Galaxy Z Fold 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 Aug 2022 08:53:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung चा सर्वात शक्तिशाली 5G फोन Galaxy Z Fold 4 लाँच; 5 Camera, 12GB RAM आणि खूप काही https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-4-snapdragon-8-gen1-launched-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-4-snapdragon-8-gen1-launched-india-price-specifications/#respond Thu, 11 Aug 2022 08:53:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12171 सॅमसंगनं काल आपल्या वार्षिक Galaxy Unpacked 2022 इव्हेंटमधून दोन नवीन Foldable Phone सादर केले आहेत. दक्षिण कोरियन कंपनी Samsung नं या इव्हेंटमधून Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 हे दोन मोठे फ्लॅगशिप लाँच केले आहेत, जे गेल्यावर आलेल्या Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 चे अपग्रेडेड व्हर्जन आहेत. […]

The post Samsung चा सर्वात शक्तिशाली 5G फोन Galaxy Z Fold 4 लाँच; 5 Camera, 12GB RAM आणि खूप काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं काल आपल्या वार्षिक Galaxy Unpacked 2022 इव्हेंटमधून दोन नवीन Foldable Phone सादर केले आहेत. दक्षिण कोरियन कंपनी Samsung नं या इव्हेंटमधून Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 हे दोन मोठे फ्लॅगशिप लाँच केले आहेत, जे गेल्यावर आलेल्या Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 चे अपग्रेडेड व्हर्जन आहेत. Samsung Galaxy Z Fold 4 बद्दल बोलायचे तर हा पहिला फोल्डेबल फोन आहे जो Android 12L सह बाजारात येईल, जो गुगलनं मोठी स्क्रीन असलेल्या डिवाइससाठी डिजाइन केला आहे. या लेखात आपण फोल्ड 4 च्या फीचर्स, किंमत आणि डिजाइनची माहिती घेणार आहोत.

Samsung Galaxy Z Fold 4 ची किंमत आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 ची किंमत 1,799 डॉलर (सुमारे 1,42,000 रुपये) पासून सुरु होते. हा फोल्डेबल फोन भारतात आधीच प्री-रिजर्वेशनसाठी उपलब्ध झाला आहे आणि या महिन्याच्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु अजूनतरी कंपनीनं या फोनच्या भारतीय किंमतचा खुलासा केला नाही.

Samsung Galaxy Z Fold 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • 6.2-इंच अ‍ॅमोलेड कव्हर डिस्प्ले
  • 7.6-इंच डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen1 चिपसेट
  • अँड्रॉइड 12L ओएस
  • 50एमपी + 12एमपी + 10एमपी ट्रिपल रियर कॅमेरा
  • 4MP + 10MP फ्रंट कॅमेरा सेन्सर
  • 4,400mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग

डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2316 x 904 पिक्सल रेजोल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर फोनच्या आतल्या बाजूस 120Hz रिफ्रेश रेटसह 7.6-इंचाचा QXGA+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे.

प्रोसेसिंग पावर: फोल्डेबल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen1 चिपसेट देण्यात आला आहे जो एड्रेनो GPU सह मिळून चालतो. Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि शक्तिशाली प्रोसेसर आहे. फोनमध्ये 12GB रॅम 256GB/512GB/1TB स्टोरेज मिळते.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ड्युअल पिक्सल एएफ, ओआयएस आणि एफ/1.8 सह 50 एमपीचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12 एमपीची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि f/2.4 अपर्चर व पीडीएएफ सह 10 एमपीचा टेलीफोटो कॅमेरा आहे. तर , फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी f/1.8 अपर्चरसह 4MP चा इन-स्क्रीन कॅमेरा आणि कव्हर डिस्प्लेवर f/2.4 अपर्चरसह 10MP चा सेन्सर आणि सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी: सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 मध्ये 25W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगसह 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोल्डेबल फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि एस पेनला सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

The post Samsung चा सर्वात शक्तिशाली 5G फोन Galaxy Z Fold 4 लाँच; 5 Camera, 12GB RAM आणि खूप काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-4-snapdragon-8-gen1-launched-india-price-specifications/feed/ 0
1999 रुपयांमध्ये बुक करा शक्तिशाली आणि हटके Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4; सोबत अनेक ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-4-and-galaxy-z-fold-4-pre-booking-starts-at-rs-1999-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-4-and-galaxy-z-fold-4-pre-booking-starts-at-rs-1999-ahead-of-launch/#respond Mon, 01 Aug 2022 10:14:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11887 Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 स्मार्टफोन ऑनलाइन Samsung.com आणि ऑफलाइन Samsung Exclusive स्टोरवरून बुक करता येत आहेत.

The post 1999 रुपयांमध्ये बुक करा शक्तिशाली आणि हटके Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4; सोबत अनेक ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारात अनेक चिनी खेळाडू आल्यामुळे एकेकाळी अँड्रॉइड स्मार्टफोन सेगमेंटवर राज्य करणाऱ्या दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगचं महत्व कमी झालं आहे. परंतु एका नव्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अजूनही सॅमसंगला कोणीही टक्कर देत नाही, ती म्हणजे फोल्डेबल स्मार्टफोन. लवकरच कंपनी आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन्सची चौथी पिढी सादर करणार आहे. म्हणून Samsung नं भारतात आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु केली आहे. 31 जुलैला ही बुकिंग सुरु झाली असून हे दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोन 10 ऑगस्टला लाँच केले जातील. प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना फोन लवकर मिळतील आणि सोबत अनेक स्पेशल ऑफर्सचा लाभ देखील मिळेल. .

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 ची प्री बुकिंग

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 स्मार्टफोनची प्री-बुकिंग 31 जुलै 2022 रोजी सुरु झाली आहे. सॅमसंगचे फोन प्री-बुकिंगसाठी ग्राहकांना 1,999 रुपयांची टोकन अमाउंट जमा करावी लागेल. हे फोन ऑनलाइन Samsung.com आणि ऑफलाइन Samsung Exclusive स्टोरवरून बुक करता येतील. अशा हे स्मार्टफोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना फोनसह 5000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट मिळतील.

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 ची लाँच डेट

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला आयोजित Galaxy Unpacked इव्हेंटमधून संध्यकाळी 6.30PM वाजता लाँच होतील. फोल्डेबल स्मार्टफोनसह कंपनी या दिवशी आपले आगामी प्रोडक्ट देखील सादर करेल. ज्यात Samsung Galaxy Watch 5 सीरीज (Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro) आणि Samsung Galaxy Buds 2 Pro चा समावेश असेल.

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 चे संभाव्य स्पेक्स

सॅमसंगनं रिलीज केलेल्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटच्या ट्रेलर व्हिडीओमधून आगामी Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनच्या डिजाइन आणि संबंधित काही माहिती लाँचच्या आधीच समजली आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. तसेच व्हिडीओनुसार सॅमसंगचा हा फोन फ्लॅट साइड डिजाइनसह सादर करण्यात येईल. तसेच फोनमधील Flex मोडचा देखील खुलासा झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार Samsung चे आगामी फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 मध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर मिळू शकतो. तसेच Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनमधील बाहेरील डिस्प्ले आधीपेक्षा जास्त मोठा असेल आणि फ्लॅट एज देण्यात येतील. तसेच दोन्ही फोनचा कॅमेरा सेटअप अपग्रेड करण्यात येईल. या इव्हेंटमधून सॅमसंग Galaxy Buds 2 चं प्रो व्हर्जन आणि One UI 5 देखील सादर करू शकते.

The post 1999 रुपयांमध्ये बुक करा शक्तिशाली आणि हटके Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4; सोबत अनेक ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-flip-4-and-galaxy-z-fold-4-pre-booking-starts-at-rs-1999-ahead-of-launch/feed/ 0