Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत

जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू इच्छित असाल तर तुमच्याकडे गुगल अकाऊंट (जीमेल ईमेल आयडी) असणं आवश्यक आहे. हे अकाऊंट फक्त अँड्रॉइड फोनमध्ये वापरता येतं असं नाही तर ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये दैनंदिन ईमेल किंवा कम्यूनिकेशनसाठी करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे गुगल अकाऊंट नसेल तर आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप पद्धत सांगणार आहोत.

Google अकाऊंट बनवण्याची पद्धत

कोणत्याही मोबाइल, लॅपटॉप, कंप्यूटर किंवा तत्सम डिवाइसवर ब्राउजरमधून गुगल अकाऊंट बनवता येईल. ह्यासाठी सर्वप्रथम

स्टेप 1 : ह्या पेजवर क्लिक करा किंवा तुम्ही ब्राउजरवर जीमेल लिहून सर्च करू शकता. सर्च पेजवर जो पहिला ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. ओपन होताच सर्वप्रथम क्रिएट जीमेल अकाऊंटचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 2 : यात सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव लिहावं लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर खाली युजर नेमचा पर्याय दिसेल आणि जिथे एखादा यूनिक युजर नेम टाकावा लागेल. हे नाव तुमच्या घरच्या पत्त्याप्रमाणे आहे त्यामुळे युनिक आणि प्रोफेशनल असणं आवश्यक आहे.

स्टेप 4 : त्यानंतर खाली पासवर्डचा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला यूनिक पासवर्ड बनवावा लागेल. हा यूनिक पासवर्ड तुमचा गुप्त कोड असेल जो तुमच्या गुगल अकाऊंटल सुरक्षित ठेवेल

स्टेप 5 : त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला मोबाइल नंबर, रिकव्हरी ईमेल, जन्म तारीख इत्यादि माहिती विचारली जाईल. जन्म तारीख वगळता इतर माहिती नाही दिली तरी चालेल.

स्टेप 6 : हे पूर्ण करताच तुमचं गुगल अकाऊंट बनून तयार होईल. आता तुम्ही अकाऊंट वापरू शकता. मोबाइल नंबर आणि रिकव्हरी ईमेल आयडी दिल्यास पासवर्ड विसरल्यावर अकाऊंट रिकवर करणे सोपे जाईल

जर तुमचं वय 13 वर्षांपेक्षा कमी असेल तर गुगल अकाऊंटसह तुम्हाला एखादे पॅरेंटल अकाऊंट जोडावे लागेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचे अकाऊंट मॅनेज करू शकता.

मोबाइलमध्ये गुगल अकाऊंट कसं बनवायचं

जर तुमच्याकडे कंप्यूटर नसेल तर तुम्ही मोबाइलवरून देखील तुमचं गुगल अकाऊंट बनवू शकता. मोबाइलमध्ये दोन पद्धतीनं गुगल अकाऊंट बनवता येतं. पहिली पद्धत ब्राउजरच्या माध्यमातून तर दुसरी पद्धत अ‍ॅपचा वापर करून आहे. ब्राउजरमधील अकाऊंट बनवण्याची पद्धत वर देण्यात आली आहे. तर अ‍ॅपमधून अकाऊंट बनवण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता.

स्टेप 1 : सर्वप्रथम गुगल अ‍ॅपवर क्लिक करा.

स्टेप 2 : इथे तुम्हालावर प्रोफाईल इमेज दिसेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : इथे सर्वप्रथम तुम्हाला ईमेल किंवा फोन नंबरनं साइन इन करण्यास सांगितलं जाईल तर थोडं खाली क्रिएट अकाऊंटचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 4 : ह्यावर क्लिक करताच तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या प्रकारचं अकाऊंट तुम्हाला बनवायचं आहे. स्वतःसाठी, मुलांसाठी किंवा व्यवसायासाठी. तुम्ही मायसेल्फवर क्लिक करा.

स्टेप 5 : त्यानंतर दोन काॅलम दिसतील ज्यात तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव टाका.

स्टेप 6 : ही माहिती दिल्या नंतर एक नवीन पेज येईल जिथे तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकावी लागेल.

स्टेप 7 : त्यानंतर पुढे गेल्यावर तुमच्याकडे गुगल अकाऊंटसाठी यूनिक आयडी मागितला जाईल. तुम्ही तुमच्या नावाशी संबंधित आयडी बनवू शकता किंवा आयडी स्वरूपात मोबाइल नंबरचा वापर करू शकता.

स्टेप 8 : जर तुम्ही तुमच्या नावानं आयडी बनवत असाल तर पुढे गेल्यावर तुमच्याकडे पासवर्ड मागितला जाईल आणि जर तुमच्या मोबाइल नंबरचा गुगल आयडीसाठी वापर केला तर आधी त्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल आणि तो टाकल्यानंतर अकाऊंट बनवण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल.

स्टेप 9 : पासवर्ड टाकल्यावर तुमचं काम होईल. गुगल कडून एक दोन दिशा निर्देश दिले जातील, जे ओके करताच तुमचं गुगल अकाऊंट सुरु होईल.

अशाप्रकारे फक्त काही स्टेप फॉलो करून तुम्ही गुगल अकाऊंट बनवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही जीमेल अ‍ॅप, गुगल पे अ‍ॅप आणि युट्युबवर या अकाऊंटचा वापर करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here