Galaxy A51 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-gets-a-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-gets-a-price-cut-in-india/#respond Fri, 11 Sep 2020 09:04:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8102 Galaxy A71 आणि Galaxy A51 सोबत कंपनीने इंडस्ट्री फर्स्ट इनोवेशन Quick Switch फिचर सादर केला होता,

The post Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पुन्हा एकदा जगात सर्वात जास्त विकला जाणारा लोकप्रिय एंडरॉयड स्मार्टफोन Samsung Galaxy A51 भारतात स्वस्त झाला आहे. यावेळी ‘A’ सीरीजच्या गॅलेक्सी ए51 सह कंपनीने गॅलेक्सी ए71 ची किंमत पण कमी केली आहे. हे फोन्स कमी किंमतीत ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोर्स वर विकत घेता येतील. चला जाणून घेऊया प्राइस कट नंतर दोन्ही फोन्स कोणत्या किंमतीत विकले जात आहेत.

91मोबाईल्सला दोन्ही फोन्सच्या किंमत मध्ये कपात झाल्याची माहिती मोबाईल रिटेल स्टोर्स कडून मिळाली आहे. सॅमसंगने Galaxy A-सीरीजचे हे दोन्ही डिवाइस यावर्षीच्या सुरवातीला सादर केले होते. तसेच यातील Samsung Galaxy A51 ला काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात जास्त विकला जाणारा लोकप्रिय पॉप्युलर एंडरॉयड स्मार्टफोनचा अवॉर्ड मिळाला होता.

नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए51 बद्दल बोलायचे झाले तर या फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आता ऑफलाइन 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहक या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज ऑप्शन 25,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात. या किंमतीत फोन कंपनीच्या साइट वर पण लिस्ट आहे.

गॅलेक्सी ए71 फक्त 8GB रॅम आणि 128GB मेमरी सह येतो. हा डिवाइस आता ऑफलाइन स्टोर्स वर 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर फोन याच किंमतीत विकला जात आहे.

विशेष म्हणजे जीएसटीचे दर वाढल्यामुळे इतर मोबाईल फोन कंपन्यांसोबतच सॅमसंगने पण आपल्या फोन्सच्या किंमती वाढवल्या होत्या. पण आता कंपनी आपल्या फोन्सच्या किंमती कमी करत आहे.

Galaxy A71

Galaxy A71 आणि Galaxy A51 सोबत कंपनीने इंडस्ट्री फर्स्ट इनोवेशन Quick Switch फिचर सादर केला होता, त्याचबरोबर “On-Device AI” आधारित Content Suggestions पण प्राइवेसीला अजून सिक्योर बनवतो. GenZ आणि Millennials आज रोज प्राइवेसी इश्यूचा सामना करतात आणि याच गोष्टी लक्षात ठेऊन Quick Switch सारखा यूनिक सोल्युशन तयार केला गेला होता.

Samsung Galaxy A71 च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

Samsung Galaxy A51 च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी ए51 वीडियो

The post Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-gets-a-price-cut-in-india/feed/ 0
Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चा Quick Switch फीचर: प्राइवेसीसाठी सर्वात बेस्ट आणि सोप्पी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/protect-your-privacy-with-samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-quick-switch/ https://www.91mobiles.com/marathi/protect-your-privacy-with-samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-quick-switch/#respond Fri, 21 Aug 2020 13:00:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7837 Quick Switch सह तुम्ही Alt Z Life आरामात इन्जॉय करू शकता - तेही तुमच्या प्राइवेसीची चिंता केल्याविना.

The post Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चा Quick Switch फीचर: प्राइवेसीसाठी सर्वात बेस्ट आणि सोप्पी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
.td-post-featured-image { display: none; visibility:hidden !important; height:0px;
}

आजकाल स्मार्टफोन आपल्याला प्रोडक्टिव राहण्यास, कनेक्टेड राहण्यास, फास्ट इन्फॉर्मेशन मिळवण्यास आणि आपली आवड व पॅशन जोपासण्यास मदत करतात. स्मार्टफोन मध्ये आजकाल आपण सर्व प्रकारच्या पर्सनल इन्फॉर्मेशन व्यतिरिक्त, ईमेल आणि मेसेज पासून कामासंबंधित सर्व प्रकारचा डेटा ठेवतो. त्यामुळे स्मार्टफोनने आपला पर्सनल डेटा सुरक्षित ठेवणे आणि प्राइवेसीशी तडजोड न करणे हे खूप महत्वपूर्ण आहे.

प्राइवेसीचा अर्थ असा आहे कि एखाद्या व्यक्तीचे आयुष्य खाजगी ठेवणे, मग ते मित्र असो, कुटुंब असो वा अन्य कोणी. आणि इथेच Alt Z Life चा विषय येतो.

आपल्यापैकी अनेक, खासकरून Gen Z आणि Millennials अश्या प्रसंगाना सामोरे गेले असतील जेव्हा आपल्या परिवारातील व्यक्तीं किंवा मित्रा स्मार्टफोन कॉल करण्यासाठी मागतात आणि जोपर्यंत कॉल संपतो ते पर्सनल गॅलरी पर्यंत पोचलेले असतात. तुम्हाला अश्या प्रसंगापासून वाचायचे तर असते पण तुम्ही अश्यावेळी “No” पण म्हणू शकत नाही. कधी अश्या आयुष्याची कल्पना केली आहे का जिथे तुम्ही कोणत्याही प्राइवेसीच्या चिंतेविना आपला फोन इतरांना देऊ शकता?

अश्या लाइफला Alt Z Life म्हणतात आणि यात तुमची पर्सनल लाइफ अगदी पर्सनल राहते. हे स्वप्न नाही तर रियालिटी आहे आणि तीही फक्त डबल क्लिकच्या अंतरावर आहे.

तुम्ही याचाच विचार करताय ना कि हि Alt Z Life कशी एन्जॉय करावी? चला तर याची सविस्तर माहिती घेऊ …

तुमच्या प्राइवेसीची असेल गॅरन्टी

Quick Switch, एक नवीन फीचर आहे जो सध्या Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 स्मार्टफोन वर उपलब्ध झाला आहे. हा तुमचा Alt Z Life जगण्याचा एक रस्ता आहे, एक माध्यम आहे. या फीचरची डेवलपमेंट ‘Make for India’ इनिशिएटिव अंतर्गत करण्यात आली आहे जो Gen Z आणि Millennial स्मार्टफोन यूजर्सच्या गरजा लक्षात ठेऊन बनवण्यात आला आहे. Quick Switch एक स्मार्ट प्राइवेसी फीचर आहे, जो तुम्हाला Alt Z लाइफ जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करतो. जसे कि — सुविधा, सीमलेसनेस आणि सर्वात महत्वपूर्ण विवेक. हा फीचर तुम्हाला तुमच्या आवडीच्या ऍप्सचे पर्सनल आणि पब्लिक इंस्टंस, पिक्स, कंटेंट आणि सोशल लाइफ मध्ये स्विच करण्याची सुविधा देतो तेही इतरांच्या न कळत. फक्त तुम्हाला Side Key वर डबल टॅप करायची आहे.

Infographic: Galaxy A51 आणि A71 वर Quick Switch and Content Suggestions कशाप्रकारे काम करतात ते इथे तुम्ही बारकाईने बघू शकता.

तुमच्या फोटो गॅलरीचे उदाहरण घ्या. Millennials आणि Gen Z कडे असे अनेक फोटोज आणि वीडियोज असतात जे त्यांना दुसऱ्यांना दाखवायचे नसतात. आतापर्यंत उपाय हाच होता कि तुम्ही गॅलरीसाठी एक ऍप लॉक वापरत होता. परंतु तेव्हा काय करायचे जेव्हा तुमचे मित्र-मैत्रीण किंवा भाऊ बहीण तुम्हाला ऍप अनलॉक करण्यास सांगतात? अश्यावेळी तुम्हाला गॅलरी अनलॉक करावीच लागते… आणि तुमची सर्व प्राइवेसी आणि प्रोटेक्शन तिथल्या तिथेच राहते.

Quick Switch फीचर तुम्हाला मुख्य गॅलरी आणि प्राइवेट गॅलेरी मध्ये स्विच करण्याचा खूप सोप्पा ऑप्शन देतो. इथे सिक्योर फोल्डर मध्ये एक प्राइवेट गॅलरी क्रियेट होते जिथे एक फोल्डर पब्लिकसाठी असतो तर दुसरा फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे ते सर्व फोटो जे तुम्हाला जगाला दाखवायचे असतील, जसे कि प्रवासात तुम्ही घेतलेले फोटो, तुम्ही एखाद्या इवेंट मध्ये काढलेले फोटो इत्यादी गॅलरीच्या पब्लिक वर्जन मध्ये असू शकतात. तर दुसरीकडे, प्राइवेट फोटोज- जसे कि पर्सनल मोमेंट्स, पार्टीचा एखादा क्रेजी वीडियो अजून बरेच काही – हे सर्व तुमच्या प्राइवेट गॅलरी ऍप मध्ये असतील.. प्राइवेट फोल्डर मध्ये हे फोटो तुमच्याव्यतिरिक्त कोणी बघू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना परवानगी देत नाही.

यात अजून खूप काही आहे: विशेष म्हणजे Quick Switch फक्त गॅलरी सारख्या डिफॉल्ट ऍप्स सोबत काम करत नाही तर हा व्हाट्सऍप्प कनवर्सेशन, स्नॅपचॅट प्रोफाइल आणि ब्राउजर सहित इतर अनेक ऍप मध्ये पण पब्लिक व्यू लपवण्यास तुमची सहायता करतो. सिक्योर फोल्डर मध्ये तुमच्याकडे तुमच्या ऍप्सचे प्राइवेट वर्जन असू शकते, हा डिफेंस-ग्रेड Samsung Knox सिक्योरिटी प्लॅटफॉर्म द्वारे संचालित एक ब्राउजर आहे जो तुमची प्राइवेट स्पेस पूर्णपणे एन्क्रिप्टेड करतो. अश्याप्रकारे हा तुम्हाला तुमच्या फोन वर असलेल्या एखाद्या पर्सनल गोष्टीबाबत असुरक्षित वाटू देत नाही.

Quick Switch सह तुम्ही Alt Z Life आरामात इन्जॉय करू शकता – तेही तुमच्या प्राइवेसीची चिंता केल्याविना. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कि हे फीचर इतके खास कसे आहे?

जाणून घ्या तुमच्या Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 मध्ये Quick Switch फीचर कसे सेटअप करायचे

Content Suggestions फीचर द्वारे तुमची प्राइवेसी ठेवा स्मार्टली सिक्योर

तुमची प्राइवेसी अजून स्मार्ट पद्धतीने मॅनेज करण्यासाठी, यात एक इंटेलिजेंट Content Suggestions फीचर आहे. हा “On-Device” AI चा वापर करून मुख्य गॅलरी मध्ये प्राइवेट फोटोज ओळखतो आणि ते सिक्योर फोल्डर मध्ये पूर्व-निर्धारित आईडेंटिफायर फिल्टरच्या मदतीने प्राइवेट गॅलरी मध्ये मूव करण्याचा सल्ला देतो. तुम्ही AI द्वारे सुचवलेल्या इमेजेस रिव्यू करू शकता आणि त्या प्राइवेट गॅलरी मध्ये टाकू शकता किंवा त्या पब्लिक गॅलरी मध्ये ठेऊ शकता. पहिल्यांदाच एखाद्या ब्रँडने भारतात स्मार्टफोन यूजर्सच्या प्राइवेसीसाठी On-Device AI चा वापर केला आहे.

जाणून घ्या तुमच्या Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 मध्ये Content Suggestions फीचर कश्याप्रकारे सेटअप करायचा

तुमची Alt Z Life होत आहे आज पासून सुरु

आता पर्यंत तुम्हाला समजले असेल कि कशाप्रकारे Alt Z life ला GenZ आणि Millennials यांना लक्षात ठेऊन डिजाइन करण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे आहे कि आज पासून तुमची भावंडं किंवा मित्र-मैत्रिणी, तुमच्या फोन मध्ये गेम खेळण्यासाठी, मूवी बघण्यासाठी किंवा इतर एखाद्या कामासाठी पण फोन मागत असतील तर त्याचा वापर करताना तुमची चॅट किंवा फोटो बघण्याचा प्रयत्न करत असतील याची चिंता सोडा. Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 डिफेंस-ग्रेड Knox सिक्योरिटी सह उपलब्ध आहेत जे तुम्हाला टेंशन फ्री लाइफ इन्जॉय करण्याचा विश्वास देतात जो तुम्हाला नेहमीच हवा होता.

आणि आज पासून तुमच्या Alt Z life ला म्हणा hello

Galaxy A71 आणि Galaxy A51 भारतातील जवळपास सर्व प्रमुख रिटेल स्टोर, Samsung.com आणि E-commerce चॅनेल्स वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अलीकडेच यांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत आणि यासोबत आता आकर्षक ऑफर पण दिल्या जात आहेत. Galaxy A71 वर 2,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आहे, तर Galaxy A51 वर 1,500 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. हि ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 आजच खरेदी करा!

The post Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चा Quick Switch फीचर: प्राइवेसीसाठी सर्वात बेस्ट आणि सोप्पी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/protect-your-privacy-with-samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-quick-switch/feed/ 0
Exclusive: भारतात सुरु झाले Samsung Galaxy A51 चे प्रोडक्शन, जानेवारी मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-productions-starts-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-productions-starts-in-india/#respond Thu, 31 Oct 2019 15:24:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5641 Samsung Galaxy A51 एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह लॉन्च होणारा पहिला फोन असेल.

The post Exclusive: भारतात सुरु झाले Samsung Galaxy A51 चे प्रोडक्शन, जानेवारी मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यांपूर्वी बातमी आली होती कि Samsung Galaxy A50 नंतर याचा अपग्रेड वर्जन Samsung Galaxy A51 आणण्याची तयारी करत आहे. अलीकडेच कंपनीने हे नाव पेटेंट पण केले आहे. 91मोबाईल्स कडे या फोन बद्दल आता मोठी बातमी आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या Samsung Galaxy A51 चे प्रोडक्शन कंपनीच्या ग्रेटर नोएडा फॅक्टरी मध्ये सुरु झाले आहे. सध्यातरी हे टेस्टिंग फेज मध्ये आहे आणि अजूनतरी लॉन्च होण्यास थोडा वेळ आहे पण कंपनीने फोनची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन जवळपास ठरवले आहेत.

91मोबाईल्सला हि माहिती सॅमसंगच्या एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. त्यांनी सांगितले आहे कि “सॅमसंग गॅलेक्सी ए515 मॉडेलची निर्मिती ग्रेटर नोएडा येथील फॅक्टरी मध्ये सुरु झाली आहे आणि याचा 3डी रेंडर इत्यादी पण तयार झाला आहे.” पण ते म्हणाले कि “अजून डिजाइन बद्दल जास्त माहिती देण्यात आलेली नाही पण लवकरच या फोन संबंधित माहिती समोर येईल.”

सॅमसंग गॅलेक्सी ए51 चे स्पेसिफिकेशन

विशेष म्हणजे सॅमसंगने अलीकडेच आपल्या काही फोनची नावे पेटेंट केली आहेत जे 2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहेत. यातील एक मॉडेल Galaxy A51 आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन प्रमुख सर्टिफिकेशन साइट टेना वर पण लिस्ट झाला होता जिथे प्रोसेसर आणि रॅमची थोडी माहिती समोर आली आहे. लिस्ट केला गेलेला फोन सॅमसंगच्या एक्सनोस 9611 चिपसेट वर आधारित होता. ऑक्टकोर प्रोसेसर सह फोन मध्ये 4जीबी रॅमची माहिती देण्यात आली आहे. खास बाब अशी कि हा फोन एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालत होता. त्यामुळे आशा आहे कि Samsung Galaxy A51 एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह लॉन्च होणारा पहिला फोन असेल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A90s सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 4200एमएएच बॅटरी सह होईल लॉन्च

सॅमसंगचा 2020 प्लान

सॅमसंगने 2019 मध्ये गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत जगभरात गॅलेक्सी ए90, ए80, ए70, ए60, ए50, ए40, ए30, ए20 आणि ए10 मॉडेल सादर केले आहेत. तर 2020 मध्ये कंपनी हीच सिरीज वाढवत यांचे अपग्रेड घेऊन येणार आहे ज्यात गॅलेक्सी ए91, ए81, ए71, ए61, ए51, ए41, ए31, ए21 आणि ए11 च्या नावांचा समावेश आहे. तसेच इतर अनेक फोन येतील ज्यांच्या नावाचे कंपनीने पेटेंट घेतले आहे.

The post Exclusive: भारतात सुरु झाले Samsung Galaxy A51 चे प्रोडक्शन, जानेवारी मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-productions-starts-in-india/feed/ 0