200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले जियोचे बेस्ट मंथली प्लान, बघा तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट

जरी तुम्ही राहता त्या ठिकाणी रिलायंस जियोचं नेटवर्क कमजोर असेल, जरी तुम्ही म्हणालात की इंटरनेट स्पीड खूप स्लो आहे पण एक गोष्ट तुम्हीपण नाकारू शकत नाही की अजूनही सर्वात स्वस्त डेटा आणि कॉलिंग रिलायंस जियोच देत आहे. इतकेच नव्हे तर सध्या जे डेटाचे रेट कमी झालेत आणि फ्री मध्ये कॉलिंग मिळत आहे तीपण रिलायंस जियोची देण आहे. कंपनी ने आपला बाजार बदलून टाकला आहे. त्यामुळे एक सिम रिलायंसचा तुमच्याकडे नक्कीच असेल. पण एक कमतरता अशी की रिलायंस जियो आल्यापासून टॉप अप संपले आणि तुम्हाला मंथली रिचार्ज करावाच लागतो. परंतु कंपनी कडे स्वस्त आणि चांगले प्लान पण आहेत जे यूजर्स साठी खूप फायदेशीर आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा पण मिळतो. खाली आम्ही 200 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या अशाच बेस्ट जियो प्लान्सचा उल्लेख केला आहे.

जियोफोनसाठी

जियोचा 49 रुपयांचा मंथली प्लान: रिलायंस जियो ने गेल्यावर्षी 4जी फीचर फोनची सुरवात केली होती आणि यासाठी कंपनी ने 49 रुपयांचा प्लान लॉन्च केला होता. हा प्लान जियोफोन 1 आणि जियोफोन 2 दोघांसाठी वैध आहे. जियोचा हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या अंतर्गत सर्व प्रकारची लोकल आणि एसटीडी कॉलिंग मोफत मिळेल. इतकेच नव्हे तर नॅशनल रोमिंग मध्ये पण सर्व प्रकारचे कॉल मोफत असतील. जियोच्या 49 रुपयांच्या या प्लान मध्ये तुम्हाला 1 जीबी 4जी डेटा दिला जातो. तसेच एसएमएस पण मोफत आहेत.

जियोचा 99 रुपयांचा मंथली प्लान: जियोफोनसाठी सादर केल्या गेलेल्या या प्लान अंतर्गत तुम्हाला रोज 500 एमबी डेटा मिळेल. हा प्लान पण 28 दिवसांसाठी वैध आहे आणि या अंतर्गत तुम्हाला एकूण 14जीबी 4जी डेटा दिला जातो. या प्लान मध्ये पण तुम्हाला सर्व प्रकारची नॅशनल कॉलिंग फ्री मिळेल. तसेच रोमिंग शुल्क पण नाही. तसेच महिन्यभरात तुम्हाला 300 एसएमएस मोफत मिळतील.

जियोचा 153 रुपयांचा मंथली प्लान: हा प्लान पण जियोफोनसाठीच आहे. रिलायंस जियोच्या 153 रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. खास बाब अशी की यात रोज तुम्हाला 1.5जीबी 4जी डेटा मिळेल. इतक्या कमी पैश्यात इतका जास्त ज्यादा डेटा इतर कोणतीही कंपनी देत नाही. अर्थात 28 दिवसांत तुम्हाला एकूण 42जीबी 4जी डेटा मिळेल. सोबत प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल, नॅशनल आणि रोमिंग कॉल फ्री दिली जात आहे. 153 रुपयांच्या या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस आणि जियो ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

4जी स्मार्टफोन साठी प्लान
वर जे आम्ही सांगितले ते सर्व ​प्लान फक्त जियोफोन साठी होते पण आता जी माहिती आम्ही देत आहोत त्या प्लान्सचा लाभ तुम्ही कोणत्याही 4जी फोन वर घेऊ शकता.

जियोचा 98 रुपयांचा मंथली प्लान: रिलायंस जियोचा हा प्लान कोणत्याही स्मार्टफोन साठी घेता येतो. जियोचा 98 रुपयांचा हा प्रीपेड मंथली प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. डेटा पाहता जियो संपूर्ण महिन्यासाठी एकूण 2जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी स्पीड वर चालतो. तसेच या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी लोकल व एसटीडी वॉयस कॉल फ्री दिले जात आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतात. सोबत जियोच्या या प्लान मध्ये महिण्यासाठी 300एसएमएस पण मिळतील.

जियोचा 149 रुपयांचा मंथली प्लान: या मंथली प्लान मध्ये तुम्हाला खूप डेटा मिळतो. कॉलिंग तर ​जियो मध्ये फ्री आहेच. रिलायंस जियो ने सादर केलेला 149 रुपयांचा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. यात तुम्हाला रोज 1.5जीबी इंटरनेट डेटा मिळेल. अर्थात 28 दिवसांत एकूण 42जीबी 4जी डेटा वापरता येईल. तसेच कंपनी रोज 100 एसएमएस मोफत देत आहे. जियोच्या इतर प्लान प्रमाणे यात पण तुम्हाला सर्व नॅशनल आणि लोकल अनलिमिटेड कॉलिंग मोफत मिळतील. रोमिंग मध्ये पण कोणतेही ​शुल्क नसेल.

जियोचा 198 रुपयांचा मंथली प्लान: जियोच्या 198 रुपयांचा एक प्लान आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला आहे. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. खास बाब अशी की या प्लान अंतर्गत कंपनी 2जीबी डेटा प्रतिदिन देत आहे. म्हणजे एका महिन्यासाठी एकूण 56जीबी इंटरनेट डेटा मिळेल जी 4जी स्पीड वर चालेल. तसेच या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी लोकल व एसटीडी वॉयस कॉल फ्री दिले जात आहेत जे रोमिंग मध्ये पण फ्री असतात. सोबतच जियोच्या या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here