iQOO 3 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Feb 2020 12:14:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12 जीबी रॅम, 4440एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेर्‍यासह iQOO 3 भारतात झाला लॉन्च, 4G आणि 5 दोन मॉडेल्सने घेतली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-launched-in-india-5g-4g-models-snapdragon-865-chipset-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-launched-in-india-5g-4g-models-snapdragon-865-chipset-specs-price/#respond Tue, 25 Feb 2020 12:14:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=6665 कंपनीने आईक्यू 3 चा 5जी मॉडेल 44,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 12 जीबी रॅम, 4440एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेर्‍यासह iQOO 3 भारतात झाला लॉन्च, 4G आणि 5 दोन मॉडेल्सने घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO ने आज भारतीय बाजारात स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन iQOO 3 नावाने नाम बाजारात आला आहे जो 4G आणि 5G दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे. आईक्यू चा प्रयत्न भारतातील पहिला 5जी फोन आपल्या ब्रँड अंतर्गत लॉन्च करण्याचा होता, पण रियलमीने एक दिवस आधीच Realme X50 Pro च्या रुपाने भारतीय बाजारातील पहिला 5जी फोन लॉन्च केला आहे. iQOO 3 ने आज बाजारात एंट्री घेतली आहे जो येत्या 4 मार्च पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल. चला एक नजर टाकूया iQOO च्या पावर वर.

वेरिएंट्स व किंमत

iQOO 3 दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 5G आणि 4G चा समावेश आहे. आईक्यू फोन LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 Flash Storage ला सपोर्ट करतो. सर्वात आधी 5G मॉडेल बद्दल बोलायचे तर हा फोन 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने आईक्यू 3 चा 5जी मॉडेल 44,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

तसेच iQOO 3 चा 4G मॉडेल कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. किंमत पाहता iQOO 3 4G चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 36,990 रुपये तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 39,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

डिस्प्ले

iQOO 3 91.40 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे जिच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. कंपनीने या स्क्रीनला पोलर व्यू डिस्प्लेचे नाव दिले आहे. आईक्यू 3 प्रो मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर 10+ तसेच 1200+ निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने iQOO ची स्क्रीन इन-डिस्प्ले​ फिंगरप्रिंट सेंसर सह दिली आहे जिच्या सोबत डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी E3 पॅनल देण्यात आला आहे.

शानदार फोटोग्राफी

iQOO 3 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.46 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची 20X डिजीटल झूम टेलीफोटो लेंस, एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी आईक्यू 3 एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावरफुल प्रोसेसिंग

iQOO 3 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आईक्यू यूआई 1.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 64बिट 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 865 ​देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी iQOO 3 एड्रेनो 650 जीपीयू ला सपोर्ट करतो.

सिक्योरिटी व पावर

iQOO 3 कंपनीने इन-​डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे या फीचर सोबतच कंपनीने फोन स्क्रीन गोरिल्ल ग्लास 6 ने प्रोटेक्ट केली आहे. तसेच पावर बॅकअप साठी आईक्यू 3 मध्ये 4,440 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 55वॉट सुपर फ्लॅश चार्ज टेक्नॉलजीला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 15 मिनिटांत फोनची बटरी 50 टक्के चार्ज केली जाऊ शकते.

The post 12 जीबी रॅम, 4440एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेर्‍यासह iQOO 3 भारतात झाला लॉन्च, 4G आणि 5 दोन मॉडेल्सने घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-launched-in-india-5g-4g-models-snapdragon-865-chipset-specs-price/feed/ 0
Exclusive : 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, हा ब्रँड करेल कमाल https://www.91mobiles.com/marathi/india-first-5g-phone-iqoo-3-launching-in-india-on-25-february-qualcomm-snapdragon-865/ https://www.91mobiles.com/marathi/india-first-5g-phone-iqoo-3-launching-in-india-on-25-february-qualcomm-snapdragon-865/#respond Tue, 11 Feb 2020 13:27:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6560 आशा आहे कि 25 फेब्रुवारीला लॉच होणारा iQOO चा आगामी स्मार्टफोन एक 5G फोन असेल.

The post Exclusive : 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, हा ब्रँड करेल कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चा सब-ब्रँड म्हणून iQOO ने मार्केट मध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी वीवो आणि आईक्यू वेगळे झाल्याच्या बातमीने टेक विश्वाला धक्का बसला होता. गेल्या आठवड्यात आईक्यू चे डायरेक्टर गगन अरोडा यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून माहिती दिली होती कि कंपनीने स्वतंत्र ब्रँड iQOO च्या पहिल्या स्मार्टफोन वर काम सुरु केले आहे आणि लवकरच हा भारतीय बाजारात येईल. तर आज आम्हाला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि iQOO ब्रँडचा हा पहिला स्मार्टफोन येत्या 25 फेब्रुवारीला भारतात लॉन्च केला जाईल.

iQOO ने आतापर्यंत आपल्या स्मार्टफोन लॉन्चची माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे कि आईक्यू येत्या 25 फेब्रुवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून नवीन ब्रँड iQOO चा पहिला स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल. आईक्यू च्या डायरेक्टरनी सांगितले होते कि कंपनी भारतात आपला 5जी फोन घेऊन येणार आहे आणि यह मोबाईल क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह येईल. त्यामुळे आशा आहे कि 25 फेब्रुवारीला लॉच होणारा iQOO चा आगामी स्मार्टफोन एक 5G फोन असेल.

आईक्यू च्या या आगामी स्मार्टफोनच्या नावाची ठोस माहिती मिळाली नाही पण लीक्सनुसार ब्रँडच्या या नवीन स्मार्टफोनला iQOO 3 नावासह बाजारात येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी या फोनचा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला होता ज्यात iQOO 3 च्या डिजाईनची माहिती मिळाली होती. आता हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. टेना लिस्टिंग मध्ये कथित iQOO 3 चे स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

iQOO च्या आगामी स्मार्टफोन टेना वर V1955A मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या नावाची माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे कि हा डिवाईस आईक्यू 3 असू शकतो. अशी माहिती समोर आली आहे कि हा डिवाईस 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार iQOO 3 मध्ये 20:9 चा आस्पेक्ट रेशियो मिळेल आणि या फोनचा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल.

टेना वर V1955A म्हणजे iQOO 3 चे डायमेंशन 158.51 x 74.88 x 9.16एमएम आणि वजन 214.5 ग्राम सांगण्यात आले आहे. आईक्यू 3 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे जो 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. लीकनुसार iQOO 3 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 12 जीबी रॅम, 8 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम मिळेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन बाजारात 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज वर सेल साठी उपलब्ध होऊ शकतो.

iQOO 3 एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,410एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या सोबत फोन मध्ये 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. लीक झालेल्या आईक्यू 3 च्या फोटो वरून समजले होते कि हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. बोलले जात आहे कि या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जो Sony IMX686 किंवा Samsung GW1 सेंसर असेल.

तसेच iQOO 3 मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या दोन इतर कॅमेरा सेंसर्सची माहिती पण समोर आली आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. iQOO च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि liquid कूलिंग टेक्नोलॉजी दिली जाईल ज्याची माहिती कंपनीने टीजर मध्ये पण दिली आहे. तरीही फोनची लॉन्च डेट आणि ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 25 फेब्रुवारीची वाट बघावी लागेल.

The post Exclusive : 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, हा ब्रँड करेल कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-first-5g-phone-iqoo-3-launching-in-india-on-25-february-qualcomm-snapdragon-865/feed/ 0