Infinix InBook X2 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Oct 2022 11:28:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 14 हजारांत 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही; Infinix चा किफायतशीर Laptop देखील लाँच, पाहा फीचर्स आणि प्राइस https://www.91mobiles.com/marathi/infinix-inbook-x2-plus-laptop-and-infinix-43y1-smart-tv-launched-india-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-inbook-x2-plus-laptop-and-infinix-43y1-smart-tv-launched-india-price-specifications/#respond Thu, 13 Oct 2022 11:28:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13963 टेक निर्माता Infinix ने भारतीय बाजारात दोन नवीन डिवाइस सादर केले आहेत. कंपनीनं नवीन Infinix InBook X2 Plus लॅपटॉपसह एक शानदार Infinix 43Y1 Smart TV देखील लाँच केला आहे. फीचर्स पाहता इनबुक एक्स2 प्लस एक हलका आणि पातळ लॅपटॉप आहे जो 11th जेनेरशन इंटेल कोर प्रोसेसर,15.6 इंचाच्या फुल-एचडी आयपीएस डिस्प्लेसह येतो. तर Infinix 43Y1 स्मार्ट […]

The post 14 हजारांत 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही; Infinix चा किफायतशीर Laptop देखील लाँच, पाहा फीचर्स आणि प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक निर्माता Infinix ने भारतीय बाजारात दोन नवीन डिवाइस सादर केले आहेत. कंपनीनं नवीन Infinix InBook X2 Plus लॅपटॉपसह एक शानदार Infinix 43Y1 Smart TV देखील लाँच केला आहे. फीचर्स पाहता इनबुक एक्स2 प्लस एक हलका आणि पातळ लॅपटॉप आहे जो 11th जेनेरशन इंटेल कोर प्रोसेसर,15.6 इंचाच्या फुल-एचडी आयपीएस डिस्प्लेसह येतो. तर Infinix 43Y1 स्मार्ट टीव्हीमध्ये 43 इंचाचा एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 300 निट्स ब्राइटनेस आणि 60Hz रिफ्रेश रेटला स्पॉट करतो.

Infinix InBook X2 Plus price

Infinix InBook X2 Plus लॅपटॉप फ्लिपकार्टवर 32,990 रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेता येईल तर 11th जेनेरशन इंटेल कोर i7 प्रोसेसर असलेला हाय-एन्ड मॉडेल 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह 52,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ग्राहक इंटेल कोर आय3, कोर आय5 या कोर आय7 प्रोसेसरसह लॅपटॉप विकत घेऊ शकतील. सोबत 8GB रॅम आणि 16GB रॅम ऑप्शनसह 256 स्टोरेजचा ऑप्शन मिळेल. हा Infinix लॅपटॉप ब्लू, ग्रे आणि रेड कलर ऑप्शनमध्ये आला आहे. हे देखील वाचा: ओप्पो मोबाइल्सवर बंदीचं सावट; Nokia नं चिनी कंपनीला खेचलं कोर्टात, जाणून घ्या प्रकरण

Infinix inbook x2 plus laptop and infinix 43y1 smart tv launched india price specifications

Infinix InBook X2 Plus specifications

या लॅपटॉप मध्ये 15.6 इंचाचा फुल-एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 300 निट्स ब्राइटनेस, 1,920×1,080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळतो. लॅपटॉप मध्ये 11th जेनेरशन इंटेल कोर i7 प्रोसेसर पर्यंतचा प्रोसेसर मिळतो. हा विंडोज 11 होम आउट-ऑफ-द-बॉक्सवर चालणार लॅपटॉप 16GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 512GB पर्यंत SSD स्टोरेजला सपोर्ट करतो.

डिवाइसमध्ये 50Wh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10 तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकते. तसेच Infinix InBook X2 Plus 65W USB टाइप-सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 5 आणि ब्लूटूथ v5.1 सारखे ऑप्शन मिळतात. यात ड्युअल एलईडी फ्लॅशसह फुल-एचडी वेब कॅमेरा देण्यात आला आहे. चांगल्या ऑडियोसाठी ड्युअल मायक्रोफोन आणि 1.5W ड्युअल स्पिकर मिळतात. कंपनीनं नवीन लॅपटॉपमध्ये अ‍ॅल्यूमीनियम बॉडीचा वापर केला आहे.

Infinix 43Y1 Smart TV price

Infinix 43Y1 स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवर 13,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीनं या स्मार्ट टीव्हीच्या भारतीय सेलचा खुलासा केला नाही. परंतु लवकरच हा टीव्ही ग्राहकांना खरेदी करता येईल अशी अपेक्षा आहे. हे देखील वाचा: 10 हजारांच्या बजेटमध्ये सुंदर स्मार्टफोन; 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 4G लाँच

Infinix inbook x2 plus laptop and infinix 43y1 smart tv launched india price specifications

Infinix 43Y1 Smart TV specifications

Infinix च्या इस स्मार्ट टीव्हीमध्ये 43 इंचाचा फुल-एचडी एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 300 निट्स ब्राइटनेस आणि 1,920×1,080 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं. स्मार्ट टीव्हीमध्ये 20W चे ऑडियो स्पिकर आणि डॉल्बी ऑडियो टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

चांगल्या परफॉर्मन्ससाठी स्मार्ट टीव्हीमध्ये क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 4GB स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये दोन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, एक आरएफ इनपुट, एक एव्ही इनपुट, एक 3.5 मिमी हेडफोन जॅक, एक सीओएक्स आउट पोर्ट, लां आणि वाय-फाय आहे. तसेच Infinix 43Y1 Smart TV मध्ये प्राइम व्हिडीओ, Youtube, SonyLiv, Zee5, ErosNow सारखे अनेक अ‍ॅप्स वापरता येतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 14 हजारांत 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही; Infinix चा किफायतशीर Laptop देखील लाँच, पाहा फीचर्स आणि प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-inbook-x2-plus-laptop-and-infinix-43y1-smart-tv-launched-india-price-specifications/feed/ 0