Xiaomi भारतात लॉन्च करेल स्वस्त गेमिंग स्मार्टफोन, बदलून जाईल गेमिंगचे जग

चीनी स्मार्टफोन कंपनी भारतात गेमिंगचे वाढते वेड बघून आता गेमिंग स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे. यासाठी कंपनी MediaTek Helio G90T प्रोसेसर लॉन्च झाल्यानंतर काही तासांनी घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच भारतात या चिपसेट सह नवीन फोन लॉन्च करेल.

कंपनीने ट्वीट करून हि माहिती दिली आहे कि ती या चिपसेट सह गेमिंग स्मार्टफोन सादर करेल. बोलले जात आहे कि शाओमीचा गेमिंग स्मार्टफोन भारतात ब्लॅक शार्क, आसुस ROG आणि नूबिया रेड मॅजिक सारख्या फोन्सना टक्कर देईल.

मीडियाटेकच्या या नवीन प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर यात ऑक्टा-कोर सीपीयू देण्यात आला आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.05 गीगाहर्ट्ज आहे. तसेच या नवीन चिपसेट मध्ये 10जीबी LPDDR4x रॅम चा सपॉर्ट आहे.

हे देखील वाचा: ट्रिपल डिस्प्ले सह येऊ शकतो सॅमसंगचा अपकमिंग फोन, सर्वात यूनिक असेल डिजाइन

गेमिंग सेंट्रिक चिपसेट असल्यामुळे यात हाइपर इंजन टेक्नॉलजी देण्यात आली आहे. या टेक्नॉलजीच्या मदतीने डिवाइसची परफॉर्मेंस खूप चांगली होईल. तसेच या चिपसेट वर फोन लॉन्च झाल्यानंतरच फोनच्या परफॉर्मेंस बद्दल जास्त माहिती समोर येईल.

तसेच नवीन चिपसेट 48-मेगापिक्सल सोबतच साथ 64-मेगापिक्सल 4 सेल सेंसर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो कि फोन मध्ये 48 किंवा 64-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. पण या चिपसेट सह लॉन्च होणाऱ्या फोन बद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा: Xiaomi घेऊन येत आहे नवीन 5G फोन, 16जीबी रॅम सह होऊ शकतो लॉन्च

विशेष म्हणजे नुकताच Black Shark 2 Pro गेमिंग स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी ब्रँडचा हा नवीन हँडसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस प्रोसेसर, 12 जीबी रॅम आणि इतर अनेक खास फीचर्स सह येतो. यात अपग्रेडेड डीसी डिमिंग 2.0 आणि लिक्विड कूलिंग 3.0 + टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here