Huawei Enjoy 20 SE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा बजेट फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-launch-with-8gb-ram-5000mah-battery-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-launch-with-8gb-ram-5000mah-battery-know-price/#respond Thu, 24 Dec 2020 12:30:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9434 Huawei ने बुधवारी आपला नवीन दमदार फोन Huawei Enjoy 20 SE बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च केला आहे. फोन मध्ये कंपनीने आपला octa-core Kirin 710A प्रोसेसर दिला आहे.

The post 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा बजेट फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने बुधवारी आपला नवीन दमदार फोन Huawei Enjoy 20 SE बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च केला आहे. हुआवईने हा फोन Magic Night Black, Qijing Forest आणि Dawn Gold सारख्या कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला आहे. हुवावेने बजेट स्मार्टफोन सेगमेंटच्या हुवावे एन्जॉय 20 एसई सोबतच 5जी सेगमेंट मध्ये Huawei Nova 8 आणि Huawei Nova 8 Pro सारखे स्मार्टफोन पण लॉन्च केले आहेत. चला जाणून घेऊया Huawei Enjoy 20 SE बाबत सर्वकाही.

दमदार आहे कॅमेरा

Huawei Enjoy 20 SE चा कॅमेरा पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात f/1.8 अपर्चर सह प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे. त्यांनतर f/2.4 अपर्चर सह 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. रियर कॅमेरा फीचर्स पाहता हा 6X झूम आणि ऑटोफोकस फीचर सह येतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एन्जॉय 20 एसई मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Huawei Enjoy 20 SE

Huawei Enjoy 20 SE चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.67 इंचाचा FHD+ LCD होल पंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. सोबतच या फोन मध्ये कंपनीने आपला octa-core Kirin 710A प्रोसेसर दिला आहे. तसेच, हँडसेट मध्ये 4GB रॅम आणि 8GB रॅम सह 128GB स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

Huawei च्या या फोनची एक सर्वात मोठी खासियत यात देण्यात आलेली 5,000mAh ची बॅटरी आहे जी 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट सह येते. कनेक्टिविटीसाठी वाय-फाय 802.11 b / g / n, ब्लूटूथ v5.1, USB टाइप- C पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि GPS चा समावेश करण्यात आला आहे. एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि इतर सेंसर्स मध्ये एक्सीलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, डिजिटल कंपास, ग्रेविटी सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर पण फोन मध्ये देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च

Huawei Enjoy 20

हुआवई एन्जॉय 20 पाहता हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च झाला होता. हा फोन वॉटरड्रॉप नॉच सह बाजारात आला होता. एन्जॉय 20 स्मार्टफोन पण प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसर सह 5जी कनेक्टिविटी असलेल्या मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी Huawei Enjoy 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिकसलचा प्राइमरी सेंसरला आहे. तसेच फोन मध्ये 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. हुआवईचा हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा बजेट फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-launch-with-8gb-ram-5000mah-battery-know-price/feed/ 0