ही कंपनी देत आहेत मोफत Electric Scooter, अशी आहे ही भन्नाट ऑफर

Electric Scooter Free Offer: भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी आणि यंदाच्या सणासुदीचा हंगाम पाहून Hero Electric नं एका शानदार ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरचा लाभ घेऊन ग्राहक स्वतःसाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर अगदी मोफत जिंकू शकतात. या ऑफरला देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी हीरो इलेक्ट्रिक (Hero Electric) नं ओणम ऑफर असं नाव दिलं आहे. या ऑफरमध्ये एका भाग्यवान ग्राहकाला त्याच्या आवडीचं इलेक्ट्रिक दुचाकी वाहन मोफत (Free Hero Electric Scooter) घरी घेऊन जात येईल. चला जाणून घेऊया या ऑफरबाबत सर्वकाही.

अशाप्रकारे मोफत मिळेल इलेक्ट्रिक स्कूटर

Onam च्या निमित्ताने ही ऑफर कंपनीनं सध्या फक्त केरळच्या ग्राहकांसाठी सादर केली आहे. या ऑफरचा फायदा कंपनीचे इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करणाऱ्या प्रत्येक 100 व्या ग्राहकाला मिळेल. म्हणजे 99 स्कूटरची विक्री झाल्यावर 100 व्या ग्राहकाला हीरोची इलेक्ट्रिक स्कूटर मोफत दिली जाईल. ही ऑफर 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत वैध असेल. हे देखील वाचा: जुन्या आठवणी होणार ताज्या! रस्त्यावर पुन्हा धावणार LML Scooter; 29 सप्टेंबरला 3 Electric Two-Wheeler घेणार एंट्री

Hero Electric Offer Free Electric Scooter In Kerala Onam Festival

5 वर्षांची वॉरंटी

कंपनीनं खुलासा केला आहे की ही ऑफर फक्त ओणमच्या संपूर्ण कालावधी दरम्यान लागू असेल. ग्राहकांना ई-स्कूटरवर पाच वर्षांची वॉरंटी मिळेल ज्यात दोन वर्षांची एक्सटेंड वॉरंटीचा समावेश आहे. हीरो इलेक्ट्रिकनं अलीकडेच केरळच्या मलप्पुरममध्ये आपल्या सर्वात मोठ्या आणि 1000व्या डीलरशिपचं उद्घाटन केलं आहे.

EMI वर देखील विकत घेता येईल इलेक्ट्रिक स्कूटर

इलेक्ट्रिक टू-व्हीलर विकत घेण्यासाठी फायनान्सिंग सोपं करण्यासाठी कंपनीनं AU स्मॉल बँकसह पार्टनरशिप देखील केली आहे. या या भागेदारीच्या मदतीनं ग्राहक ई-स्कूटर सुलभ EMI वर विकत घेऊ शकतील.

या ऑफरची माहिती देताना हीरो इलेक्ट्रिकचे CEO सोहिंदर गिल म्हणाले की, “ आम्ही देशात ईव्हीच्या प्रसासरचा वेग वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत. ही वेळ ईव्हीबद्दल लोकांचे विचार बदलण्यासाठी अतिशय योग्य आहे. ओणम केरळमध्ये दीर्घकालीन समारंभाचे प्रतीक आहे, यातून ग्राहकांच्या सकारात्मक भावना दिसते. या ओणमच्या निमित्ताने ग्राहकांना शानदार ऑफर देऊन संपूर्ण केरळमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचा प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहोत.” हे देखील वाचा: जुन्या आठवणी होणार ताज्या! रस्त्यावर पुन्हा धावणार LML Scooter; 29 सप्टेंबरला 3 Electric Two-Wheeler घेणार एंट्री

दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या सेलच्या बाबतीत हिरो इलेक्ट्रिकनं Ola, Ather, Revolt, Bajaj, TVS, Ampere by Greaves आणि Okinawa सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकेल आहे. जुलै 2022 मध्ये 8,953 युनिट्स विकून हिरो इलेक्ट्रिकनं गेल्यावर्षीच्या तुलनेत 112.01% वाढ नोंदवली आहे. 2021 च्या जुलै महिन्यात कंपनीनं 4,730 युनिट्स विकले होते. सध्या दुचाकी इलेक्ट्रिक व्हेइकल्स सेगमेंटमध्ये त्यांचा मार्केट शेयर 22.52 टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here