मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

स्मार्टफोनची वाढती संख्या,स्वस्त इंटरनेट आणि यूपीआय टेक्नॉलॉजीमुळे GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm सारख्या मोबाइल अ‍ॅप्सचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ऐवजी आता युजर्स आता युपीआय द्वारे फक्त पैशांची देवाण घेवाण करत नाहीत तर ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंग, बिल पेमेंट्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी देखील यांचा वापर करतात. हे अ‍ॅप्स इंग्रजीमध्ये असल्यामुळे अनेकांना वापरता येत नाहीत. परंतु ही भाषा मराठी करण्याची सोय प्रत्येक अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. तुम्ही मायबोली मराठीत देखील ऑनलाइन पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

जर तुम्हाला मराठीत GPay, PhonePe, Amazon Pay किंवा Paytm वापरायचं असेल तर पुढे आम्ही भाषा बदलण्याची संपूर्ण पद्धत सांगितली आहे. चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप प्रोसेस:

GPay मराठीतून वापरण्यासाठी

  • भाषा बदलण्यासाठी GPay अ‍ॅप ओपन करा
  • उजव्या बाजूला वर असेलेल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा
  • तिथे तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा
  • त्यानंतर ‘Personal info’ च्या ऑप्शनची निवड करा
  • इथे तुम्हाला ‘Language’ चा पर्याय मिळेल
  • उपलब्ध भाषांमधून तुम्ही मराठीचा पर्याय निवडू शकता
  • आता तुमचं गुगल पे मराठीत उपलब्ध होईल

PhonePe अ‍ॅप मराठीतून वापरण्यासाठी

  • इंग्रजी भाषा बदलण्यासाठी फोनपे ओपन करा
  • डावीकडे असलेल्या प्रोफाईल ऑप्शनवर टॅप करा
  • खाली स्क्रॉल करा
  • आता तुम्हाला ‘Settings and Preferences’ टॅब मिळेल
  • टॅबमध्ये पहिलाच पर्याय ‘Languages’ चा असेल त्यावर क्लिक करा
  • इथे मराठी भाषेचा पर्याय पहिल्या क्रमांकावर देण्यात आला आहे तो निवडून ‘सुरु ठेवा’ बटनवर क्लिक करा
  • आता फोनपे अ‍ॅपमध्ये मराठी भाषा दिसू लागेल

Amazon Pay मध्ये मराठी भाषा वापरण्यासाठी

  • Amazon अ‍ॅप ओपन करा
  • उजव्या बाजूला खाली असलेल्या तीन लाइन्सवर क्लिक करा
  • खाली स्क्रोल करा
  • इथे तुम्हाला ‘Settings’ चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
  • त्यानंतर ‘Country & Language’ वर क्लिक करा
  • थोडं स्क्रोल केल्यानंतर ‘India (मराठी)’ दिसेल त्यावर क्लिक करा
  • आता फक्त Amazon Pay नव्हे तर संपूर्ण Amazon अ‍ॅप मराठीत वापरता येईल

Paytm युजर्स अशाप्रकारे बदलू शकतात भाषा

  • Paytm मोबाइल अ‍ॅप ओपन करा
  • प्रोफाईलवर जा
  • खाली स्क्रोल करून प्रोफाईल सेटिंग टॅबवर क्लिक करा
  • इथे तुम्हाला भाषा बदलण्याचा ऑप्शन मिळेल, त्यावर टॅप करा
  • आता इथे मराठीची निवड करा आणि ‘Continue’ बटनवर क्लिक करा
  • अशाप्रकारे पेटीएमची भाषा मराठी होईल

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here