Infinix Hot 7 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7 https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-7-india-launch-dual-selfie-camera-specifications-price-7999/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-7-india-launch-dual-selfie-camera-specifications-price-7999/#respond Tue, 09 Jul 2019 11:33:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4752 Infinix Hot 7 कंपनी द्वारा गेल्या महिन्यात लॉन्च केल्या गेलेल्या Hot 7 Pro डिवाईसचा हा दुसरा वर्जन आहे जो वेगळ्या रॅम व प्रोसेसर सह आला आहे.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी Infinix ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपला डाव खेळत Hot 7 Pro स्मार्टफोन लॉन्च केला होता. Infinix Hot 7 Pro 6जीबी रॅम सह बाजारात आला होता ज्याची किंमत 9,999 रुपये होती. लॉन्च सोबतच Infinix Hot 7 Pro भारतातील सर्वात स्वस्त 6जीबी रॅम असलेला स्मार्टफोन बनला होता, ज्याचा रेकॉर्ड अजूनतरी कोणत्याही ब्रँड तोडू शकला नाही. तसेच आज भारतीय बाजारात आपले स्मार्टफोन्स वाढवत इनफिनिक्स ने अजून एक नवीन डिवाईस Infinix Hot 7 पण लॉन्च केला आहे.

Infinix Hot 7 कंपनी द्वारा गेल्या महिन्यात लॉन्च केल्या गेलेल्या Hot 7 Pro डिवाईसचा हा दुसरा वर्जन आहे जो वेगळ्या रॅम व प्रोसेसर सह आला आहे. कंपनीने हा फोन 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो येत्या 15 जुलै पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. Infinix Hot 7 मीडनाईट ब्लॅक, एक्वा ब्लू आणि मोका ब्राउन कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

डिजाईन व लुक

Infinix Hot 7 लुक मध्ये प्रो वर्जन सारखाच आहे. कंपनीने हा फोन पण रेग्यूलर नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोनच्या तिन्ही कडा नॅरो बेजल्स वाल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले वर कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही. इनफिनिक्स हॉट 7 मेटल यूनिबॉडी डिजाईन वर बनला आहे. ज्याच्या बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे. बॅक पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे ज्या खाली Infinix ची ब्रँडिंग आहे. वाल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजवीकडील पॅनल वर देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा: 8-इंचाचा डिस्प्ले आणि 5,100एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला दमदार Samsung Galaxy Tab A 8.0 (2019)

स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 7 स्मार्टफोन कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो सह आणला आहे जो 2.5 कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड 6.19-इंचाच्या एचडीप्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित हा स्मार्टफोन एक्सओएस 5.0 ओपेरा वर सादर केला गेला आहे जो 2.39गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या 64बिट आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी25 चिपसेट वर चालतो .

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Infinix Hot 7 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी पण या फोन मध्ये डुअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Nokia 6.1 ची किंमत पुन्हा झाली कमी, 16,999 रुपयांचा फोन आता विकत घेता येईल फक्त 6,999 रुपयांमध्ये

Infinix Hot 7 4जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Infinix Hot 7 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

वीडियो

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000एमएमएच बॅटरी आणि 4 कॅमेरा असलेला Infinix Hot 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-7-india-launch-dual-selfie-camera-specifications-price-7999/feed/ 0
9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6जीबी रॅम, डुअल सेल्फी कॅमेरा आणि 4,000एमएमएच बॅटरी असलेला Infinix Hot 7 Pro https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-7-pro-launched-india-6gb-ram-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-7-pro-launched-india-6gb-ram-4000mah-battery/#respond Mon, 10 Jun 2019 09:22:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4532 हा स्मार्टफोन ब्रँडचा नव्हे तर देशातील सर्वात स्वस्त 6जीबी रॅम असलेला फोन बनला आहे.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6जीबी रॅम, डुअल सेल्फी कॅमेरा आणि 4,000एमएमएच बॅटरी असलेला Infinix Hot 7 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix India ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Infinix S4 लॉन्च केला होता. 32-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन कंपनी 8,999 रुपयांमध्ये विकत आहे. आज पुन्हा देशात आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत कंपनीने एक आणि नवीन डिवाईस Hot 7 Pro लॉन्च केला आहे. Infinix ने हा फोन 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ब्रँडचा नव्हे तर देशातील सर्वात स्वस्त 6जीबी रॅम असलेला फोन बनला आहे.

डिजाईन व लुक
Infinix Hot 7 Pro कंपनी द्वारा नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनच्या तिन्ही कडा नॅरो बेजल्स वाल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले वर कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. हॉट 7 प्रो च्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे. बॅक पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे ज्याच्या खाली Infinix ची ब्रँडिंग आहे. वाल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स
Infinix ने Hot 7 Pro स्मार्टफोन 6.19-इंचाच्या एचडीप्लस डिस्प्ले वर सादर केला आहे जो 2.5 कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. एंडरॉयड ओएस आधारित हा स्मार्टफोन मीडियाटेक के पी22 चिपसेट वर चालतो. Infinix Hot 7 Pro भारतात 6जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Infinix Hot 7 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी पण या फोन मध्ये डुअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

Infinix Hot 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Hot 7 Pro मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. इनफिनिक्सचा हा नवीन फोन मीडनाईट ब्लॅक आणि एक्वा ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

किंमत व उपलब्धता
Infinix ने Hot 7 Pro 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो येत्या 22 जून पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. आपल्या फॅन्ससाठी कंपनीने लॉन्च ऑफरची सुरवात केली आहे. Infinix Hot 7 Pro 17 जून पासून 21 जून पर्यंत 1,000 रुपयांनी कमी किंमतीत विकत घेता येईल. म्हणजे या 5 दिवशी इनफिनिक्स हॉट 7 प्रो फक्त 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6जीबी रॅम, डुअल सेल्फी कॅमेरा आणि 4,000एमएमएच बॅटरी असलेला Infinix Hot 7 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-7-pro-launched-india-6gb-ram-4000mah-battery/feed/ 0