GPay - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 May 2023 12:21:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/#respond Wed, 03 May 2023 12:21:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20674 भारतात डिजिटल पेमेंटसाठी लोक PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी सारखे पेमेंट अ‍ॅप्स मोठ्याप्रमाणावर वापरता येतात. बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनमध्ये कोणतं ना कोणतं UPI App असतंच. परंतु जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक करणे आवश्यक आहे, नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊया पेटीएम, गुगल पे किंवा फोन […]

The post फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात डिजिटल पेमेंटसाठी लोक PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी सारखे पेमेंट अ‍ॅप्स मोठ्याप्रमाणावर वापरता येतात. बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनमध्ये कोणतं ना कोणतं UPI App असतंच. परंतु जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक करणे आवश्यक आहे, नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊया पेटीएम, गुगल पे किंवा फोन पे अकाऊंट ब्लॉक करण्याची पद्धत.

पेटीएम अकाऊंट

फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास तुमचं Paytm account तात्पुरतं ब्लॉक करता येतं. त्यासाठी पद्धत खूप सोपी आहे.

  • पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा. लॉस्ट फोनचा पर्याय निवडा त्यानंतर एक वेगळा नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर नोंदवा.
  • हे देखील वाचा: PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार

  • त्यानंतर सर्व डिवाइसेसवरून लॉग-आउट करण्याचा पर्याय निवडू शकता. त्यानंतर पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24×7 हेल्प लाइनची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा. इथे ‘रिपोर्ट अ फ्रॉड’ चा ऑप्शन निवडा आणि कोणत्याही श्रेणीवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘एनी इश्यू’ वर क्लिक करा आणि सर्वात खाली ‘मेसेज अस’ बटनवर क्लिक करा. आता तुम्हाला अकाऊंट ऑनरशिपचा पुरावा द्यावा लागेल ज्यात डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती, पेटीएम अकाऊंटवरील व्यवहार, पेटीएम अकाऊंटवरील व्यवहारचा एक कंफर्मेशन ईमेल किंवा एसएमएस, फोन नंबरच्या मालकीचा पुरावा किंवा हरवलेल्या फोनची पोलीस कंप्लेंट प्रूफ म्हणून वापरता येईल. ही माहिती दिल्यानंतर पेटीएम तुमचं अकाऊंट ब्लॉक करेल. त्यानंतर तुम्हाला कंफर्मेशन मेसेज मिळेल.
  • गुगल पे अकाऊंट

    जर तुमच्या फोनवर पेमेंटसाठी गुगल पे अकाऊंटचा वापर करत असाल तर फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास ब्लॉक करता येईल.

  • Google Pay Account ब्लॉक करण्यासाठी युजर्स हेल्पलाइन नंबर 18004190157 वर कॉल करू शकता आणि आवडीची भाषा निवडू शकता.
  • इथे ‘अदर इश्यू’ चा पर्याय निवडा. त्यानंतर एक्सपर्टकडे बोलण्याचा पर्याय निवडा जो तुमचं गुगल प्ले अकाऊंट ब्लॉक करण्यास मदत करेल. तसेच अँड्रॉइड युजर आपला डेटा रिमोटली देखील डिलीट करू शकतात.
  • फोनपे अकाऊंट

    तुमचं फोन पे अकाऊंट देखील तुम्ही सहज ब्लॉक करू शकता. यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

  • फोन पे युजर्सना 08068727374 किंवा 02268727374 वर कॉल करावा लागेल. आवडीची भाषा निवडल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्या Phonepe Account मधील एखादी समस्या रिपोर्ट करायची आहे का? त्यानुसार नंबर दाबा.
  • त्यानंतर तुम्हाला रजिस्टर नंबर टाका आणि कन्फर्मेशनसाठी एक OTP पाठवला जाईल. त्यानंतर ओटीपी प्राप्त न झाल्याचा पर्याय निवडा. तुम्हाला सिम किंवा डिवाइस हरवल्याची पर्याय दिला जाईल, त्यातून निवड करा.
  • हे देखील वाचा: Facebook Video अँड्रॉइड आणि आयफोनवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत

  • त्यानंतर एक प्रतिनिधीकडे कॉल ट्रान्सफर केला जाईल, जे काही फोन नंबर, ईमेल आयडी, शेवटचं पेमेंट, इत्यादी माहिती विचारतील. त्यानंतर फोन पे अकाऊंट ब्लॉक करण्यास तुमची मदत केली जाईल. अशाप्रकारे हरवलेल्या फोनमधील पेमेंट्स अ‍ॅप्स ब्लॉक करता येतील.
  • The post फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/feed/ 0
    मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-language-of-gpay-amazon-pay-paytm-phonepe-to-marathi-here-full-process/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-language-of-gpay-amazon-pay-paytm-phonepe-to-marathi-here-full-process/#respond Wed, 04 Jan 2023 12:30:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15013 स्मार्टफोनची वाढती संख्या,स्वस्त इंटरनेट आणि यूपीआय टेक्नॉलॉजीमुळे GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm सारख्या मोबाइल अ‍ॅप्सचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ऐवजी आता युजर्स आता युपीआय द्वारे फक्त पैशांची देवाण घेवाण करत नाहीत तर ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंग, बिल पेमेंट्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी देखील यांचा वापर करतात. हे अ‍ॅप्स इंग्रजीमध्ये असल्यामुळे अनेकांना […]

    The post मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    स्मार्टफोनची वाढती संख्या,स्वस्त इंटरनेट आणि यूपीआय टेक्नॉलॉजीमुळे GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm सारख्या मोबाइल अ‍ॅप्सचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ऐवजी आता युजर्स आता युपीआय द्वारे फक्त पैशांची देवाण घेवाण करत नाहीत तर ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंग, बिल पेमेंट्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी देखील यांचा वापर करतात. हे अ‍ॅप्स इंग्रजीमध्ये असल्यामुळे अनेकांना वापरता येत नाहीत. परंतु ही भाषा मराठी करण्याची सोय प्रत्येक अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. तुम्ही मायबोली मराठीत देखील ऑनलाइन पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

    जर तुम्हाला मराठीत GPay, PhonePe, Amazon Pay किंवा Paytm वापरायचं असेल तर पुढे आम्ही भाषा बदलण्याची संपूर्ण पद्धत सांगितली आहे. चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप प्रोसेस:

    GPay मराठीतून वापरण्यासाठी

    • भाषा बदलण्यासाठी GPay अ‍ॅप ओपन करा
    • उजव्या बाजूला वर असेलेल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा
    • तिथे तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा
    • त्यानंतर ‘Personal info’ च्या ऑप्शनची निवड करा
    • इथे तुम्हाला ‘Language’ चा पर्याय मिळेल
    • उपलब्ध भाषांमधून तुम्ही मराठीचा पर्याय निवडू शकता
    • आता तुमचं गुगल पे मराठीत उपलब्ध होईल

    PhonePe अ‍ॅप मराठीतून वापरण्यासाठी

    • इंग्रजी भाषा बदलण्यासाठी फोनपे ओपन करा
    • डावीकडे असलेल्या प्रोफाईल ऑप्शनवर टॅप करा
    • खाली स्क्रॉल करा
    • आता तुम्हाला ‘Settings and Preferences’ टॅब मिळेल
    • टॅबमध्ये पहिलाच पर्याय ‘Languages’ चा असेल त्यावर क्लिक करा
    • इथे मराठी भाषेचा पर्याय पहिल्या क्रमांकावर देण्यात आला आहे तो निवडून ‘सुरु ठेवा’ बटनवर क्लिक करा
    • आता फोनपे अ‍ॅपमध्ये मराठी भाषा दिसू लागेल

    Amazon Pay मध्ये मराठी भाषा वापरण्यासाठी

    • Amazon अ‍ॅप ओपन करा
    • उजव्या बाजूला खाली असलेल्या तीन लाइन्सवर क्लिक करा
    • खाली स्क्रोल करा
    • इथे तुम्हाला ‘Settings’ चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
    • त्यानंतर ‘Country & Language’ वर क्लिक करा
    • थोडं स्क्रोल केल्यानंतर ‘India (मराठी)’ दिसेल त्यावर क्लिक करा
    • आता फक्त Amazon Pay नव्हे तर संपूर्ण Amazon अ‍ॅप मराठीत वापरता येईल

    Paytm युजर्स अशाप्रकारे बदलू शकतात भाषा

    • Paytm मोबाइल अ‍ॅप ओपन करा
    • प्रोफाईलवर जा
    • खाली स्क्रोल करून प्रोफाईल सेटिंग टॅबवर क्लिक करा
    • इथे तुम्हाला भाषा बदलण्याचा ऑप्शन मिळेल, त्यावर टॅप करा
    • आता इथे मराठीची निवड करा आणि ‘Continue’ बटनवर क्लिक करा
    • अशाप्रकारे पेटीएमची भाषा मराठी होईल

    लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

    The post मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-language-of-gpay-amazon-pay-paytm-phonepe-to-marathi-here-full-process/feed/ 0