Jio Prepaid Plans - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 25 Oct 2019 11:41:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 JioPhone यूजर्सना मिळाली दिवाळीची भेट, नवीन प्लान मध्ये मिळेल फ्री कॉलिंग https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-new-recharges-with-500-minutes/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-new-recharges-with-500-minutes/#respond Fri, 25 Oct 2019 11:41:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5593 आता कंपनीने JioPhone साठी पण ‘All-in-One’ प्लान सादर केला आहे. चला पुढे जाणून घेऊया या प्लान्सबद्दल सर्वकाही.

The post JioPhone यूजर्सना मिळाली दिवाळीची भेट, नवीन प्लान मध्ये मिळेल फ्री कॉलिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियोने 6 पैसे/मिनिट IUC चार्ज लावल्यामुळे अनेकांनी प्रश्न उठवले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात रिलायंस जियोने स्मार्टफोनसाठी ‘All-in-One’ प्रीपेड प्लानची घोषणा केली होती. तर आता कंपनीने JioPhone साठी पण ‘All-in-One’ प्लान सादर केला आहे. चला पुढे जाणून घेऊया या प्लान्सबद्दल सर्वकाही.

कंपनीने जारी केलेले हे प्लान चार प्रकारचे आहेत. यात 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. या सर्व प्लान्स मध्ये अनलिमिटेड जियो ते जियो कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे मिनिट्स देण्यात आले आहेत. पुढे प्लानबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहोत.

75 रुपयांचा प्लान

जियोच्या ऑल इन वन प्लानच्या पहिल्या आणि सर्वात स्वस्त 75 रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे तर यात यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळते. या वैधतेसाठी 3जीबी डेटा दिला जात आहे, ज्यात 100एमबी डेटा रोज मिळेल. प्लान्स मध्ये अनलिमिटेड जियो ते जियो कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे 500 मिनिट्स मिळतील.

125 रुपयांचा प्लान

या प्लान मध्ये पण यूजर्सना अनलिमिटेड जियो टू जियो कॉलिंगची सुविधा मिळत आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे, ज्यात 14जीबी डेटा दिला जाईल. या प्लान मध्ये डेली 500एमबी डेटा वापर करण्यासाठी मिळेल. यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे 500 मिनिट मिळतील.

155 रुपयांचा प्लान

इतर दोन्ही प्लान प्रमाणेच या प्लान मध्ये पण यूजर्सना अनलिमिटेड जियो टू जियो कॉलिंगची सुविधा मिळत आहे आणि या प्लानची वैधता पण 28 दिवसांची आहे. या वैधतेमध्ये यूजर्सना 28जीबी डेटा दिला जाईल. सोबत या प्लान मध्ये डेली 1जीबी डेटा वापर करण्यासाठी मिळेल. यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे 500 मिनिटे मिळतील.

185 रुपयांचा प्लान

185 रुपयांचा प्लान पाहता यात पण सर्व प्लान प्रमाणे मिळणारे बेनिफिट्स जवळपास तेच आहेत. यात मिळणारा डेटा थोडा जास्त आहे. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लान मध्ये यूजर्सना एकूण 56जीबी डेटा दिला जाईल. प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 2जीबी डेटा मिळेल. या प्लान मध्ये पण यूजर्सना अनलिमिटेड जियो टू जियो कॉलिंगची सुविधा मिळत आहे. यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे 500 मिनिट्स मिळतील.

रिलायंस जियोफोन वीडियो

The post JioPhone यूजर्सना मिळाली दिवाळीची भेट, नवीन प्लान मध्ये मिळेल फ्री कॉलिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-new-recharges-with-500-minutes/feed/ 0
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले जियोचे बेस्ट मंथली प्लान, बघा तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट https://www.91mobiles.com/marathi/best-reliance-jio-prepaid-plans-under-rs-200-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/best-reliance-jio-prepaid-plans-under-rs-200-in-marathi/#respond Thu, 13 Dec 2018 07:16:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3152 आम्ही 200 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या अशाच बेस्ट जियो प्लान्सचा उल्लेख केला आहे.

The post 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले जियोचे बेस्ट मंथली प्लान, बघा तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जरी तुम्ही राहता त्या ठिकाणी रिलायंस जियोचं नेटवर्क कमजोर असेल, जरी तुम्ही म्हणालात की इंटरनेट स्पीड खूप स्लो आहे पण एक गोष्ट तुम्हीपण नाकारू शकत नाही की अजूनही सर्वात स्वस्त डेटा आणि कॉलिंग रिलायंस जियोच देत आहे. इतकेच नव्हे तर सध्या जे डेटाचे रेट कमी झालेत आणि फ्री मध्ये कॉलिंग मिळत आहे तीपण रिलायंस जियोची देण आहे. कंपनी ने आपला बाजार बदलून टाकला आहे. त्यामुळे एक सिम रिलायंसचा तुमच्याकडे नक्कीच असेल. पण एक कमतरता अशी की रिलायंस जियो आल्यापासून टॉप अप संपले आणि तुम्हाला मंथली रिचार्ज करावाच लागतो. परंतु कंपनी कडे स्वस्त आणि चांगले प्लान पण आहेत जे यूजर्स साठी खूप फायदेशीर आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा पण मिळतो. खाली आम्ही 200 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या अशाच बेस्ट जियो प्लान्सचा उल्लेख केला आहे.

जियोफोनसाठी

जियोचा 49 रुपयांचा मंथली प्लान: रिलायंस जियो ने गेल्यावर्षी 4जी फीचर फोनची सुरवात केली होती आणि यासाठी कंपनी ने 49 रुपयांचा प्लान लॉन्च केला होता. हा प्लान जियोफोन 1 आणि जियोफोन 2 दोघांसाठी वैध आहे. जियोचा हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या अंतर्गत सर्व प्रकारची लोकल आणि एसटीडी कॉलिंग मोफत मिळेल. इतकेच नव्हे तर नॅशनल रोमिंग मध्ये पण सर्व प्रकारचे कॉल मोफत असतील. जियोच्या 49 रुपयांच्या या प्लान मध्ये तुम्हाला 1 जीबी 4जी डेटा दिला जातो. तसेच एसएमएस पण मोफत आहेत.

जियोचा 99 रुपयांचा मंथली प्लान: जियोफोनसाठी सादर केल्या गेलेल्या या प्लान अंतर्गत तुम्हाला रोज 500 एमबी डेटा मिळेल. हा प्लान पण 28 दिवसांसाठी वैध आहे आणि या अंतर्गत तुम्हाला एकूण 14जीबी 4जी डेटा दिला जातो. या प्लान मध्ये पण तुम्हाला सर्व प्रकारची नॅशनल कॉलिंग फ्री मिळेल. तसेच रोमिंग शुल्क पण नाही. तसेच महिन्यभरात तुम्हाला 300 एसएमएस मोफत मिळतील.

जियोचा 153 रुपयांचा मंथली प्लान: हा प्लान पण जियोफोनसाठीच आहे. रिलायंस जियोच्या 153 रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. खास बाब अशी की यात रोज तुम्हाला 1.5जीबी 4जी डेटा मिळेल. इतक्या कमी पैश्यात इतका जास्त ज्यादा डेटा इतर कोणतीही कंपनी देत नाही. अर्थात 28 दिवसांत तुम्हाला एकूण 42जीबी 4जी डेटा मिळेल. सोबत प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल, नॅशनल आणि रोमिंग कॉल फ्री दिली जात आहे. 153 रुपयांच्या या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस आणि जियो ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

4जी स्मार्टफोन साठी प्लान
वर जे आम्ही सांगितले ते सर्व ​प्लान फक्त जियोफोन साठी होते पण आता जी माहिती आम्ही देत आहोत त्या प्लान्सचा लाभ तुम्ही कोणत्याही 4जी फोन वर घेऊ शकता.

जियोचा 98 रुपयांचा मंथली प्लान: रिलायंस जियोचा हा प्लान कोणत्याही स्मार्टफोन साठी घेता येतो. जियोचा 98 रुपयांचा हा प्रीपेड मंथली प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. डेटा पाहता जियो संपूर्ण महिन्यासाठी एकूण 2जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी स्पीड वर चालतो. तसेच या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी लोकल व एसटीडी वॉयस कॉल फ्री दिले जात आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतात. सोबत जियोच्या या प्लान मध्ये महिण्यासाठी 300एसएमएस पण मिळतील.

जियोचा 149 रुपयांचा मंथली प्लान: या मंथली प्लान मध्ये तुम्हाला खूप डेटा मिळतो. कॉलिंग तर ​जियो मध्ये फ्री आहेच. रिलायंस जियो ने सादर केलेला 149 रुपयांचा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. यात तुम्हाला रोज 1.5जीबी इंटरनेट डेटा मिळेल. अर्थात 28 दिवसांत एकूण 42जीबी 4जी डेटा वापरता येईल. तसेच कंपनी रोज 100 एसएमएस मोफत देत आहे. जियोच्या इतर प्लान प्रमाणे यात पण तुम्हाला सर्व नॅशनल आणि लोकल अनलिमिटेड कॉलिंग मोफत मिळतील. रोमिंग मध्ये पण कोणतेही ​शुल्क नसेल.

जियोचा 198 रुपयांचा मंथली प्लान: जियोच्या 198 रुपयांचा एक प्लान आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला आहे. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. खास बाब अशी की या प्लान अंतर्गत कंपनी 2जीबी डेटा प्रतिदिन देत आहे. म्हणजे एका महिन्यासाठी एकूण 56जीबी इंटरनेट डेटा मिळेल जी 4जी स्पीड वर चालेल. तसेच या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी लोकल व एसटीडी वॉयस कॉल फ्री दिले जात आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतात. सोबतच जियोच्या या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण मिळतील.

The post 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले जियोचे बेस्ट मंथली प्लान, बघा तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-reliance-jio-prepaid-plans-under-rs-200-in-marathi/feed/ 0