फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, क्वॉड रियर कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले असलेला हा धमाकेदार फोन

91मोबाईल्सने गेल्या आठवड्यात एक्सक्लूसिव बातमी दिली होती ज्यात सांगण्यात आले होते कि टेक कंपनी Infinix भारतात आपले स्मार्टफोन्स वाढवत अजून एक नवीन डिवाईस Infinix S5 नावाने लॉन्च करण्याची तयारी करत आहे. आज कंपनीने आपला लेटेस्ट प्रोडक्ट सादर केला आहे. Infinix S5 आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन फक्त 8,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन ठरतो. Infinix S5 ने लॉन्च करून Realme-Redmi ब्रँडला आव्हान दिले आहे.

Infinix S5 चा लुक

Infinix S5 ची सर्वात मोठी खासियत आहि कि हा डिवाईस इनफिनिक्स ब्रँडचा पहिला स्मार्टफोन आहे जो पंच-होल डिस्प्लेसह लॉन्च झाला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला छोटासा होल आहे आणि यात सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Infinix S5 च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आणि सेंसरची माहिती आहे. Infinix S5 चा बॅक पॅनल Realme XT स्मार्टफोन सारखा बनवण्यात आला आहे. बॅक पॅनलच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर पण आहे आणि याच्या खाली Infinix ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे.

Infinix S5 चे स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 20:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला गेला आहे जो 90.5 टक्के स्कीन टू बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.6 इंचाचा एचडी+ पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 3डी ग्लास लेयरिंग देण्यात आली आहे. Infinix S5 एंडरॉयड 9 पाई आधारित XOS 5.5 यूआई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असेलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

Infinix S5 कंपनीने 4 जीबी रॅम सह वर लॉन्च केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी कार्ड द्वारे जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Infinix S5 क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलची वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फ साठी Infinix S5 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Infinix S5 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Infinix S5 मध्ये 4000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी द्वारे हा फोन Quetzal Cyan, Nebula Black आणि Voilet कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 21 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here