Google Tips and Tricks - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 21 Jul 2023 11:36:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/ https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/#respond Fri, 21 Jul 2023 10:30:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20919 जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू इच्छित असाल तर तुमच्याकडे गुगल अकाऊंट (जीमेल ईमेल आयडी) असणं आवश्यक आहे. हे अकाऊंट फक्त अँड्रॉइड फोनमध्ये वापरता येतं असं नाही तर ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये दैनंदिन ईमेल किंवा कम्यूनिकेशनसाठी करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे गुगल अकाऊंट नसेल तर आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप पद्धत सांगणार आहोत. Google अकाऊंट बनवण्याची […]

The post Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू इच्छित असाल तर तुमच्याकडे गुगल अकाऊंट (जीमेल ईमेल आयडी) असणं आवश्यक आहे. हे अकाऊंट फक्त अँड्रॉइड फोनमध्ये वापरता येतं असं नाही तर ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये दैनंदिन ईमेल किंवा कम्यूनिकेशनसाठी करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे गुगल अकाऊंट नसेल तर आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप पद्धत सांगणार आहोत.

Google अकाऊंट बनवण्याची पद्धत

कोणत्याही मोबाइल, लॅपटॉप, कंप्यूटर किंवा तत्सम डिवाइसवर ब्राउजरमधून गुगल अकाऊंट बनवता येईल. ह्यासाठी सर्वप्रथम

स्टेप 1 : ह्या पेजवर क्लिक करा किंवा तुम्ही ब्राउजरवर जीमेल लिहून सर्च करू शकता. सर्च पेजवर जो पहिला ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. ओपन होताच सर्वप्रथम क्रिएट जीमेल अकाऊंटचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 2 : यात सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव लिहावं लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर खाली युजर नेमचा पर्याय दिसेल आणि जिथे एखादा यूनिक युजर नेम टाकावा लागेल. हे नाव तुमच्या घरच्या पत्त्याप्रमाणे आहे त्यामुळे युनिक आणि प्रोफेशनल असणं आवश्यक आहे.

स्टेप 4 : त्यानंतर खाली पासवर्डचा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला यूनिक पासवर्ड बनवावा लागेल. हा यूनिक पासवर्ड तुमचा गुप्त कोड असेल जो तुमच्या गुगल अकाऊंटल सुरक्षित ठेवेल

स्टेप 5 : त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला मोबाइल नंबर, रिकव्हरी ईमेल, जन्म तारीख इत्यादि माहिती विचारली जाईल. जन्म तारीख वगळता इतर माहिती नाही दिली तरी चालेल.

स्टेप 6 : हे पूर्ण करताच तुमचं गुगल अकाऊंट बनून तयार होईल. आता तुम्ही अकाऊंट वापरू शकता. मोबाइल नंबर आणि रिकव्हरी ईमेल आयडी दिल्यास पासवर्ड विसरल्यावर अकाऊंट रिकवर करणे सोपे जाईल

जर तुमचं वय 13 वर्षांपेक्षा कमी असेल तर गुगल अकाऊंटसह तुम्हाला एखादे पॅरेंटल अकाऊंट जोडावे लागेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचे अकाऊंट मॅनेज करू शकता.

मोबाइलमध्ये गुगल अकाऊंट कसं बनवायचं

जर तुमच्याकडे कंप्यूटर नसेल तर तुम्ही मोबाइलवरून देखील तुमचं गुगल अकाऊंट बनवू शकता. मोबाइलमध्ये दोन पद्धतीनं गुगल अकाऊंट बनवता येतं. पहिली पद्धत ब्राउजरच्या माध्यमातून तर दुसरी पद्धत अ‍ॅपचा वापर करून आहे. ब्राउजरमधील अकाऊंट बनवण्याची पद्धत वर देण्यात आली आहे. तर अ‍ॅपमधून अकाऊंट बनवण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता.

स्टेप 1 : सर्वप्रथम गुगल अ‍ॅपवर क्लिक करा.

स्टेप 2 : इथे तुम्हालावर प्रोफाईल इमेज दिसेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : इथे सर्वप्रथम तुम्हाला ईमेल किंवा फोन नंबरनं साइन इन करण्यास सांगितलं जाईल तर थोडं खाली क्रिएट अकाऊंटचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 4 : ह्यावर क्लिक करताच तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या प्रकारचं अकाऊंट तुम्हाला बनवायचं आहे. स्वतःसाठी, मुलांसाठी किंवा व्यवसायासाठी. तुम्ही मायसेल्फवर क्लिक करा.

स्टेप 5 : त्यानंतर दोन काॅलम दिसतील ज्यात तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव टाका.

स्टेप 6 : ही माहिती दिल्या नंतर एक नवीन पेज येईल जिथे तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकावी लागेल.

स्टेप 7 : त्यानंतर पुढे गेल्यावर तुमच्याकडे गुगल अकाऊंटसाठी यूनिक आयडी मागितला जाईल. तुम्ही तुमच्या नावाशी संबंधित आयडी बनवू शकता किंवा आयडी स्वरूपात मोबाइल नंबरचा वापर करू शकता.

स्टेप 8 : जर तुम्ही तुमच्या नावानं आयडी बनवत असाल तर पुढे गेल्यावर तुमच्याकडे पासवर्ड मागितला जाईल आणि जर तुमच्या मोबाइल नंबरचा गुगल आयडीसाठी वापर केला तर आधी त्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल आणि तो टाकल्यानंतर अकाऊंट बनवण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल.

स्टेप 9 : पासवर्ड टाकल्यावर तुमचं काम होईल. गुगल कडून एक दोन दिशा निर्देश दिले जातील, जे ओके करताच तुमचं गुगल अकाऊंट सुरु होईल.

अशाप्रकारे फक्त काही स्टेप फॉलो करून तुम्ही गुगल अकाऊंट बनवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही जीमेल अ‍ॅप, गुगल पे अ‍ॅप आणि युट्युबवर या अकाऊंटचा वापर करता येईल.

The post Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/feed/ 0
इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/english-to-marathi-translator-apps/ https://www.91mobiles.com/marathi/english-to-marathi-translator-apps/#respond Sat, 17 Jun 2023 03:56:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21086 इंटरनेटवर इंफॉरमेशन म्हणजे माहितीचा खजिना आहे. ह्यातील जवळपास सर्वच माहिती भाषेत उपलब्ध आहे. ही माहिती जर तुम्हाला मराठीतून वाचायची असेल तर तुम्हाला ती भाषांतरित करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एखाद्या ट्रान्सलेटरकडे जाण्याची गरज नाही. टेक्नॉलॉजीनं प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधले आहेत. आता तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये कंटेंट तुमच्या भाषेत ट्रान्सलेट करू शकता. सध्या अनेक […]

The post इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्यासाठी अनेक अ‍ॅप्स आणि वेबसाइट आहेत
  • गुगल ट्रान्सलेट इतर भारतीय भाषांमध्ये देखील अनुवाद करू शकतो
  • मायक्रोसॉफ्टच्या ट्रान्सलेटरमध्ये देखील भारतीय भाषांचा सपोर्ट मिळतो

इंटरनेटवर इंफॉरमेशन म्हणजे माहितीचा खजिना आहे. ह्यातील जवळपास सर्वच माहिती भाषेत उपलब्ध आहे. ही माहिती जर तुम्हाला मराठीतून वाचायची असेल तर तुम्हाला ती भाषांतरित करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एखाद्या ट्रान्सलेटरकडे जाण्याची गरज नाही. टेक्नॉलॉजीनं प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधले आहेत. आता तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये कंटेंट तुमच्या भाषेत ट्रान्सलेट करू शकता.

सध्या अनेक सारे अ‍ॅप्स आणि वेबसाइट आहेत ज्या इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषेत कंटेंट ट्रान्सलेट करतात. कंप्यूटर प्रोग्रामच्या माध्यमातून होणारं ट्रान्सलेशन इतकं अचूक नसतं परंतु तुम्हाला कंटेंट समजण्यालायक ट्रान्सलेशन मिळू शकतं. आज आम्ही तुम्हाला काही अशा अ‍ॅप्स आणि वेबसाइटची माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषेत कंटेंट ट्रान्सलेट करू शकता.

इंग्रजीतून मराठी अनुवाद ट्रान्सलेट करणार अ‍ॅप्स

  • Google Translate
  • Microsoft Translator
  • Hi Translate
  • Marathi-English Translator
  • Translate All
  • English to Marathi Translator
  • English Marathi Dictionary

गुगल ट्रान्सलेट

आमच्या यादीत ट्रान्सलेशनसाठी सर्वात पहिला ऑप्शन गुगल ट्रान्सलेटचा आहे. हा ऑनलाइन ट्रांसलेशनसाठी सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्या मदतीनं तुम्ही 130 भाषांमध्ये अनुवाद करू शकता. मराठीसह इतर भारतीय भाषा जसे की तामिळ, तेलुगू, हिंदी, बंगाली सारख्या भाषेत देखील ट्रान्सलेट करू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. तसेच वेबसाइट स्वरूपात देखील गुगल ट्रान्सलेट उपलब्ध आहे.

मराठी-इंग्लिश ट्रान्सलेटर

इंग्रजीतून मराठीत अनुवाद करायचा असो किंवा मराठीतून इंग्रजीत Marathi-English Translator अ‍ॅप देखील एक चांगला ऑप्शन आहे. मराठी आणि इंग्रजीसह ह्याच्या मदतीनं इतर भाषांमध्ये देखील ट्रान्सलेट करता येतं.

ट्रान्सलेट ऑल अ‍ॅप

Translate All अ‍ॅपच्या मदतीनं देखील युजर्स अनेक भाषा मराठी किंवा इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट करू शकतात. ह्या अ‍ॅपची गंमत म्हणजे ह्याच्या मदतीनं फोटोमधील टेक्स्ट देखील ट्रान्सलेट करता येतो. हे अ‍ॅप मराठी सह दुसऱ्या भारतीय भाषांना देखील सपोर्ट करतं.

मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर

Microsoft Translator देखील इतर भाषांमधून मराठी ट्रान्सलेशनसाठी चांगला ऑप्शन आहे. मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेट अ‍ॅप अँड्रॉइड युजर्स प्ले स्टोर आणि iOS युजर्स अ‍ॅप्स स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅपमधून इतर भाषा देखील ट्रान्सलेट करता येतात.

इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर अ‍ॅप

English to Marathi Translator अ‍ॅपच्या मदतीनं इंग्रजीतून मराठी आणि मराठीतून इंग्रजीत सहज अनुवाद करता येतो. हे अ‍ॅप ऑफलाइन देखील वापरता येतं. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येईल.

इंग्लिश मराठी डिक्शनरी

इंग्रजीतून मराठीच्या शब्दांचा अर्थ असो किंवा अनुवाद English Marathi Dictionary अ‍ॅप एक चांगला ऑप्शन आहे. हे अ‍ॅप देखील ऑफलाइन वापरता येतं. ह्या अ‍ॅपच्या मदतीनं युजर्स इंग्रजी भाषा शिकू देखील शकतात. ह्यासाठी गेम आणि टास्क देण्यात आले आहेत.

हाय ट्रान्सलेट

इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी Hi Translate अ‍ॅप देखील चांगला ऑप्शन आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर वापरता येतं. ह्या अ‍ॅपच्या मदतीनं युजर्स 100 पेक्षा जास्त भाषा ट्रान्सलेट करू शकतात.

The post इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/english-to-marathi-translator-apps/feed/ 0