43 हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर; GT Force नं लाँच केल्या दोन स्वस्त Electric Scooters

gt-force-launched-soul-vegas-and-drive-pro-electric-scooters-know-price

इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी जीटी फोर्स (GT Force) नं भारतीय बाजारात दोन किफायशीर इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लाँच केल्या आहेत. या दोन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची नावे जीटी सोल वेगास (GT Soul Vegas) आणि जीटी ड्राईव्ह प्रो (GT Drive Pro) अशी ठेवण्यात आली आहेत. याची किंमत अनुक्रमे 47,370 रुपये आणि 67,208 रुपये आहे. या स्कूटर लेड-अ‍ॅसिड बॅटरी किंवा लिथियम-आयन पॅकसह उपलब्ध होतील. दोन्ही स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी डिजाईन करण्यात आल्या आहेत, त्यामुळे हेव्ही युजर्सना या स्कूटर्स कदाचित आवडणार नाहीत.

GT Soul Vegas Electric Scooter

जीटी सोल वेगास इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60V 28Ah लेड-अ‍ॅसिड बॅटरी मिळते. फुल चार्जमध्ये ही 60 km ची देऊ शकते. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरचा 60V 26Ah लिथियम-आयन बॅटरी व्हेरिएंट फुल चार्जमध्ये 65 km पर्यंत चालेल. कंपनीच्या दाव्यानुसार, लेड-अ‍ॅसिड बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यास जवळपास 8 तासांचा वेळ लागेल, तर लिथियम-आयन बॅटरी पॅकची चार्जिंग लवकरच म्हणजे 5 तासांमध्ये फुल चार्ज होईल. हे देखील वाचा: लयभारी! 15 हजारांच्या बजेटमध्ये 108MP Camera असलेला Moto G72 फोन; पुढील आठवड्यात लाँच

gt-force-launched-soul-vegas-and-drive-pro-electric-scooters-know-price

जीटी सोल वेगासचे वजन 95 किलोग्राम (लेड-अ‍ॅसिड) आणि 88 किलोग्राम (लिथियम-आयन) आहे. ही स्कूटर 150 किलोग्राम वजन वाहून नेऊ शकते आणि ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे. स्कूटरमध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, रिवर्स मोड, क्रूज कंट्रोल सिस्टम, इग्निशन लॉक स्टार्ट, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि ड्युअल ट्यूब रियर सस्पेंशन आहे. ही तीन एक्सटीरियर कलरमध्ये सादर केला जाईल- ग्लॉसी रेड, ग्रे आणि ऑरेंज.

GT Drive Pro Electric Scooter

जीटी ड्राईव्ह प्रो इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचं झालं तर या ई-स्कूटर मध्ये 48V 28Ah लेड-अ‍ॅसिड बॅटरी किंवा 48V 26Ah लिथियम-आयन पॅक मिळतो, जो GT सोल वेगास इतकीच रेंज देतो. दोन्ही स्कूटर्सचा चार्जिंग टाइम सारखाच आहे. जीटी ड्राईव्ह प्रो मध्ये जीटी सोल वेगास सारखे फीचर्स आहेत परंतु तरीही हिचे वजन 10 किलोग्रॅम कमी अर्थात 85 किलोग्राम आहे. हे देखील वाचा: सेल्फी प्रेमींना आवडेल ‘हा’ फोन! 60MP Selfie Camera असलेला Infinix Zero 20 लाँच; किंमत परवडणारी

gt-force-launched-soul-vegas-and-drive-pro-electric-scooters-know-price

ही बॅटरी असलेली नवीन स्कूटर 140 किलोग्राम वजन वाहून नेऊ शकते. जीटी ड्राईव्ह प्रो चार एक्सटीरियर कलरमध्ये उपलब्ध आहे, ज्यात व्हाइट, ब्लू, रेड आणि चॉकलेटचा समावेश आहे. कंपनी मोटरवर 18 महिन्यांची वॉरंटी, लेड-अ‍ॅसिड बॅटरीसाठी एक वर्षाची वॉरंटी आणि स्कूटरच्या दोन्ही मॉडेल्ससाठी लिथियम-आयन पॅकवर तीन वर्षांची वॉरंटी देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here