50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 4G लाँच

50mp camera phone Infinix Hot 20 4g mobile launched check price specifications details

स्वस्त स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टेक ब्रँड इनफिनिक्सनं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाइल फोन Infinix Hot 20 4G लाँच केला आहे. कंपनीच्या Hot 20 series मध्ये Infinix Hot 20 5G, Infinix Hot 20s आणि Infinix Hot 20i लाँच केल्यानंतर हा सीरीजचा चौथा स्मार्टफोन आहे जो टेक मंचावर आला आहे. हा इनफिनिक्स हॉट 20 4जी 10 हजारांच्या रेंज मध्ये लाँच झाला आहे तसेच 50MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G85 chipset आणि 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो.

Infinix Hot 20 Specifications

Infinix Hot 20 अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या इनफिनिक्स मोबाइलमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. टेक मार्केटमध्ये हा फोन 4जीबी रॅम व 6 जीबी रॅमच्या दोन मॉडेल्समध्ये लाँच झाला आहे जो 5जीबी एक्सटेंडेड रॅमला सपोर्ट करतो. हे व्हेरिएंट्स 128 जीबी इंटरनल स्टोरेज सोबतच मायक्रोएसडी कार्डला देखील सपोर्ट करतात. हे देखील वाचा: जियो युजर्सना मोठा धक्का; न सांगता बंद केले अनेक लोकप्रिय प्लॅन्स, तुमचा प्लॅन तर नाही ना या यादीत?

50mp camera phone Infinix Hot 20 4g mobile launched check price specifications details

इनफिनिक्स हॉट 20 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते.

50mp camera phone Infinix Hot 20 4g mobile launched check price specifications details

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच एक एआय लेन्स आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: एकच नंबर! सिंगल चार्जवर 100KM धावतील या 4 Electric Scooters; चार्जिंग टाइम देखील कमी

50mp camera phone Infinix Hot 20 4g mobile launched check price specifications details

Infinix Hot 20 price

इनफिनिक्स हॉट 20 थायलंडमध्ये लाँच झाला आहे जिथे फोननं दोन व्हेरिएंट्समध्ये एंट्री घेतली आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता 4 जीबी रॅम असलेल्या इनफिनिक्स हॉट 20 ची किंमत THB 4,799 (जवळपास 10,300 रुपये) आहे तर मोठा 6GB RAM Infinix Hot 20 THB 5,399 (जवळपास 11,600 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा फोन Sonic Black, Legend White, Tempo Blue आणि Fantasy Purple कलरमध्ये बाजारात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here