Galaxy Z Flip 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 Aug 2022 09:17:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लोकांच्या नजारा ‘वळतील’ असा फोन! Samsung ने लाँच केला फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 4 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip4-and-galaxy-z-fold4-launched-india-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip4-and-galaxy-z-fold4-launched-india-price-specifications-sale-offer/#respond Thu, 11 Aug 2022 09:17:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12177 Samsung नं आपल्या अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन करत काल आपले दोन फोल्डेबल मोबाइल फोन Samsung Galaxy Z Flip4 आणि Samsung Galaxy Z Fold4 लाँच केले आहेत. जागतिक बाजारात लाँच झालेले हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात देखील ऑफिशियल झाले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन शानदार इनोवेशन आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचं प्रतीक आहेत. . सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप4 च्या […]

The post लोकांच्या नजारा ‘वळतील’ असा फोन! Samsung ने लाँच केला फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 4 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung नं आपल्या अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन करत काल आपले दोन फोल्डेबल मोबाइल फोन Samsung Galaxy Z Flip4 आणि Samsung Galaxy Z Fold4 लाँच केले आहेत. जागतिक बाजारात लाँच झालेले हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात देखील ऑफिशियल झाले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन शानदार इनोवेशन आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचं प्रतीक आहेत. . सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप4 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

Samsung Galaxy Z Flip 4 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7-inch AMOLED cover display
  • 1.9-inch secondary display
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen1
  • Android 12 OS
  • 12MP + 12MP dual Rear camera
  • 10MP Selfie camera
  • 3,700mAh battery, 25W fast charging

Samsung Galaxy Z Flip 4 Design Display

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 4 सारखी विलक्षण डिजाईन कुठेही मिळणार नाही. या स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्यात आहेत. एक फोन अनफोल्ड केल्यावर दिसते आणि दुसरी कायम वर असते. सेकंडरी डिस्प्लेवर नोटिफिकेशन्स, टाईम, कॅलेंडर इत्यादी बघता येतात.

Galaxy Z Flip4 ची मेन स्क्रीन 6.7 इंचाचा डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स फ्लॅक्स डिस्प्ले आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. तसेच फोनमध्ये 1.9 इंचाचा सेकंडरी सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन IPX8 रेटिंगसह बाजारात आला आहे.

Samsung Galaxy Z Flip 4 Camera

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy Z Flip4 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे दोन 12 मेगापिक्सल सेन्सर देण्यात आले आहेत. प्रायमरी रियर कॅमेरा एक 12MP Ultra Wide Lens आहे जो एफ/2.2 अपर्चरसह येतो. तर एफ/1.8 अपर्चर असलेला 12MP Wide-angle सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Z Flip 4 Processor And OS

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 4 लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो सॅमसंगच्या वनयुआय 4.1.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जोडीला 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आलेला Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट आहे. हा मोबाइल फोन 5G, 4G LTE, Wi-Fi आणि Bluetooth v5.2 ला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Z Flip 4 Battery

हा फोल्डेबल सॅमसंग स्मार्टफोन जितका स्टायलिश स्टायलिश आणि स्लीक दिसतो. तितकी पावरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे. बॅटरीमुळे फोनची जाडीवर फरक पडला नाही. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप4 फोन 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आली आहे.

The post लोकांच्या नजारा ‘वळतील’ असा फोन! Samsung ने लाँच केला फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 4 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip4-and-galaxy-z-fold4-launched-india-price-specifications-sale-offer/feed/ 0
1999 रुपयांमध्ये बुक करा शक्तिशाली आणि हटके Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4; सोबत अनेक ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-4-and-galaxy-z-fold-4-pre-booking-starts-at-rs-1999-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-4-and-galaxy-z-fold-4-pre-booking-starts-at-rs-1999-ahead-of-launch/#respond Mon, 01 Aug 2022 10:14:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11887 Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 स्मार्टफोन ऑनलाइन Samsung.com आणि ऑफलाइन Samsung Exclusive स्टोरवरून बुक करता येत आहेत.

The post 1999 रुपयांमध्ये बुक करा शक्तिशाली आणि हटके Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4; सोबत अनेक ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारात अनेक चिनी खेळाडू आल्यामुळे एकेकाळी अँड्रॉइड स्मार्टफोन सेगमेंटवर राज्य करणाऱ्या दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगचं महत्व कमी झालं आहे. परंतु एका नव्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अजूनही सॅमसंगला कोणीही टक्कर देत नाही, ती म्हणजे फोल्डेबल स्मार्टफोन. लवकरच कंपनी आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन्सची चौथी पिढी सादर करणार आहे. म्हणून Samsung नं भारतात आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु केली आहे. 31 जुलैला ही बुकिंग सुरु झाली असून हे दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोन 10 ऑगस्टला लाँच केले जातील. प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना फोन लवकर मिळतील आणि सोबत अनेक स्पेशल ऑफर्सचा लाभ देखील मिळेल. .

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 ची प्री बुकिंग

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 स्मार्टफोनची प्री-बुकिंग 31 जुलै 2022 रोजी सुरु झाली आहे. सॅमसंगचे फोन प्री-बुकिंगसाठी ग्राहकांना 1,999 रुपयांची टोकन अमाउंट जमा करावी लागेल. हे फोन ऑनलाइन Samsung.com आणि ऑफलाइन Samsung Exclusive स्टोरवरून बुक करता येतील. अशा हे स्मार्टफोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना फोनसह 5000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट मिळतील.

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 ची लाँच डेट

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला आयोजित Galaxy Unpacked इव्हेंटमधून संध्यकाळी 6.30PM वाजता लाँच होतील. फोल्डेबल स्मार्टफोनसह कंपनी या दिवशी आपले आगामी प्रोडक्ट देखील सादर करेल. ज्यात Samsung Galaxy Watch 5 सीरीज (Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro) आणि Samsung Galaxy Buds 2 Pro चा समावेश असेल.

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 चे संभाव्य स्पेक्स

सॅमसंगनं रिलीज केलेल्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटच्या ट्रेलर व्हिडीओमधून आगामी Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनच्या डिजाइन आणि संबंधित काही माहिती लाँचच्या आधीच समजली आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. तसेच व्हिडीओनुसार सॅमसंगचा हा फोन फ्लॅट साइड डिजाइनसह सादर करण्यात येईल. तसेच फोनमधील Flex मोडचा देखील खुलासा झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार Samsung चे आगामी फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 मध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर मिळू शकतो. तसेच Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनमधील बाहेरील डिस्प्ले आधीपेक्षा जास्त मोठा असेल आणि फ्लॅट एज देण्यात येतील. तसेच दोन्ही फोनचा कॅमेरा सेटअप अपग्रेड करण्यात येईल. या इव्हेंटमधून सॅमसंग Galaxy Buds 2 चं प्रो व्हर्जन आणि One UI 5 देखील सादर करू शकते.

The post 1999 रुपयांमध्ये बुक करा शक्तिशाली आणि हटके Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4; सोबत अनेक ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-4-and-galaxy-z-fold-4-pre-booking-starts-at-rs-1999-ahead-of-launch/feed/ 0