Infinix Note 12 Pro 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 19 Jul 2022 09:25:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अत्यंत स्वस्तात 108MP Camera आणि 8GB रॅम; नवीन आणि धमाकेदार फोनची दणक्यात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-note-12-pro-4g-launched-price-specification-sale/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-note-12-pro-4g-launched-price-specification-sale/#respond Tue, 19 Jul 2022 09:25:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11526 Infinix नेहमीच कमी किंमतीत हायएंड स्पेसिफिकेशन्स देण्याचा प्रयत्न करत असते. आता कंपनीनं आपल्या Note 12 लाइनअपचा विस्तार करत एक नवीन फोन सादर केला आहे. कंपनीनं या सीरीजमध्ये Infinix Note 12 Pro 4G कोणताही गाजावाजा न करता सादर केला आहे. याआधी नोट 12 लाइनअपमध्ये Infinix Note 12i, Note 12 VIP आणि Note 12 Pro 5G सारखे […]

The post अत्यंत स्वस्तात 108MP Camera आणि 8GB रॅम; नवीन आणि धमाकेदार फोनची दणक्यात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix नेहमीच कमी किंमतीत हायएंड स्पेसिफिकेशन्स देण्याचा प्रयत्न करत असते. आता कंपनीनं आपल्या Note 12 लाइनअपचा विस्तार करत एक नवीन फोन सादर केला आहे. कंपनीनं या सीरीजमध्ये Infinix Note 12 Pro 4G कोणताही गाजावाजा न करता सादर केला आहे. याआधी नोट 12 लाइनअपमध्ये Infinix Note 12i, Note 12 VIP आणि Note 12 Pro 5G सारखे हँडसेट सादर झाले आहेत. नवीन Infinix Note 12 Pro 4G बाबत बोलायचं झालं तर हा फोन MediaTek Helio G99 प्रोसेसरसह येणार पहिला हँडसेट आहे. या फोनमध्ये 8GB Ram आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सोबतच 108MP Camera देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या नव्या इनफिनिक्स फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Infinix Note 12 Pro 4G ची किंमत आणि उपलब्धता

Infinix नं Note 12 Pro स्मार्टफोनच्या 5G मॉडेलची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. परंतु आता कोणालाही चाहूलही न लागू देता कंपनीनं या डिवाइसचा 4G व्हेरिएंट सादर केला आहे. सध्या हा फोन चिनी मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. Infinix Note 12 Pro 4G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. तसेच ई-कॉमर्स साईट अलीएक्सप्रेसवर फोन 199.9 डॉलरमध्ये विकला जात आहे. ही किंमत सुमारे 16,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीनं या फोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली नाही. हे देखील वाचा: नथिंग फोनला टिकू देणार नाही Google; भारतात येतोय स्वस्त Pixel स्मार्टफोन, किंमत लीक

Infinix Note 12 Pro 4G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन

  • 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले
  • 8GB RAM + 128GB स्टोरेज
  • Mediatek Helio G99 प्रोसेसर
  • 108MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • Android 12 बेस्ड XOS 10.6
  • 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Infinix Note 12 Pro 4G मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 20:9 अस्पेक्ट रेशियोसह येतो. इनफिनिक्सचा हा नवीन फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. तसेच हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात 6nm प्रोसेसवर बनेलला मीडियाटेकचा हीलियो G99 चिपसेट मिळतो. स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित कंपनीच्या XOS 10.6 वर चालतो. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी 50MP च्या धमाकेदार कॅमेऱ्यासह OPPO Reno 8 आणि Reno 8 Pro लाँच

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. सोबतीला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post अत्यंत स्वस्तात 108MP Camera आणि 8GB रॅम; नवीन आणि धमाकेदार फोनची दणक्यात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-infinix-note-12-pro-4g-launched-price-specification-sale/feed/ 0