Gaming - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 31 Jul 2019 11:00:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi भारतात लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन, बदलून जाईल गेमिंगचे जग https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-an-affordable-gaming-smartphone-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-an-affordable-gaming-smartphone-soon-in-india/#respond Wed, 31 Jul 2019 11:00:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4939 बोलले जात आहे कि शाओमीचा गेमिंग स्मार्टफोन भारतात ब्लॅक शार्क, आसुस ROG आणि नूबिया रेड मॅजिक सारख्या फोन्सना टक्कर देईल.

The post Xiaomi भारतात लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन, बदलून जाईल गेमिंगचे जग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी भारतात गेमिंगचे वाढते वेड बघून आता गेमिंग स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे. यासाठी कंपनी MediaTek Helio G90T प्रोसेसर लॉन्च झाल्यानंतर काही तासांनी घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच भारतात या चिपसेट सह नवीन फोन लॉन्च करेल.

कंपनीने ट्वीट करून हि माहिती दिली आहे कि ती या चिपसेट सह गेमिंग स्मार्टफोन सादर करेल. बोलले जात आहे कि शाओमीचा गेमिंग स्मार्टफोन भारतात ब्लॅक शार्क, आसुस ROG आणि नूबिया रेड मॅजिक सारख्या फोन्सना टक्कर देईल.

मीडियाटेकच्या या नवीन प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर यात ऑक्टा-कोर सीपीयू देण्यात आला आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.05 गीगाहर्ट्ज आहे. तसेच या नवीन चिपसेट मध्ये 10जीबी LPDDR4x रॅम चा सपॉर्ट आहे.

हे देखील वाचा: ट्रिपल डिस्प्ले सह येऊ शकतो सॅमसंगचा अपकमिंग फोन, सर्वात यूनिक असेल डिजाइन

गेमिंग सेंट्रिक चिपसेट असल्यामुळे यात हाइपर इंजन टेक्नॉलजी देण्यात आली आहे. या टेक्नॉलजीच्या मदतीने डिवाइसची परफॉर्मेंस खूप चांगली होईल. तसेच या चिपसेट वर फोन लॉन्च झाल्यानंतरच फोनच्या परफॉर्मेंस बद्दल जास्त माहिती समोर येईल.

तसेच नवीन चिपसेट 48-मेगापिक्सल सोबतच साथ 64-मेगापिक्सल 4 सेल सेंसर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो कि फोन मध्ये 48 किंवा 64-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. पण या चिपसेट सह लॉन्च होणाऱ्या फोन बद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा: Xiaomi घेऊन येत आहे नवीन 5G फोन, 16जीबी रॅम सह होऊ शकतो लॉन्च

विशेष म्हणजे नुकताच Black Shark 2 Pro गेमिंग स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी ब्रँडचा हा नवीन हँडसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस प्रोसेसर, 12 जीबी रॅम आणि इतर अनेक खास फीचर्स सह येतो. यात अपग्रेडेड डीसी डिमिंग 2.0 आणि लिक्विड कूलिंग 3.0 + टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

The post Xiaomi भारतात लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन, बदलून जाईल गेमिंगचे जग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-to-launch-an-affordable-gaming-smartphone-soon-in-india/feed/ 0
PUBG न खेळून दिल्याने 16 वर्षीय मुलाने लावून घेतला गळफास https://www.91mobiles.com/marathi/16-year-old-10-class-student-hyderabad-boy-commits-suicide-being-scolded-for-playing-pubg/ https://www.91mobiles.com/marathi/16-year-old-10-class-student-hyderabad-boy-commits-suicide-being-scolded-for-playing-pubg/#respond Thu, 04 Apr 2019 13:29:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4010 शिवची दहावीची परीक्षा चालू होती पण अभ्यासापेक्षा जास्त वेळ तो मोबाईल वर गेम खेळण्यात घालवत होता.

The post PUBG न खेळून दिल्याने 16 वर्षीय मुलाने लावून घेतला गळफास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल गेम खेळणे वाईट गोष्ट नाही, मग तो एखादा ऑनलाइन गेम असो किंवा ऑफलाइन गेम. बोलले जाते कि अशाप्रकारचे गेम्स खेळण्याने बुद्धी तल्लख होते आणि विचार करण्याची क्षमता पण वेगवान होते. पण जेव्हा गेम खेळण्याची हौस व्यसनात परावर्तित होते तेव्हा ती धोकादायक ठरते. अशाच एका गेम ने आज संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे, ज्याचे नाव आहे ‘पबजी’. PUBG म्हणजे PLAYER UNKNOWN’S BATTLEGROUNDS. या गेम चे चाहते प्रत्येक वयोगटात आहेत. पबजी इतका जास्त प्रसिद्ध झाला आहे कि अनेकांसाठी हि हौस राहिली नसून एक व्यसन झाले आहे. असे व्यसन जे आता जीवघेणे ठरू लागले आहे. हैद्राबाद मधून अशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यात समजले आहे कि PUBG चे व्यसन लागलेल्या एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे.

आईने गेम न खेळून दिल्याने दिला जीव
PUBG संबंधित हि हैराण करणारी बातमी हैदराबादची आहे. मीडिया रिपोर्ट मधून समजले आहे कि हैद्राबाद मध्ये एका 16 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. या किशोरवयीन मुलाचे नाव कालाकुरी संभाशिव आहे. रिपोर्टनुसार शिव दहावीचा विध्यार्थी आहे ज्याने गेल्या सोमवारी आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलीस रिपोर्ट नुसार संभाशिवचे वडील भारत राज यांनी सांगितले कि शिवची दहावीची परीक्षा चालू होती पण अभ्यासापेक्षा जास्त वेळ तो मोबाईल वर गेम खेळण्यात घालवत होता.

भारत राज यांनी सांगितले कि, मंगळवारी शिवची ​​परीक्षा होती पण सोमवारी रात्री तो अभ्यास करण्याच्या ऐवजी फोन मध्ये PUBG खेळत होता. आणि याच कारणामुळे शिव ची आई उमादेवी त्याला ओरडली आणि पबजी खेळू दिले नाही. गेम न खेळू दिल्याने शिव नाराज झाला आणि आपल्या रूम मध्ये जाऊन गळफास लावून आपला जीव दिला. पोलीस रिपोर्ट ने या आत्महत्येचे कारण PUBG चे व्यसन आहे. आणि हि काही पहिलीच वेळ नाही जेव्हा PUBG मुळे कोणाला इतकी हानी झाली असेल. भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून पण अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. जसे कि :-

~ अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार मुंबई मध्ये राहणाऱ्या एका 18 वर्षीय युवकाने आपल्या कुटुंबाकडे PUBG खेळण्यासाठी एक हाई एंड स्मार्टफोन मागितला होता पण, घरच्यांनी फोन देण्यास नकार दिला. त्यांनतर युवकाने आत्महत्या केली.

~ मागे गाजियाबाद मधील दहावीचा एक विद्यार्थी या गेमसाठी घर सोडून गेला.

~ काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या वसंतपुर मध्ये PUBG खेळू न दिल्याने एका ममळाने आपल्या आई वडिलांची हत्या केली होती.

~ जम्मू-कश्मीर मध्ये या गेमच्या व्यसनात अडकून एका फिजिकल ट्रेनर ने आपले मानसिक संतुलन गमावले आणि तो भिंतीवर आपले डोके आपटू लागला होता.

~ जलंधर मध्ये तर PUBG खेळण्यासाठी नवीन फोन मिळवण्यासाठी एका 15 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांच्या अकाउंट मधून पचास हजार रुपये काढले.

~ उत्तर प्रदेश मधील एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या युवकाला या गेमचे इतके वेड होते कि आपल्या गर्भवती पत्नी सह कुटुंबाला सोडून तो फरार झाला.

~ महाराष्ट्र मध्ये हिंगोली मधील दोन युवक ट्रेन खाली आले. असे सांगण्यात आले आहे कि ते दोघे PUBG खेळण्यात इतके जास्त व्यस्त होते कि त्यांना ट्रेनची चाहूलच लागली नाही ज्यमुळे त्यांचा मृत्यू झाला.

~ PUBG बद्दल एक असे प्रकरण समोर आले होते ज्यात एका व्यक्तीने पबजी साठी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यावर चाकूने हल्ला केला.

~ मध्य प्रदेश मधील छिंदवाडा मध्ये एक युवक PUBG खेळण्यात इतका व्यस्त होता कि तो पाण्याऐवजी ऍसिड प्यायला.

The post PUBG न खेळून दिल्याने 16 वर्षीय मुलाने लावून घेतला गळफास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16-year-old-10-class-student-hyderabad-boy-commits-suicide-being-scolded-for-playing-pubg/feed/ 0