Hop Oxo Electric Motorcycle - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 06 Sep 2022 07:25:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रिक बाइक; 150Km च्या तुफान रेंजसह HOP OXO इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/hop-oxo-electric-motorcycle-launched-with-150-km-range/ https://www.91mobiles.com/marathi/hop-oxo-electric-motorcycle-launched-with-150-km-range/#respond Tue, 06 Sep 2022 07:25:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12835 इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइकची लोकप्रियता भारतात वेगानं वाढत आहे. त्यामुळे दिग्गज कंपन्या देखील या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत, तसेच नव्या कंपन्या देखील टेक्नॉलॉजीच्या जीवावर चांगली टक्कर देत आहेत. आता जयपुर मधील HOP Electric Mobility ने इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. कंपनीनं भारतात नवीन HOP OXO इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे, जिची किंमत 1.25 लाख […]

The post स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रिक बाइक; 150Km च्या तुफान रेंजसह HOP OXO इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइकची लोकप्रियता भारतात वेगानं वाढत आहे. त्यामुळे दिग्गज कंपन्या देखील या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत, तसेच नव्या कंपन्या देखील टेक्नॉलॉजीच्या जीवावर चांगली टक्कर देत आहेत. आता जयपुर मधील HOP Electric Mobility ने इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. कंपनीनं भारतात नवीन HOP OXO इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे, जिची किंमत 1.25 लाख (एक्स शोरूम) आहे. HOP OXO Electric Motorcycle दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे, ज्यांची नावे HOP OXO आणि HOP OXO X अशी आहेत. ही इलेक्ट्रिक बाइक Revolt RV400, Oben Rorr सारख्या बाइक्सना टक्कर देऊ शकते.

विशेष म्हणजे HOP OXO इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये म्यूजिक स्ट्रीमिंग स्पिकर, क्रूज कंट्रोल, स्लीक इंटरफेस इत्यादी फिचर मिळत नाहीत. यात एलईडी टर्न इंडिकेटर्स, आवश्यक माहितीसह 5 इंचाचा डिजिटल डिस्प्ले, ओएक्सओ मोबाइल अ‍ॅप कनेक्टिव्हिटी, आरामदायक आणि एर्गोनोमिक सीट्स मिळतात. हे देखील वाचा: Honda Activa येणार Electric अवतारात; बजेटमध्ये मिळणार मोठी ड्राइव्हिंग रेंज

HOP OXO Electric Motorcycle

हॉप ओएक्सओ इलेक्ट्रिक मोटरसायकल (HOP OXO Electric Motorcycle) मध्ये रियर व्हील माउंटेड हब मोटर मिळते, जी 6.2 kW पीक पावर आणि 200 Nm चा व्हील टॉर्क निर्माण करते. यात ईको, पावर आणि स्पोर्ट्स सारखे राइडिंग मोड देखील मिळतात. OXO X मध्ये ताशी 90 किमीचा टॉप स्पीड असलेला टर्बो मोड मिळतो. HOP OXO X 4 सेकंदांत 0 ते ताशी 40 किमीचा वेग गाठू शकते. यात 72V चा eFlow पावरट्रेन आहे आणि हिच्या बॅटरीमध्ये 3.7 kWh चे NMC सेल आहेत.

HOP OXO च्या डिजाइन बद्दल बोलायचे तर या बाइकसाठी Yamaha FZ व्हर्जन 2.0 काढून प्रेरणा घेतल्याचं दिसतं. ही बाइक मस्कुलर आहे आणि स्ट्रीट फाइटर लुकसह बाजारात आली आहे. ऑक्सोमध्ये दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक मिळतात. तर सस्पेंशनसाठी फ्रंटला टेलिस्कोपिक यूनिट आणि मागे ट्विन शॉक अब्जॉर्बर मिळतात. हे देखील वाचा: ही कंपनी देत आहेत मोफत Electric Scooter, अशी आहे ही भन्नाट ऑफर

HOP OXO इलेक्ट्रिक मोटरसायकल बद्दल कंपनीनं दावा केला आहे की सिंगल चार्जवर ही बाइक 150 km ची रियल वर्ल्ड रेंज देते. ही 16A चार्जरसह येते म्हणजे 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 4 तास लागतात. यात तुम्हाला 4G कनेक्टिव्हिटीसह OXO अ‍ॅप स्पीड कंट्रोलसह अनेक सुविधांचा वापर करता येतो. ज्यात जियो-फेंसिंग, अँटी-थेफ्ट सिस्टम, राइडस्टॅटेस्टिक्सचा समावेश असेल. HOP नं दरवर्षी OXO चे जवळपास 50,000 यूनिट विकण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. OXO इलेक्ट्रिक मोटरसायकल की टक्कर Revolt RV400, Tork Kratos R आणि Oben Rorr सारख्या इलेक्ट्रिक बाइकशी होईल, तसेच या बजेटमध्ये TVS, Ola, Ather, Bajaj सह अनेक ब्रांड्सच्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील आल्या आहेत.

The post स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रिक बाइक; 150Km च्या तुफान रेंजसह HOP OXO इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hop-oxo-electric-motorcycle-launched-with-150-km-range/feed/ 0