनेल बघता. या 35 चॅनेल्स मध्ये तुमच्या आईच्या सीरियल्स, तुमची मूवी, बाबांच्या बातम्या तसेच म्यूजिक, कार्टून आणि इंफोटेनमेंट चॅनेल यांचा समावेश असतो. यामुळे तुम्ही बघता फक्त 35 चॅनेल पण पैसे देता एकूण 400 चॅनेल्सचे. पण आता ट्राई च्या नवीन नियमांनंतर तुम्हाला फक्त त्याच 35 चॅनेल्सचे पैसे द्यावे लागतील जे तुम्ही बघता.

नवीन गाइउलाईन नंतर प्रत्येक चॅनेलची फिक्स किंमत ठरवण्यात आली आहे. जी 50 पैश्यांपासून सुरु होऊन अधिकतम 19 रुपयांपर्यंत आहे. ट्राई ने नवीन सेटअप बॉक्स लावण्याची व नवीन केबल कनेक्शनचे शुल्क पण फिक्स केले आहे जे जास्तीत जास्त 350 रुपये आहे. नवीन कनेक्शन वर कोणतीही केबल कंपनी यूजर्स कडून 350 रुपयांपेक्षा जास्त पैसा मागू शकत नाही. ट्राईचे हे नवीन नए नियम 29 डिसेंबर पासून सुरु होतील. पण यूजर आपल्या सवलतीनुसार पॅक निवडू शकतात. जोपर्यंत यूजर पॅक निवडत नाही तोपर्यंत त्यांची केबल अशीसारखीच चालेल.

ट्राई च्या नवीन नियमांनुसार केबल व डीटीएच वर आता दरमहिन्याला 130 रुपयांचे फिक्स शुल्क द्यावे लागेल. या 130 रुपयांमध्ये यूजर्सना 100 चॅनेल्स दिले जातील. या 100 चॅनेल्स मध्ये 26 चॅनेल दूरदर्शन चे असतील तर 74 चॅनेल खाजगी कंपन्यांचे असतील. या पॅक मध्ये मिळणारे 74 खाजगी चॅनेल पण यूजर आपल्या मर्जीने निवडू शकतील. जे चॅनेल त्यांना बघायचे आहेत तेच 74 चॅनेल त्यांना दिसतील. विशेष म्हणजे हे 74 चॅनेल फ्री-टू-एयर असतील.

या 74 फ्री-टू-एयर चॅनेल्स व्यतिरिक्त यूजर आपल्या आवडीनुसार इतर चॅनेल पण मिळवू शकतात जे पेड असतील. 100 पेक्षा अधिक चॅनेल्स साठी ग्राहकांना अतिरिक्त चॅनेलचे शुल्क दयावे लागेल जे 130 रुपयांमध्ये ऍड होईल. अतिरिक्त चॅनेलचे हे शुल्क 50 पैसे पासून सुरु होऊन अधिकतम 18 रुपयांपर्यंत आहे.

तुमचे आवडीचे चॅनेल्स निवडण्यासाठी तसेच सर्व चॅनेल्सच्या किंमतींची इथे क्लिक करा

The post 29 डिसेंबर पासून बंद होणार का तुमचे केबल कनेक्शन, वाचा सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-cable-tv-rules-paid-channel-price-tariff-guidelines-in-marathi/feed/ 0