Nokia 6.1 ची किंमत पुन्हा झाली कमी, 16,999 रुपयांचा फोन आता विकत घेता येईल फक्त 6,999 रुपयांमध्ये

Nokia ने गेल्या महिन्यातच Nokia 8.1, Nokia 4.1 आणि Nokia 3.1 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या होत्या त्या नंतर या तिन्ही स्मार्टफोन्सचे वेगवेगळे वेरिएंट्स स्वस्तात सेल साठी उपलब्ध झाले आहेत. आता पुन्हा एकदा आपल्या फॅन्सना भेट देत Nokia ने आपल्या मीड बजेट स्मार्टफोन Nokia 6.1 ची किंमत पण कमी केली आहे. कंपनी ने Nokia 6.1 च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत त्या मुळे हा फोन 10,000 रुपयांपेक्षा पण कमी बजेट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे.

किंमत झाली कमी

Nokia 6.1 च्या 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम वाल्या वेरिएंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. आधीपण कंपनीने या फोनची किंमत कमी केली होती. Nokia 6.1 चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता जो नवीन प्राइस कट नंतर फक्त 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 18,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Nokia 6.1 चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आता 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हा स्मार्टफोन नोकियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच फ्लिपकार्ट व अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध आहे. बातमी देण्यापुर्वीपर्यंत कंपनीच्या वेबसाइट वर Nokia 6.1 चा फक्त 4जीबी रॅम वेरिएंटच नवीन प्राइस कट सह 9,999 रुपयांमध्ये सेल साठी लिस्ट झाला होता. Nokia 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट फ्लिपकार्ट वर पण नवीन किंमत सह उपलब्द आहे पण फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट अजून अपडेट झाला नाही.

नोकिया 6.1

Nokia 6.1 पाहता हा फोन बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला होता ज्यात कोणतीही नॉच नाही. हा फोन 16:6 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.5-इंचाच्या फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. कंपनीने Nokia 6.1 स्टॉक एंडरॉयड वर सादर केला होता जो सध्या एंडरॉयडच्य लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

प्रोसेसिंग साठी Nokia 6.1 मध्ये 2.2 गीगा हर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 630 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 6.1 च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी Nokia 6.1 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here