जर तुमचा फोन वापरत असेल जास्त रॅम तर करा हे उपाय

एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो सध्यातरी गूगल ची सर्वात नवीन मोबाइल आॅपरेटिंग सिस्टम आहे आणि आज जवळपास सर्वच फोन या आॅपरेटिंग सिस्टम वर सादर केले जातात. ही आॅपरेटिंग सिस्टम खुप अडवांस आहे आणि यात काही नवीन फीचर्स पण आहेत. पण एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम ची एक मोठी कमजोरी ही पण म्हणू शकतो की यात रॅम जास्त वापरला जातो.

ओरियो आॅपरेटिंग सिस्टम वापरणारे अनेक लोक हीच तक्रार करत आहेत की जास्त रॅम वापरल्या मुळे फोन स्लो होत आहे. ही तक्रार घेऊन तुम्ही सर्विस सेंटर मध्ये जरी गेलात तर ते तुमचा फोन फॅक्टरी रिसेट करतील आणि वरून पैसे पण घेतील. त्यानंतर काही दिवसांपर्यंत तरी फोन चांगला चालेल पण नंतर पुन्हा तोच त्रास सुरू होईल. आम्ही खाली काही उपाय सांगितले आहेत ज्यांचा दीर्घकाळासाठी तुम्हाला फायदा होईल.

का वापरला जातो जास्त रॅम?
जास्त रॅम वापरल्या जाण्या मागे अनेक कारणे असू शकतात ज्यात मोठा वाटा अॅप्लिकेशन्स चा असतो. हे अॅप्लिकेशन आॅपरेटिंग सिस्टम च्या हिशोबात आॅप्टिमाइज नसतात आणि काही तर योग्य प्रकारे कोड पण केलेले नसतात आणि त्यामुळेच ते फोनचा जास्त रॅम वापरतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की काही अॅप्लिकेशन्स असे असतात ज्यांचा काहीच उपयोग नसतो पण ते जास्त मेमोरी वापरतात. त्यामुळे जर तुमचा फोन हँग होत असेल किंवा मधे मधे अडकत असेल तर सर्वात आधी तुम्ही त्या अॅप्लिकेशन्स चा शोध लावला पाहिजे जे विनाकारण रॅम वापरत आहेत.

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या ३५०

कसे शोधाल अॅप्स?
1. यासाठी सर्वात आधी तुम्हाला सेटिंग मध्ये जावे लागेल.
2. तिथे मेमोरी आणि स्टोरेज चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3. यात सर्वात वर मेमोरी आणि खाली तुम्हाला स्टोरेज ची माहिती येईल. लक्षात असू दे की मेमोरी म्हणजे रॅम आणि स्टोरेज म्हणजे फोन ची इंटरनल मेमोरी आहे.
4. तुम्हाला मेमोरी वर क्लिक करायचे आहे.
5. त्यानंतर तिथे खाली माहिती येईल की कोणता अॅप किती रॅम वापरत आहे. या सोबत तुम्हाला ही पण माहिती मिळेल की मेमोरी च्या वापरात कोणत्या अॅप्लिकेशन चा वापर होत आहे.
6. तुम्ही फोन च्या मागील 3 तासांचा, 6 तासांचा, 12 तासांचा आणि 1 दिवसाचा पूर्ण तपशील घेऊ शकता. त्यातून तुम्हाला कळेल की कोणता अॅप्लिकेशन आहे जो सर्वात जास्त रॅम वापरत आहे.

समस्या सोडविण्यासाठी हे उपाय करा
उपाय 1: जर कोणता असा अॅप्लिकेशन आहे जो तुमच्या उपयोगाचा नाही पण खुप रॅम वापरत आहे तर त्याला अनइंस्टॉल करा.

पण जर एखादा असा एंडरॉयड अॅप्लिकेशन आहे जो अनइंस्टॉल होत नाही तर तुम्ही त्याला डिसेबल करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोन च्या सेटिंग मध्ये जावे लागेल आणि तिथे अॅ​प्स पर्यायाची निवड करावी लागेल.

अॅप्स मध्ये तुम्ही आॅल टॅब मध्ये जा.

तिथे एक साथ सर्व अॅप्लिकेशन येतील तुम्ही त्या अॅप्लिकेशन ची निवड करा जो जास्त रॅम वापरत आहे.

अॅप्लिकेशन वर क्लिक केल्यावर सर्वात आधी डिसेबल आणि फोर्स स्टॉप चे पर्याय येतील. तुम्ही त्याला डिसेबल करा.

उपाय 2: जर अॅप्लिकेशन तुमच्या उपयोगाचा असेल तर पद्धत वेगळी आहे.
असा अॅप जो भरपुर उपयोगी आहे पण रॅम जास्त वापरत असेल तर सर्वात आधी त्याचा अपडेट चेक करा त्यासाठी तुम्ही
1. प्ले स्टोर ओपन करा
2. मग माय अॅप मध्ये जाऊन अपडेट चेक करा. जर नवीन अपडेट आला असेल तर लवकर अपडेट करून घ्या. नवीन अपडेट ने पण तुमची समस्या दूर होऊ शकते.

उपाय 3: अपडेट नंतर पण तुमची समस्या जशास तसी असेल तर तुम्ही त्या अॅप ला आधी अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा. ह्याने तुमची समस्या दूर होऊ शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here