32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Huawei गुरुवारी एका इवेंटचे आयोजन करून Mate 40 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनी Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ सादर केले आहेत. दुसरीकडे कंपनीने चुपचाप Huawei Mate 30E Pro 5G स्मार्टफोन Mate 30 Pro चा अपग्रेड वर्जन म्हणून लॉन्च केला आहे. हुआवे मेट 30ई प्रो 5जी च्या ग्लोबल लॉन्च बद्दल सध्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

डिजाइन

तुम्ही फोटोज मध्ये बघू शकता कि Huawei Mate 30E Pro ची रियर डिजाइन Mate 30 Pro प्रमाणे ग्लास आणि मेटलची बनली आहे. तसेच फोन मध्ये सर्कुलर क्वाड-कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. एलईडी फ्लॅश यूनिट कॅमेरा मॉड्यूलच्या बाहेर देण्यात आला आहे. तसेच फोन दोन्ही बाजूंनी कर्व डिजाइन वर सादर केला जाईल. एकंदरीत फोनची डिजाइन अगदी Mate 30 Pro प्रमाणेच आहे.

हे देखील वाचा : 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 40 मेगापिक्सलचा आहे. तसेच f/1.6 अपर्चर सह वाइड-अँगल लेंस 40 मेगापिक्सलची आहे. यात f/2.4 अपर्चर आणि ओआईएस सपोर्ट सह 8 मेगापिक्सलचा तीसरा कॅमेरा आहे. डेप्थ सेंसिंगसाठी यात टाइम-ऑफ-फाइट (ToF) सेंसर पण देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हुआवे मेट 30ई प्रो फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासह f/2.0 लेंस आणि 3D डेप्थ सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

हुआवे मेट 30ई प्रो मध्ये 6.53 इंचाचा फुल-एचडी+ (1,176×2,400 पिक्सल) ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन HiSilicon Kirin 990E प्रोसेसर सह येतो, 14 कोर माली-जी76 जीपीयू आहे. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज आहे.

कनेक्टिविटीसाठी या फोन मध्ये 5जी, 4जी एलटीई, Wi-Fi 802.11ac, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड (IR), एनएफसी, आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोन अँड्रॉइड 10 आधारित EMUI 11 वर चालतो. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500 एमएएच ची बॅटरी आहे, सोबत 40 वॉट सुपरचार्ज फास्ट चार्जिंग आई 27वॉट फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

हे देखील वाचा : लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत

किंमत

हुआवे मेट 30ई प्रो फोन ची प्री-बुकिंग चीन मध्ये सुरु करण्यात आली आहे. याची किंमत मात्र अजून समजली नाही. कंपनीने Huawei Mate 30E Pro स्मार्टफोन चार कलर ऑप्शन- Space Silver, Emerald Green, Cosmic Purple आणि Black मध्ये सादर केला गेला आहे. फोन लेदर फिनिश सह तसेच दोन अन्य शेड्स पण आहेता, ज्यांची नावे आहे वेगन लेदर फॉरेस्ट ग्रीन आणि वेगन लेदर ऑरेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here