Infinix Note 30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 13 Jun 2023 05:10:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Infinix Note 30 VIP झाला लाँच, ह्यात आहे 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-vip-launch-with-32mp-selfie-camera-and-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-vip-launch-with-32mp-selfie-camera-and-5000mah-battery/#respond Tue, 13 Jun 2023 05:10:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21553 Infinix नं आपल्या Note 30 सीरीजमध्ये एक नवीन मोबाइल सादर केला आहे. कंपनीनं हा नवीन डिवाइस Infinix Note 30 VIP नावानं ग्लोबली लाँच केला आहे. हा नोट 30 सीरीजचा सर्वात नवीन मॉडेल आहे. ह्याआधी कंपनीनं Infinix Note 30i, Note 30 (4G), Note 30 5G आणि Note 30 Pro सारखे फोन्स सादर केले आहेत. Note 30 […]

The post Infinix Note 30 VIP झाला लाँच, ह्यात आहे 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हँडसेट मध्ये 8W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग आहे.
  • फोनमध्ये 6.67-इंच 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये JBL-ट्यून्ड ड्युअल स्पिकर्स देण्यात आले आहेत.

Infinix नं आपल्या Note 30 सीरीजमध्ये एक नवीन मोबाइल सादर केला आहे. कंपनीनं हा नवीन डिवाइस Infinix Note 30 VIP नावानं ग्लोबली लाँच केला आहे. हा नोट 30 सीरीजचा सर्वात नवीन मॉडेल आहे. ह्याआधी कंपनीनं Infinix Note 30i, Note 30 (4G), Note 30 5G आणि Note 30 Pro सारखे फोन्स सादर केले आहेत. Note 30 VIP कंपनीनं आपल्या Note 12 VIP चा उत्तराधिकारी म्हणून आणला आहे जो 120W फास्ट चार्जिंगसह आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला ह्या डिवाइसच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Infinix Note 30 VIP ची किंमत

Infinix Note 30 VIP ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीनं दोन कलर ऑप्शन मॅजिक ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू मध्ये आला आहे. ह्याची किंमत 299 डॉलर (जवळपास 24,635 रुपये) आहे.

Infinix Note 30 VIP चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

  • डिस्प्ले : Infinix Note 30 5G VIP मध्ये 6.67-इंच AMOLED FHD+ 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची सर्वाधिक ब्राइटनेस 900 nits आहे.
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज : हा फोन डायमेन्सिटी 8050 चिपसह येतो. तसेच ह्यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी बिल्ट-इन स्टोरेज देण्यात आली आहे.
  • कॅमेरा : Note 30 VIP मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. तर डिवाइसमध्ये मागे 10-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
  • बॅटरी : फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी चार्जिंगसाठी 68W ला सपोर्ट करते.
  • इतर फिचर: Note 30 VIP Infinix मध्ये बायपास चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे. जी चार्जिंग करंट बॅटरी 30 टक्के चार्ज झाल्यावर बायपास करू शकते आणि चार्जिंग आणि गेमिंग दरम्यान ओव्हरहीटिंग कमी करून थेट मदरबोर्डला पावर देते.

Infinix नं दावा केला आहे की बायपास चार्जिंगमुळे फोनचं तापमान 7 डिग्री पर्यंत कमी करता येईल. तसेच, नोट 30 विआयपीची बॅटरी इंडस्ट्री स्टँडर्डपेक्षा जास्त चांगली आहे. जी 1,000 चार्ज सायकल नंतर देखील 80 टक्के क्षमता कायम राखू शकते, ज्यामुळे युजर्सना कमीत कमी 3 वर्ष फोन वापरता येईल.

The post Infinix Note 30 VIP झाला लाँच, ह्यात आहे 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-vip-launch-with-32mp-selfie-camera-and-5000mah-battery/feed/ 0
Infinix Note 30 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; गुगल प्ले कन्सोलवर दिसला फोन https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-appears-on-google-play-console-listing-launch-seems-imminent/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-appears-on-google-play-console-listing-launch-seems-imminent/#respond Thu, 06 Apr 2023 10:45:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20086 Infinix Note 30 स्मार्टफोन लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. कारण आता हा स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमध्ये दिसला आहे. साधारणतः स्मार्टफोन्सचा लाँच जवळ असल्यावर ते गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट केले जातात. आता या लिस्टिंगमधून Infinix Note 30 च्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया लीकमधून कोणत्या स्पेक्सचा खुलासा झाला आहे. […]

The post Infinix Note 30 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; गुगल प्ले कन्सोलवर दिसला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Note 30 स्मार्टफोन 8GB रॅमसह लाँच होऊ शकतो.
  • फोनमध्ये मीडियाटेकचा हेलीयो जी99 चिपसेट दिला जाऊ शकतो.
  • यात अँड्रॉइड 13 आधारित एक्सओएस युआय दिला जाऊ शकतो.

Infinix Note 30 स्मार्टफोन लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. कारण आता हा स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमध्ये दिसला आहे. साधारणतः स्मार्टफोन्सचा लाँच जवळ असल्यावर ते गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट केले जातात. आता या लिस्टिंगमधून Infinix Note 30 च्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया लीकमधून कोणत्या स्पेक्सचा खुलासा झाला आहे.

गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमधून खुलासा झाला आहे की इनफिनिक्स नोट 30 स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करू शकतो. तसेच कंपनी हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियोसह सादर करू शकते. कन्सोलवर या फोनची एक इमेज देखील लिस्ट करण्यात आली आहे, या इमेजवरून स्पष्ट झालं आहे की आगामी इनफिनिक्स नोट 30 स्मार्टफोनच्या फ्रंटला एक पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यात स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा फिट केला जाऊ शकतो.

लिस्टिंगमधून या स्मार्टफोनमधील मीडियाटेक हीलियो जी99 प्रोसेसरचा खुलासा देखील झाला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 8 जीबी रॅमसह लिस्ट करण्यात आला आहे. या फोनमध्ये गुगलची लेटेस्ट अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम दिली जाऊ शकते, ज्यावर एक्सओएस युआयची लेयर मिळू शकते. याव्यतिरिक्त Infinix Note 30 स्मार्टफोनची इतर कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

आगामी इनफिनिक्स नोट 30 स्मार्टफोन या वेबसाइटवर X6833B या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लाइनअपमध्ये एकापेक्षा जास्त मॉडेल्स सादर केले जाऊ शकतात. यातील एकाचे नाव Infinix Note 30 VIP असू शकते. जो X6710 मॉडेल नंबरसह काही दिवसांपूर्वी ब्लूटूथ एसआयजीवर दिसला होता. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार हा व्हीआयपी डिवाइस ब्लूटूथ 5.3, 5,000एमएएच बॅटरी आणि 68 वॉट फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.

इनफिनिक्स नोट 12 (2023)

आगामी Infinix Note 30 स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये आलेल्या Infinix Note 12 (2023) ची जागा घेऊ शकतो. इनफिनिक्स नोट 12 स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशनसह देण्यात आला होता. जोडीला हीलियो जी99 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली होती. हा डिवाइस 8जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच यात अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 आहे.

नोट 12 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनच्या मागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि पावर बॅकअपसाठी 30 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Infinix Note 30 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; गुगल प्ले कन्सोलवर दिसला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-30-appears-on-google-play-console-listing-launch-seems-imminent/feed/ 0