Infinix S5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 21 Jan 2020 11:40:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Infinix S5 Pro असेल भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, फेब्रुवारी मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-with-pop-up-selfie-camera-cheapest-smartphone-in-segment/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-with-pop-up-selfie-camera-cheapest-smartphone-in-segment/#respond Tue, 21 Jan 2020 11:40:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6336 Infinix S5 Pro भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून एंट्री घेईल.

The post Infinix S5 Pro असेल भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, फेब्रुवारी मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix बाबत अलीकडेच खुलासा झाला होता कि हा टेक ब्रँड भारतात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करणार आहे आणि नवीन सीरीजच्या व्यतिरिक्त कंपनी भारतीय बाजारात आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन पण आणेल. 91मोबाईल्सने आपल्या सूत्रांकडून बातमी मिळवली होती कि Infinixचा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. तसेच आता एका मीडिया रिपोर्ट मध्ये इनफिनिक्सच्या या आगामी स्मार्टफोनच्या नावाचा पण खुलासा झाला आहे. रिपोर्ट मधून समोर आले आहे कि इनफिनिक्सचा हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात Infinix S5 Pro नावाने लॉन्च होईल.

Infinix S5 Pro च्या नावाची माहिती द मोबाईल इंडियन वेबसाइटच्या बातमीमधून मिळाली आहे. या वेबसाइटने सूत्रांच्या आधारावर लिहिले आहे कि इनफिनिक्स आपला आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा मोबाईल Infinix S5 Pro नावाने लॉन्च करेल. रिपोर्टनुसार हा आगामी डिवाईस मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स एस5 प्रो या कंपनीचा पहिला पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल. 91मोबाईल्सने सांगितले होते कि हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. अर्थात् Infinix S5 Pro भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून एंट्री घेईल.

91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार Infinix S5 Pro पुढल्या महिन्यात इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल. तसेच Infinix के बाद Tecno पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणेल. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड चीनी कंपनी Transsion Holdings Limited चे आहेत. मीडिया रिपोर्टनुसार Infinix एक नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात पण करेल ज्या अंतर्गत लॉन्च होणारे डिवाईसेज ‘सेल्फी सेंट्रिक’ स्मार्टफोन म्हणून लॉन्च केले जातील. हे फोन लो बजेट मधेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Infinix S5 Lite

इनफिनिक्स आपले प्रोडक्ट्सच्या किंमती आक्रमकपणे सादर करते. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या ब्रँडचे स्मार्टफोन कमी किंमतीतच लॉन्च केले जातात. इनफिनिक्सच्या लेटेस्ट स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर Infinix S5 Lite पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो तसेच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 7,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Infinix S5 Lite मध्ये 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असेलला 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फीसाठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Infinix S5 Pro असेल भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, फेब्रुवारी मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-in-india-with-pop-up-selfie-camera-cheapest-smartphone-in-segment/feed/ 0
फक्त 7999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन, सोबत आहे ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-lite-punch-hole-display-triple-rear-camera-launched-in-india-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-lite-punch-hole-display-triple-rear-camera-launched-in-india-specs-price/#respond Fri, 15 Nov 2019 13:17:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5795 हा स्मार्टफोन फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post फक्त 7999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन, सोबत आहे ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने गेल्या आठवड्यात नायजेरिया मध्ये आपल्या ‘एस सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन S5 Lite लॉन्च केला होता. फोनच्या शानदार स्पेसिफिकेशन्स आणि लुकमुळे या डिवाईसची वाट भारतीय यूजर्स पण बघत होते. आज याची प्रतीक्षा संपवत Infinix ने S5 Lite स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. भारतात हा स्मार्टफोन फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Infinix S5 Lite कंपनीने पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च केला आहे, जी या फोनची मोठी यूएसपी म्हणता येईल. फोनच्या फ्रंट पॅनल वर डावीकडे वर छोटासा होल देण्यात आला आहे आणि या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. Infinix S5 Lite चा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे आणि खालच्या बाजूला थोडा चिन पार्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. Infinix S5 Lite च्या रियर पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. त्याचप्रमाणे सिम स्लॉट फोनच्या डाव्या पॅनल वर आहे. Infinix S5 Lite 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो आणि फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत स्पीकर पण देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Infinix S5 Lite एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

Infinix S5 Lite 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix S5 Lite डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Infinix S5 Lite 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 नोव्हेंबर पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. Infinix S5 Lite ब्लॅक, श्यान आणि वॉयलेट कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 7999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन, सोबत आहे ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-lite-punch-hole-display-triple-rear-camera-launched-in-india-specs-price/feed/ 0
फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, क्वॉड रियर कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले असलेला हा धमाकेदार फोन https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-launched-in-india-price-at-rs-8999-cheapest-punch-hole-display-quad-rear-camera-4gb-ram-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-launched-in-india-price-at-rs-8999-cheapest-punch-hole-display-quad-rear-camera-4gb-ram-4000mah-battery/#respond Tue, 15 Oct 2019 12:24:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5524 हा फोन फक्त 8,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन ठरतो.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, क्वॉड रियर कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले असलेला हा धमाकेदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्या आठवड्यात एक्सक्लूसिव बातमी दिली होती ज्यात सांगण्यात आले होते कि टेक कंपनी Infinix भारतात आपले स्मार्टफोन्स वाढवत अजून एक नवीन डिवाईस Infinix S5 नावाने लॉन्च करण्याची तयारी करत आहे. आज कंपनीने आपला लेटेस्ट प्रोडक्ट सादर केला आहे. Infinix S5 आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन फक्त 8,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन ठरतो. Infinix S5 ने लॉन्च करून Realme-Redmi ब्रँडला आव्हान दिले आहे.

Infinix S5 चा लुक

Infinix S5 ची सर्वात मोठी खासियत आहि कि हा डिवाईस इनफिनिक्स ब्रँडचा पहिला स्मार्टफोन आहे जो पंच-होल डिस्प्लेसह लॉन्च झाला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला छोटासा होल आहे आणि यात सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Infinix S5 च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आणि सेंसरची माहिती आहे. Infinix S5 चा बॅक पॅनल Realme XT स्मार्टफोन सारखा बनवण्यात आला आहे. बॅक पॅनलच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर पण आहे आणि याच्या खाली Infinix ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे.

Infinix S5 चे स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 20:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला गेला आहे जो 90.5 टक्के स्कीन टू बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.6 इंचाचा एचडी+ पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 3डी ग्लास लेयरिंग देण्यात आली आहे. Infinix S5 एंडरॉयड 9 पाई आधारित XOS 5.5 यूआई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असेलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

Infinix S5 कंपनीने 4 जीबी रॅम सह वर लॉन्च केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी कार्ड द्वारे जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Infinix S5 क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलची वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फ साठी Infinix S5 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Infinix S5 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Infinix S5 मध्ये 4000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी द्वारे हा फोन Quetzal Cyan, Nebula Black आणि Voilet कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 21 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर विकत घेता येईल.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, क्वॉड रियर कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले असलेला हा धमाकेदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-launched-in-india-price-at-rs-8999-cheapest-punch-hole-display-quad-rear-camera-4gb-ram-4000mah-battery/feed/ 0