12 जीबी रॅम, 4440एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेर्‍यासह iQOO 3 भारतात झाला लॉन्च, 4G आणि 5 दोन मॉडेल्सने घेतली एंट्री

iQOO ने आज भारतीय बाजारात स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन iQOO 3 नावाने नाम बाजारात आला आहे जो 4G आणि 5G दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे. आईक्यू चा प्रयत्न भारतातील पहिला 5जी फोन आपल्या ब्रँड अंतर्गत लॉन्च करण्याचा होता, पण रियलमीने एक दिवस आधीच Realme X50 Pro च्या रुपाने भारतीय बाजारातील पहिला 5जी फोन लॉन्च केला आहे. iQOO 3 ने आज बाजारात एंट्री घेतली आहे जो येत्या 4 मार्च पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल. चला एक नजर टाकूया iQOO च्या पावर वर.

वेरिएंट्स व किंमत

iQOO 3 दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 5G आणि 4G चा समावेश आहे. आईक्यू फोन LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 Flash Storage ला सपोर्ट करतो. सर्वात आधी 5G मॉडेल बद्दल बोलायचे तर हा फोन 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने आईक्यू 3 चा 5जी मॉडेल 44,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

तसेच iQOO 3 चा 4G मॉडेल कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. किंमत पाहता iQOO 3 4G चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 36,990 रुपये तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 39,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

डिस्प्ले

iQOO 3 91.40 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे जिच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. कंपनीने या स्क्रीनला पोलर व्यू डिस्प्लेचे नाव दिले आहे. आईक्यू 3 प्रो मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर 10+ तसेच 1200+ निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने iQOO ची स्क्रीन इन-डिस्प्ले​ फिंगरप्रिंट सेंसर सह दिली आहे जिच्या सोबत डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी E3 पॅनल देण्यात आला आहे.

शानदार फोटोग्राफी

iQOO 3 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.46 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची 20X डिजीटल झूम टेलीफोटो लेंस, एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी आईक्यू 3 एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावरफुल प्रोसेसिंग

iQOO 3 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आईक्यू यूआई 1.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 64बिट 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 865 ​देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी iQOO 3 एड्रेनो 650 जीपीयू ला सपोर्ट करतो.

सिक्योरिटी व पावर

iQOO 3 कंपनीने इन-​डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे या फीचर सोबतच कंपनीने फोन स्क्रीन गोरिल्ल ग्लास 6 ने प्रोटेक्ट केली आहे. तसेच पावर बॅकअप साठी आईक्यू 3 मध्ये 4,440 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 55वॉट सुपर फ्लॅश चार्ज टेक्नॉलजीला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 15 मिनिटांत फोनची बटरी 50 टक्के चार्ज केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here