Infinix Note 12 (2023) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 07:17:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50एमपी कॅमेऱ्यासह Infinix Note 12 (2023) लाँच; जोडीला Infinix Zero 20 देखील आला https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-12-2023-launched-know-price-specifications-details-with-infinix-zero-20/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-12-2023-launched-know-price-specifications-details-with-infinix-zero-20/#respond Fri, 30 Sep 2022 06:31:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13590 इनफिनिक्सने Infinix Zero 20 सोबतच Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन देखील बाजारात लाँच केला आहे. इनफिनिक्स नोट 12 मोबाइल फोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट सोबतच 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. पुढे या इनफिनिक्स नोट 12 (2023) सोबतच इनफिनिक्स झिरो 20 चे डिटेल्स देखील देण्यात आले आहेत. Infinix Note 12 […]

The post 50एमपी कॅमेऱ्यासह Infinix Note 12 (2023) लाँच; जोडीला Infinix Zero 20 देखील आला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इनफिनिक्सने Infinix Zero 20 सोबतच Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन देखील बाजारात लाँच केला आहे. इनफिनिक्स नोट 12 मोबाइल फोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट सोबतच 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. पुढे या इनफिनिक्स नोट 12 (2023) सोबतच इनफिनिक्स झिरो 20 चे डिटेल्स देखील देण्यात आले आहेत.

Infinix Note 12 (2023)

इनफिनिक्स नोट 12 (2023) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस सोबतच या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. 5जीबी एक्सटेंडेड रॅमच्या माध्यमातून एकूण 13जीबी रॅमची पावर मिळते. हे देखील वाचा: घर बसल्या उघडा बँक अकाऊंट, काही क्लिक्समध्ये सुरु करा बचत खातं

Infinix Note 12 2023 launched know price specifications details with Infinix Zero 20

फोटोग्राफीसाठी Infinix Note 12 (2023) ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 50 मेगपिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि एक एआय सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Note 12 2023 launched know price specifications details with Infinix Zero 20

Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जोडीला 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा मोबाइल फोन Grey, White आणि Blue कलरमध्ये लाँच झाला आहे ज्याची प्राइस भारतीय करंसीनुसार 14,000 रुपयांच्या आसपास आहे. या किंमतीत 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते.

Infinix Zero 20

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाइलच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्लेवर लाँच झाला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हे देखील वाचा: 43 हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर; GT Force नं लाँच केल्या दोन स्वस्त Electric Scooters

Infinix Note 12 2023 launched know price specifications details with Infinix Zero 20

Infinix Zero 20 मध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते. Infinix Zero 20 Price 21,000 रुपयांच्या आसपास आहे तसेच हा Gold आणि Gray कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

The post 50एमपी कॅमेऱ्यासह Infinix Note 12 (2023) लाँच; जोडीला Infinix Zero 20 देखील आला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-12-2023-launched-know-price-specifications-details-with-infinix-zero-20/feed/ 0