Huawei P20 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 09 Jul 2024 07:18:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अमेजॉन एक्सक्सूसिव असतील हुआवई पी20 प्रो आणि पी20 लाइट, 24 एप्रिलला होतील भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-p20-pro-huawei-p20-lite-launched-in-india-amazon-exclusive-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-p20-pro-huawei-p20-lite-launched-in-india-amazon-exclusive-in-marathi/#respond Mon, 23 Apr 2018 07:48:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=31 फ्लॅगशिप स्मार्टफोंस पी20 प्रो आणि पी20 लाइट देशात लॉन्च केले जातील.

The post अमेजॉन एक्सक्सूसिव असतील हुआवई पी20 प्रो आणि पी20 लाइट, 24 एप्रिलला होतील भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी हुआवई ने काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की कंपनी येणार्‍या 24 एप्रिलला भारतात एका ईवेंट चे आयो​जन करत आहे आणि ईवेंट च्या मंचावरून कंपनी चे फ्लॅगशिप स्मार्टफोंस पी20 प्रो आणि पी20 लाइट देशात लॉन्च केले जातील. हुआवई ने या लॉन्च साठी मीडिया इन्वाईट पण पाठवणे सुरू केले आहे. त्याचबरोबर आॅनलाईन शॉपिंग साइट अमेजॉन ​इंडिया ने एक खास वेबपेज बनवून स्पष्ट केले आहे की हुआवई पी20 प्रो आणि हुआवई पी20 लाइट अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होतील.

अमेजॉन इंडिया ने हुआवई पी20 प्रो आणि हुआवई पी20 लाइट चे प्रोडक्ट पेज बनवून सार्वजनिक केले आहेत. या प्रोडक्ट पेज वर हुआवई पी सीरीज कमिंग सून लिहिण्यात आले आहे. या पेज नंतर स्पष्ट झाले आहे की हुआवई पी20 प्रो आणि हुआवई पी20 लाइट फक्त अमेजन वरून एक्सक्लूसिव विकत घेता येतील.

 

हुआवई इंडिया ने सांगितले आहे की येणार्‍या 24 एप्रिल म्हणजे मंगळवारी कंपनी चे दोन लेटेस्ट स्मार्टफोन पी20 प्रो आणि पी20 लाइट भारतात लॉन्च केले जातील. पण अमेजॉन वर हे दोन्ही फोन मॉडेल कधी सेल साठी उपलब्ध होतील तसेच यांची किंमत काय असेल याची माहिती हुआवई किंवा अमेजन कडून अजूनपर्यंत देण्यात आली नाही.

जर तुमचा फोन वापरत असेल जास्त रॅम तर करा हे उपाय

हुआवई ने आपल्या पी20 सीरीज चे स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर आधीच सादर केले आहेत. जागतिक बाजारात हुआवई ने पी20 प्रो आणि पी20 नावाने आपले फोन लॉन्च केले आहेत. हुआवई पी20 ला 679 यूरो तसेच हुआवई पी20 प्रो ला 899 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आले आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 52,000 रुपये आणि 72,000 रुपये होतात. तसेच असा अंदाज लावला जात आहे की पी20 स्मार्टफोन भारतात पी20 लाइट नावाने लॉन्च केला जाईल.

The post अमेजॉन एक्सक्सूसिव असतील हुआवई पी20 प्रो आणि पी20 लाइट, 24 एप्रिलला होतील भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-p20-pro-huawei-p20-lite-launched-in-india-amazon-exclusive-in-marathi/feed/ 0