Infinix Note 30 VIP झाला लाँच, ह्यात आहे 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी

Highlights

  • हँडसेट मध्ये 8W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग आहे.
  • फोनमध्ये 6.67-इंच 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये JBL-ट्यून्ड ड्युअल स्पिकर्स देण्यात आले आहेत.

Infinix नं आपल्या Note 30 सीरीजमध्ये एक नवीन मोबाइल सादर केला आहे. कंपनीनं हा नवीन डिवाइस Infinix Note 30 VIP नावानं ग्लोबली लाँच केला आहे. हा नोट 30 सीरीजचा सर्वात नवीन मॉडेल आहे. ह्याआधी कंपनीनं Infinix Note 30i, Note 30 (4G), Note 30 5G आणि Note 30 Pro सारखे फोन्स सादर केले आहेत. Note 30 VIP कंपनीनं आपल्या Note 12 VIP चा उत्तराधिकारी म्हणून आणला आहे जो 120W फास्ट चार्जिंगसह आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला ह्या डिवाइसच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Infinix Note 30 VIP ची किंमत

Infinix Note 30 VIP ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीनं दोन कलर ऑप्शन मॅजिक ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू मध्ये आला आहे. ह्याची किंमत 299 डॉलर (जवळपास 24,635 रुपये) आहे.

Infinix Note 30 VIP चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

  • डिस्प्ले : Infinix Note 30 5G VIP मध्ये 6.67-इंच AMOLED FHD+ 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची सर्वाधिक ब्राइटनेस 900 nits आहे.
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज : हा फोन डायमेन्सिटी 8050 चिपसह येतो. तसेच ह्यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी बिल्ट-इन स्टोरेज देण्यात आली आहे.
  • कॅमेरा : Note 30 VIP मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. तर डिवाइसमध्ये मागे 10-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
  • बॅटरी : फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी चार्जिंगसाठी 68W ला सपोर्ट करते.
  • इतर फिचर: Note 30 VIP Infinix मध्ये बायपास चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे. जी चार्जिंग करंट बॅटरी 30 टक्के चार्ज झाल्यावर बायपास करू शकते आणि चार्जिंग आणि गेमिंग दरम्यान ओव्हरहीटिंग कमी करून थेट मदरबोर्डला पावर देते.

Infinix नं दावा केला आहे की बायपास चार्जिंगमुळे फोनचं तापमान 7 डिग्री पर्यंत कमी करता येईल. तसेच, नोट 30 विआयपीची बॅटरी इंडस्ट्री स्टँडर्डपेक्षा जास्त चांगली आहे. जी 1,000 चार्ज सायकल नंतर देखील 80 टक्के क्षमता कायम राखू शकते, ज्यामुळे युजर्सना कमीत कमी 3 वर्ष फोन वापरता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here